Sunday, September 15, 2013

बाप्पा मोरया… Ganesh mandal Photoes from Pune

शनिवार पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, दत्तवाडी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, डेक्कन परिसरातही हलत्या आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून मंडळांनी ऐतिहासिक, तसेच सामाजिक विषय हाताळले आहेत, तर काही मंडळांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. 


डेक्कन – श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टने बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविले असून, येथील विद्युत रोषणाईची सजावट आकर्षक आहे.



नाना पेठ – दत्त क्‍लब मंडळाने मयूर महालाचा देखावा तयार केला आहे.



भवानी पेठ – जय महाराष्ट्र तरुण मंडळाने “हनुमानाची रामभक्ती’ हा पौराणिक देखावा तयार केला आहे.


भवानी पेठ – जय जवान समता मंडळाने “टिंगलटवाळी-एक समस्या’ या सामाजिक विषयावर जिवंत देखावा तयार केला आहे.


डेक्कन – नवचैतन्य मंडळाने संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “इथे ओशाळला मृत्यू’ हा जिवंत देखावा उभारला आहे.


नाना पेठ – गोकूळ वस्ताद तालमीने साधी पण आकर्षक सजावट केली आहे.


जंगली महाराज रस्ता – मृत्युंजय मित्रमंडळाने “रावणाचे गर्वहरण’ हा देखावा सादर केला आहे.



डेक्कन – आझाद हिंद मंडळाने संभाजी महाराज यांच्या जीवनावर जिवंत देखावा सादर केला आहे.


दत्तवाडी – नवजवान मित्रमंडळाने स्फटिकांच्या माळा व फुलांपासून काल्पनिक मंदिराची सजावट केली आहे.


रास्ता पेठ – मराठा मित्रमंडळाने वस्त्रांपासून मनोरा तयार केला आहे. विविधरंगी दिव्यामुंळे तो अधिकच खुलला आहे.


आवर्जून पाहावेत असे देखावे 
श्री गजानन मंडळ – “तेरा बच्चामेरा बच्चा’ 
नवचैतन्य मित्र मंडळ – “इथे ओशाळला मृत्यू’ 
मुठेश्‍वर मंडळ – “प्रलयकारी उत्तराखंड’ 
शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – “राम-रावण युद्ध’ 
विनायक मित्र मंडळ – “भेटली भक्ती शौर्याला’ 
विश्रामबाग मित्र मंडळ – “राजे पुन्हा जन्म घ्या’

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive