Sunday, September 15, 2013

२१ गणपती - 21 Ganapati, leaves, flowers, Purane, demons, idols, names, likings, maharashtra. India


आपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हे अति प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेला देव आहे. दरवषीर् कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...

...........

महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती

१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे, २. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर, ३. बल्लाळेश्वर-पाली, रायगड, ४. वरद विनायक-महाड, रायगड, ५. चिंतामणी-थेऊर, पुणे, ६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे, ७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे ८. श्री महागणपती-रांजणगाव, पुणे, ९. मंगलमूतीर्-चिंचवड, पुणे, १०. कसबा गणपती-पुणे, ११. सिद्धिविनायक-सारसबाग, पुणे, १२. गणेश-कढाव, रायगड, १३. टिटवाळा-महागणती- ठाणे, १४. पुळ्याचा गणपती-रत्नागिरी, १५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी, १६. वक्रतुंड-आवास, रायगड, १७. मोदकेश्वर-नाशिक, १८. मुद्गल गणेश-परभणी. १९. चिंतामणी-कळंब, यवतमाळ, २०. श्रीसिद्धिविनायक-प्रभादेवी, २१. श्री सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.

देशातील प्रसिद्ध २१ गणपती

ॐकार गणेश-प्रयाग, महोत्कट-काश्मीर, विघ्नराज-आंध्र प्रदेश, श्वेता गणेश-केरळ, गणेशजी-बंगाल, मंगलमूतीर्-मध्य प्रदेश, ढुंढीराज-काशी, बदरी गणेश-हिमालय, गणेश बर्फ लिंग-हिमालय, नरक विमोचन गणेश-आसाम, ब्रह्मागणेश-बिहार, सीतामढीचा गणेश-बिहार, षड्भूज गणेश-पंजाब, बली गणपती-राजस्थान, दुर्गकूट गणेश-गुजराथ, पंचमुखी गणेश-मध्य प्रदेश, खांडोळ्याचा गणेश-गोवरा, गोकर्णाचा गणेश-कर्नाटक, भदाचलम गणेश- आंध्र, कावेरीकांत विनायक- मदास, कल्पगणपती- ओरिसा.

जगातील प्रसिद्ध २१ गणपती

पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ, गणेश-कंबोडिया, द्वारपाल गणेश-तिबेट, महापियेन गणेश-ब्रह्मादेश, गुढविद्या गणेश-चीन, गणेशमूतीर्-मेक्सिको, गणेश-तुर्कस्तान, गणेश- सिलोन, गणपती-बानिर्ओ, गणेश-अफगाणिस्तान, गणपती-बाली बेट, बोरीचा गणपती-इण्डोनेशिया, गणेश-जावा, लेखक गणेश-सयाम, गुरू गणेश-कंबोडिया, गणपती-रोम, इटली, श्री गणेश-जपान, योद्धा गणेश- इराण.

गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू

१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८) विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४) परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१) केवडा.

गणपतीची २१ नावं

१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७. विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३. ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८. ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.

पूजेसाठी २१ पानं

दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी, अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.

२१ फुलं

जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी, गोविंद, मोहोर, शतपत्र.

पूजा साहित्य

फुलपात्र, तांब्या, ताम्हण, उदबत्ती घर, पंचामृत पात्र, समई, निरांजन, पूजेचे ताट, नैवेद्य पात्र, धुप पात्र, वस्त्र, चौरंग, देव्हारा, गंध, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षता, तेल, तूप, अत्तर, दुर्वा, लाल फुलं, उदबत्ती, धूप, पंचामृत, पाच फळं, मोदक, पेढे, पान, सुपारी, नारळ.

२१ पुराणं

गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध, वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.

ठार मारलेले २१ राक्षस

नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर, मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.

गणपतीच्या २१ मूर्ती

१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०. पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४. उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८. हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत. 


२१ गणपती - 21 Ganapati, leaves, flowers, Purane, demons, idols, names, likings, maharashtra. India 

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email