शेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in share market
शेअर बाजारात सध्या अस्थिरता असली, तरी त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा यूटीआय एएमसीच्या इक्विटीचे प्रमुख अनूप भास्कर यांना आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत काय करावे, याचा घेतलेला आहे.
देशातील सीईओंच्या पाहणीत २०१३-१४ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर पाच टक्क्यांच्या पुढे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे तुम्हाला वाटते का?
कंपन्यांचे अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असल्याने चांगले वाटत आहे. आर्थिक मंदीसदृश परिस्थितीने कमाल मर्यादा गाठली असल्याचा अपेक्षा त्यांना वाटत आहे. या वर्षी शेतीचा वाढीचा दर चांगला राहील आणि तो सहा टक्केही असू शकतो. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत गेल्या १७ महिन्यांत मोठी घट झाली आहे. मात्र, आगामी काळात त्यांच्या विक्रीत सुधारणा होऊ शकते. ग्रामीण भागातून मागणी येण्याची अपेक्षा असून, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत मागणी वाढेण्याची शक्यता आहे. त्या या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे. २०१४-१५ मध्ये वाढीत सातत्य कसे राहते, हे आव्हान आहे. सध्या गुंतवणूक थंडावली असून, ती कशी सुधारेल याकडे लक्ष द्यायला हवे. इंधन पुरवठ्या अभावी अनेक वीज प्रकल्प बंद आहेत. निवडणुकांमुळे कंपन्या मे २०१४ पूर्वी गुंतवणूक करण्याबाबत आखडता हात घेऊ शकतात.संसदेच्या गुंतवणूकविषयक समितीने अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे गुंतवणुकीस चालना मिळेल का?
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आशावादी दृष्टीकोन निर्माण झालेला आहे. मात्र, केवळ प्रस्ताव मान्य करून भागणार नाही. त्यासाठी ठोस पावलेही उचलण्याची गरज आहे. जमीन संपानाचे विधेय मंजूर झाल्याने मोठ्या प्रकल्पासाठी पाचशे ते एक हजार एक जागा ताब्यात घेण्याचा कालावधी १२ ते १५ महिन्यांवरून २५ ते ३६ महिन्यांवर गेला आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणीचा खर्च वाढला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून परकी गुंतवणूकदार संस्था शेअर बाजरात विक्री करीत आहेत. आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे का?
अमेरिकेच्या एस अँड पी ५०० निर्देशांकातून एक वर्षांत मिळणारे रिटर्न १७ टक्के आहे. भारत आणि अन्य उदयोन्मुख बाजारांतून मिळणारे रिटर्न हे उणे किंवा कमी आणि एक आकडी आहेत. त्यामुळे अशा बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण मंदावले आहे. या ठिकाणची गुंतवणूक काढून घेऊन विकसित बाजारपेठांमध्ये गुंतविली जात आहे. चालू खात्यावरील तुटीस साह्य करण्यासाठी परकी चलनाची गरज लागते आणि भारत अशा गुंतवणुकीवर अवलंबून आहे. गुंतवणूक काढून घेतली जात असल्याने अर्थव्यवस्थेसाठी जोखीम वाढत आहे. गुंतवणूक काढून घेण्याचे कायम राहिल्याचा त्याचा फटका रुपयाला बसू शकतो.रुपयातील घसरणीमुळे आयटी क्षेत्राची कामगिरी सुधारली आहे का वा अमेरिका व अन्य बाजारापेठांमध्ये मागणीत सुधारणा झाली आहे. अशा शेअरचा विचार करावा का?
अमेरिका, युरोप आणि जपान या बाजारपेठांमध्ये चांगला जम बसविलेल्या आणि लाभ होत असलेल्या कंपन्यांचा विचार गुंतवणूदारांनी करावी.औषध निर्मिती क्षेत्राबाबत काय अंदाज आहे?
या क्षेत्राचा कामगिरी हा संमिश्र आहे. रुपयाच्या घसरणीचा फायदा होणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे किमतीवर परिणाम होणार आहे. यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या निकालांवर परिणाम होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
सध्याच्या आर्थिक वातावरणात गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल?
गेल्या पाच वर्षांत काही गुंतवणुकीच्या काही प्रकारांमध्ये चांगले रिटर्न मिळाले आहेत. त्यामुळे यात गुंतवणूक कायम ठेवावी का, असा प्रश्न गुंतवणूकदारांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा भांडवली बाजारातील गुंतवणूक हा हिस्सा असायलाच हवा. फायनान्शिअल प्लॅनिंगनुसार गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायामध्ये गुंतवणूक असावी. २००३ मध्ये मोठी तेजी आली होती आणि भांडवली बाजारात गुंतवणूक न केलेल्यांना त्याचा फायदा झालेला नाही. मात्र, भांडवली बाजारातून चांगले रिटर्न मिळतील, असा विश्वास देणे चुकीचे आहे. गेल्या वीस वर्षांत सेन्सेक्समधून १४ ते १६ टक्के उत्पन्न वाढ मिळाली. पुढील वीस वर्षांत असे होण्याची शक्यता नाही, असे म्हणता येणार नाही. अर्थात, फेरमानांकन झाल्याच परिस्थिती वेगळी असू शकते. संपूर्ण कामकाजी काळात शेअर बाजारात काही प्रमाणात गुंतवणूक करायल हवी. मात्र, गुंतवणूकदार एक...तीन...पाच वर्षांतील रिटर्नबाबत विचार करतात. गुंतणुकीबाबत दीर्घकालीन धोरण ठेवल्या भांडवल उभे राहू शकते.
No comments:
Post a Comment