Tuesday, September 3, 2013

ऑक्टोबरआधीच काढा इन्शुरन्स!ऑक्टोबरआधीच काढा इन्शुरन्स!सर्व्हिस टॅक्स लागू होण्याची शक्यता; नवे बदल अपेक्षित

Insurance
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची (आयआरडीए) नवी मार्गदर्शक तत्त्वे पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे सध्याच्या अनेक लाइफ इन्शुन्स पॉलिसीमध्ये बदल होणार असून, त्यावर सर्व्हिस टॅक्स लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा आहे.

'आयआरडीए'ने फेब्रुवारीमध्ये यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले होते. त्याची अमलबजावणी ही ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यानुसार इन्शुरन्स कंपन्यांना सध्याच्या अनेक पॉलिसीची फेरआखणी करावी लागणार आहे. यासंदर्भातील काम सुरूही झालेले आहे. नव्या निकषांचा फटका हा विमाधारकाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम वाढू शकतो, तर अनेक वैशिष्ट्ये ही कमी होऊ शकतात. या संदर्भात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पुणे विभाग १ चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक ए. पी. कुलकर्णी म्हणाले, 'ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या 'आयआरडीए'च्या नव्या निकषांचा परिणाम हा सध्याच्या अनेक इन्शुरन्स पॉलिसीवर होईल. निकषांनुसार सध्या इन्शुरन्स पॉलिसीची फेरआखणी सुरू आहे. त्यामुळे काही वैशिष्ट्ये काढून टाकली जाऊ शकतात, तर काही पॉलिसीदेखील बंद होऊ शकतात. त्यामुळे नवा इन्शुरन्स काढण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महत्त्वाचा महिना आहे.'

सध्या काही इन्शुरन्स पॉलिसीवर सर्व्हिस टॅक्सची आकरणी होत आहे. मात्र, अशा पॉलिसीची संख्या मर्यादित आहे. नव्या बदलानुसार ऑक्टोबरनंतर जारी होणाऱ्या बहुतेक सर्व इन्शुरन्स पॉलिसीवर सर्व्हिस टॅक्स आकरला जाणार आहे. 'पॉलिसीचा काळ हा वीस ते २५ वर्षांच्या पुढील असतो. ऑक्टोबरमध्ये इन्शुन्स मोठ्या प्रीमिअमची पॉलिसी काढल्यास सर्व्हिस टॅक्समुळे तीन ते पाच लाख रुपयांचा फरक पडू शकेल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इन्शुरन्स काढणे हिताचे ठरू शकते,' असे इन्शुरन्स तज्ज्ञ अजय खोले यांनी सांगितले.

'इन्शुरन्समध्ये एक प्रकारचा करार करण्यात आलेला असतो. त्यामुळे एखादी पॉलिसी बंद झाली, तरी त्याचे लाभ हे ज्यांच्याकडे पॉलिसी आहे, त्यांना मिळतात. यापूर्वी 'एलआयसी'ने काही योजना बंद केल्या होत्या. मात्र, त्याचे पूर्ण लाभ हे संबंधित इन्शुरन्सधारकाला मिळत आहेत,' असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

बंद पडलेली पॉलिसी सुरू कराइन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम काही कारणाने भरणे थांबल्यास पॉलिसी बंद होते. मात्र, अशी बंद पडलेली पॉलिसी सुरू करून घेण्यासाठी 'एलआयसी'ने योजना जाहीर केली आहे. त्यानुसार संबंधित इन्शुरन्सधारकास सवलत दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email