Thursday, September 19, 2013

उत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budgeting home finance



उत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budgeting home finance


गुंतवणूक करण्यासाठी किंवा गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी वेळ मिळत नसल्यास वेळेचा हा अडथळा दूर करण्यासाठी पुढील काही सोपे उपाय करता येतील. या उपायांमुळे तातडीने आणि दीर्घकाळाचा फायदा मिळेल.


उत्पन्नातील १ टक्का अधिक बचत करा

गुंतवणूकदार कितीही शिस्तब्ध असले तरी त्यांना दरमहा ‌विशिष्ट रकमेची बचत करणे दीर्घकाळ जमत नाही. पण, पैसे हातात येण्यापूर्वीच परस्पर ते बचतीसाठी वेगळे ठेवले गेले तर मात्र ही बचत शक्य होते. त्यामुळे, तुमच्या उत्पन्नातील अतिरिक्त १ टक्का रक्कम व्हॉलंट्री प्रॉव्हिडंट फंडात जमा करण्यास तुमच्या कंपनीला सांगावे.

अंमलबजावणीतील सुलभता ः हा पर्याय तसा सुलभ आहे आणि किरकोळ रक्कम कापली गेल्याने फार फटकाही बसत नाही. पीएफमधील योगदान वाढवण्याबाबत केवळ फायनान्स विभागाला कळवावे.

उत्तम बँक निवडावी

सर्वप्रथम, बँक शाखेची जागा एटीएमने गेतली. त्यानंतर नेटबँकिंगने एटीएमची जागा घेतली. आता मोबाइल बँकिंगमुळे बँका आधीपेक्षा आपल्या निकट आल्या आहेत. तुमच्या बँकेकडून दिली जाणारी मोबाइल सेवा कशी आहे? त्यामध्ये गुंतागुंत असेल आणि सुविधा पुरेशा नसतील तर बँक बदलण्याचा विचार करावा. 


अंमलबजावणीतील सुलभता ः तुम्ही टेक सॅव्ही असाल, तर एकदम सोपा पर्याय. सेवांची तुलना करणे आणि मोबाइल अॅप जास्त वेळखाऊ नाहीत, पण नवे खाते उघडणे जिकिरीचे वाटू शकते.

पोर्टफोलिओचा आढावा घेणे

बाजारातील चढ-उतारांमुळे तुमच्या अॅसेट अॅलोकेशनमध्ये कदाचित बदल झाला असेल, पण तुमच्या सगळ्या गुंतवणुकींचा आढावा घेतल्याशिवाय याची कल्पना येणार नाही. हा आढावा आधी घेतला नसेल तर पोर्टफोलिओ ट्रॅकरला साइन-अप करावे. सगळ्या गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी त्याचा तपशील खणून काढणे, कंटाळवाणे वाटेल. पण हा प्रयत्न वाया जाणार नाही.

अंमलबजावणीतील सुलभता ः अधूनमधून गुंतवणूक करत असलेल्यांसाठी व सगळी कागदपत्रे सांभाळून न ठेवणाऱ्यांसाठी हा पर्याय सोयीचा वाटणार नाही.

स्वीप-इन अकाउंट उघडणे

नव्या बँकेचा शोध घेत असताना, स्वीप-इन अकाउंटकडेही लक्ष द्यावे. विशिष्ट मर्यादा ओलांडल्यास हे अकाउंट बँकेतील सेव्हिंग अकाउंटवर अधिक व्याजदर देऊ करते. कर्जाचा हप्ता आणि बिले भरण्यापूर्वी काही दिवस खात्यात रक्कम राहिली तरी हे खाते उपयोगाचे ठरते.

अंमलबजावणीतील सुलभता ः एकदा हा त्रास घेतल्याने दीर्घकालीन लाभ मिळू शकतात. फोन व टीव्ही प्लॅनचा आढावा घ्या

कम्युनिकेशन बिले लहान दिसतात, पण घरखर्चाचा तो महत्त्वाचा भाग असतो. आपली वापर करण्याची पद्धत न्याहाळावी आणि त्यानुसार योग्य तो प्लॅन घ्यावा. आपल्या टीव्हीचा डीटीएच प्लॅनही तपासून पहावा. अगदी क्वचित पाहिले जाणारे चॅनल बंद करून टाकावेत आणि ते पैसे बचतीकडे वळवावेत.

अंमलबजावणीतील सुलभता ः आपल्या गरजा काय आहेत, याची नेमकी जाण असेल तर योजनांची तुलना करणे आणि त्यातील योग्य तो निवडणे तितके कठीण वाटणार नाही. केवळ एक फोनकॉल करून माहिती घेता येईल.

होमलोनचा ‌अतिरिक्त हप्ता भरणे

होमलोन भरण्यासाठी मोठी रक्कम साचण्यासाठी वाट बघू नये. अगदी एका महिन्याचा हप्ता जरी साठला तरी तो भरून टाकावा. दरवर्षी एक हप्ता अधिक भरला तरी होमलोनचा ताण कित्येक महिन्यांनी कमी होईल. दीर्घ मुदतीच्या कर्जांच्या बाबतीत हा फरक काही वर्षांचा असू शकतो.

अंमलबजावणीतील सुलभता ः कर्ज मोठे असेल तर दरवर्षी एक हप्ता साठवणेही कठीण होते. पण वर्षागणिक उत्पन्न वाढत गेल्यास हे शक्य होऊ शकते.

घरखर्चाचा पुन्हा मेळ बसवणे

सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात काटकसर करणे गरजेचे आहे. घरखर्चाच्या बजेटचा पुन्हा आढावा घ्यायला हवा, त्यातील अत्यावश्यक गोष्टी कायम ठेवाव्यात, चोखंदळपणासाठीचा खर्च टाळावा आणि पैसे वाया घालवण्यामध्ये कपात करावी. जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल करून काही हजार रुपये कसे वाचवता येतात, हे पाहता येईल.

अंमलबजावणीतील सुलभता ः रुपया अन् रुपयावर लक्ष ठेवावे लागणार असल्याने सुरुवातीला हे कठीण वाटेल, परंतु, २-३ महिन्यांत हे सवयीचे होऊन जाईल. कर सल्लागाराची मदत घ्यावी

आपण टॅक्स रिटर्न ऑनलाइन भरले असेल आणि इन्कम टॅक्स विभागाकडून पोचपावतीही मिळाली असेल. पण, लागू असलेल्या सगळ्या कर वजावटी घेतल्या आहेत का? अनेक जण हे लाभ घेत नाहीत व गरजेपेक्षा अधिक कर भरतात. यासाठी कर सल्लागाराची मदत घ्यावी आणि करविषयक वजावटींचा पुरेपूर लाभ घेतला असल्याची खात्री करून घ्यावी.

अंमलबजावणीतील सुलभता ः ऑनलाइन करभरणा पोर्टल रिटर्न प्रत्यक्ष भरण्यापूर्वी त्याचा आढावा घेतात आणि किरकोळ शुल्क घेऊन सल्ला देतात. काहीशे रुपये देऊन काही हजार रुपये वाचवता येतील.

रिवॉर्ड पॉइंट्सचा फायदा घेणे

क्रेडिट कार्डावर रिवॉर्ड पॉइंट्स जमवले असतील तर ते योग्य वेळी वापरून घ्यावेत. त्यावर विकत घेता येणाऱ्या वस्तूंची किंमत नंतर वाढत असल्याने कालांतराने या पॉइंट्सचे मूल्य कमी होते. शक्य तितक्या लवकर हे पॉइंट वापरावेत.

अंमलबजावणीतील सुलभता ः प्लॅस्टिक मनीचा नियमित वापर करत असलेल्यांसाठी हा सोपा पर्याय आहे. या पॉइंटचा वापर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठीही केला जाऊ शकतो.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive