Wednesday, September 4, 2013

How to do Registered Marriage and Registration of marriage?

विवाह झाल्यावर शासकीय दफ्तरी त्याची नोंद होणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी का व कशी करावी? नोंदणी पद्धतीने विवाह करायचा असल्यास पद्धत काय, शुल्क किती याबाबत सविस्तर माहिती.
नातेवाईक, मित्रमंडळींच्या साक्षीने धूमधडाक्‍यात विवाह झाला, पती-पत्नी म्हणून संसारही सुरू झाला; परंतु कायद्याच्या चौकटीतून विचार केल्यास विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार अनेक विवाह होत असले, तरी या विवाहांची प्रत्यक्ष नोंद होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे; मात्र सध्या याबाबत जागरूकता वाढते आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, 1998 यानुसार ही नोंदणी करण्यात येते. शहरी भागांत विवाह निबंधक आणि ग्रामीण भागांत ग्रामसेवक ही नोंदणी करतात. विवाह नोंदणी सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. ही नोंदणी करणे आवश्‍यक आहे; पण अनिवार्य नाही. त्यामुळेच विवाह होऊनही नोंदणी न केलेली अनेक जोडपी सापडतील. विवाह नोंदणीचे महत्त्व माहीत नसणे, नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणे ही नोंदणी न करण्यामागे असतात.
विवाह नोंदणीचे दोन प्रकार ज्या ठिकाणी विवाह होईल किंवा आपण जिथे राहतो त्याच गावात ही नोंदणी करावी असे कोणतेही बंधन नाही. राज्यातील कोणत्याही भागात विवाह झाला, तरी आवश्‍यक ती कागदपत्रे जमा केल्यास विवाह नोंदणी कोणत्याही कार्यालयात करता येते. ज्याप्रमाणे जन्म-मृत्यूची नोंद केली जाते, त्याचप्रमाणे शासकीय दफ्तरी विवाहाची नोंद केली जाते. या विवाहाच्या नोंदीचे साधारण दोन प्रकार असल्याचे ऍड. अमृता देसर्डा यांनी सांगितले.
पहिला ः धार्मिक विधीनुसार विवाह करतो, तो विवाह झाल्यानंतर सरकारी कार्यालयात त्या विवाहाची नोंद करणे.
दुसरा ः बऱ्याचदा कोर्टमॅरेज करण्यात येते. ती पद्धत म्हणजे, विवाह करतानाच तो नोंदणीपद्धतीने करणे. अशा पद्धतीने विवाह केल्यास वेगळ्या विवाह नोंदणीची आवश्‍यकता नसते.
विवाह नोंदणी कशी करावी?
धार्मिक पद्धतीने विवाह झाल्यानंतर शहरी भागांत क्षेत्रीय कार्यालयात; तर ग्रामीण भागांत ग्रामपंचायत कार्यालयात ही नोंदणी करता येते. विवाह नोंदणी अधिनियम सन 1998 नुसार (सन 1999 चा अधिनियम क्र.20) ही नोंदणी करण्यात येते. विवाह नोंदणी कार्यालयात गेल्यानंतर नोंदणी करण्यासाठीचा "नमुना ड' हा अर्ज भरावा. या अर्जाची किंमत 104 रुपये आहे. त्यावर 100 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावावे. यावेळी वधू आणि वर हे विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष हजर असणे बंधनकारक आहे. तसेच सोबत तीन साक्षीदारही असणे आवश्‍यक आहे. वधू-वर आणि तीन साक्षीदार यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर अर्जावर स्वाक्षरी करावी लागते. ज्या पुरोहित-भटजी यांनी विवाह लावला त्यांची माहिती द्यावी लागते. तसेच त्यांची स्वाक्षरीही आवश्‍यक असते. मुस्लीम व्यक्तींच्या विवाहात काझी यांची माहिती व त्यांची स्वाक्षरी असावी. तसेच सोबत निकाहनाम्याची अटेस्टेड प्रत जोडावी. निकाहनामा जर उर्दू भाषेत असेल, तर त्याचे इंग्रजी किंवा मराठी भाषांतर करून त्यावर संबंधित काझी यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत अर्जाला जोडणे आवश्‍यक असल्याचेही देसर्डा यांनी सांगितले.
आवश्‍यक कागदपत्रे कोणती ?
- वधू व वर यांचा रहिवासी पुरावा (उदा. रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
- वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा. शाळा, सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
- लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नाची पत्रिका, लग्नाची पत्रिका नसल्यास ऍफिडेव्हिट द्यावे लागते. तसेच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्‍यक असते.
- तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे (उदा. रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
- वर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत.
- वर-वधू , विधुर-विधवा असल्यास संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला सत्यप्रतीसह.
शुल्क किती?
- विवाहानंतर तीन महिन्यांच्या आत नोंदणी केल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागते.
- तीन महिन्यांनंतर एक वर्षापर्यंत नोंदणी केल्यास 50 रुपये शुल्क व 100 रुपये दंड असे 150 रुपये आकारण्यात येतात.
- विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर नोंदणी केल्यास 50 रुपये शुल्क व 200 रुपये दंड असे 250 रुपये आकारण्यात येतात.
नोंदणी प्रमाणपत्र कधी मिळते?
- योग्य ते शुल्क भरल्यानंतर व सर्व कागदपत्रे विवाह निबंधक कार्यालयात सादर केल्यानंतर, त्या कागदपत्रांची छाननी होते.
- नोंदणीच्या कामात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येते.
- सादर केलेल्या अर्जाची विवाह रजिस्टरमध्ये नोंद होते.
- या सर्व प्रक्रियेनंतर दोन दिवसांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते.
नोंदणी पद्धतीने विवाह कसा करावा?
देवस्थानच्या ठिकाणी केले जाणारे प्रेमविवाह म्हणजेच कोर्टमॅरेज, असा अनेक जणांचा समज असतो; पण तसे नसते, तर कोणत्याही धार्मिक विधीशिवाय विवाह अधिकाऱ्यासमोर पती-पत्नी आणि 3 साक्षीदार यांच्या स्वाक्षरीने होणारा विवाह म्हणजे "नोंदणी पद्धतीचा विवाह' होय. या विवाहाची नोंदणी 1954 च्या स्पेशल मॅरेज ऍक्‍टनुसार केली जाते. या ऍक्‍टनुसार विवाह केल्यावर वेगळ्या विवाह नोंदणीची गरज नसते. नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठीही तीन साक्षीदार असणे आवश्‍यक असल्याचे पुणे जिल्ह्याचे विवाह अधिकारी आर. एम. पारेकर यांनी सांगितले.
प्रक्रिया काय?
- नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची सोय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली असते.
- ज्या वधू आणि वर यांना नोंदणी पद्धतीने लग्न करावयाचे आहे, त्यांनी विशिष्ट पद्धतीचा अर्ज विवाह अधिकाऱ्याला भरून द्यावा. यालाच नोटीस असेही म्हणतात.
- नोटीस दिल्यानंतर विवाह अधिकारी, मॅरेज नोटीस बुकमध्ये त्याची नोंदणी करतो.
- नोटीस बुकमध्ये नोंदणी केल्यानंतर ती नोटीस विवाह अधिकाऱ्याला कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असते.
- विवाह करण्यासाठी अर्ज केलेल्या वधू - वर यांच्यापैकी कोणाही एकाचे, नोटीस देण्याअगोदर त्या भागात किमान तीस दिवस वास्तव्य असणे आवश्‍यक असते.
- वधू- वर यांनी ज्या ठिकाणी अर्ज केला आहे, ते त्या भागाचे कायमचे रहिवासी नसतील तर तसे त्या नोटिशीत नमूद करून ते ज्या ठिकाणचे रहिवासी आहेत, त्या ठिकाणच्या कार्यालयातदेखील विवाह अधिकारी ती नोटीस लावू शकतो.
- नोटीस लावल्यानंतर जर कुणाला या विवाहाबद्दल आक्षेप असेल, तर तो आक्षेप लेखी स्वरूपात 30 दिवसांच्या आत नोंदविणे आवश्‍यक असते. आक्षेप आल्यास विवाह अधिकारी त्याची तपासणी करतो. आक्षेप निर्मूलन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत विवाहाची नोंदणी करता येत नाही.
- नोटीस 30 दिवस सूचना फलकावर ठेवली जाते, त्यावर कोणतेच आक्षेप आले नाहीत, तर विवाह नोंदणीची प्रक्रिया केली जाते. विवाह अधिकाऱ्यासमोर वर आणि वधू यांना तीन साक्षीदारांच्या समोर विवाहाची शपथ देण्यात येते. त्यानंतर विवाह अधिकारी विवाह नोंदणी पुस्तिकेत विवाहाची नोंद करतात.
- नोटिशीवर आक्षेप न आल्यास त्यानंतर 60 दिवसांच्या आत विवाह करणे आवश्‍यक आहे. त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास संबंधित नोटीस बेकायदा मानण्यात येते.
- विवाह निबंधक कार्यालयात तसेच वधू-वर यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी हे विवाह केले जातात; मात्र ठिकाण बाहेरचे असेल तर नोंदणी करण्यासाठी विवाह अधिकारी प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्‍यक असते.
- नोटिशीच्या तीन प्रती सादर कराव्या लागतात. त्यातील एक प्रत वधू-वर यांच्याकडे देण्यात येते. विवाह नोंदणीच्या वेळी ती प्रत सोबत घेऊन यावी लागते.
कागदपत्रे कोणती?
धार्मिक पद्धतीने विवाह करताना जी कागदपत्रे सादर केली जातात, तीच कागदपत्रे नोंदणी पद्धतीने विवाह करताना सादर करावी लागतात.
शुल्क ?
- विवाहासाठी नोटीस देण्याची फी - 1. वधू-वर दोघेही स्थानिक रहिवासी असल्यास नोंदणी फी 50 रुपये.
2. वर-वधू या दोघांपैकी एक जण कार्यालयाच्या क्षेत्राबाहेर राहात असल्यास 100 रुपये.
3. वर - वधू या दोघांचे कार्यालयाच्या क्षेत्राबाहेर कायमचे वास्तव्य असेल व त्या दोघांपैकी एकाचे कार्यालय क्षेत्रात किमान 30 दिवस वास्तव्य असेल तर 150 रुपये.
4. विवाह नोंदणी करण्यासाठी विवाह अधिकारी बाहेर येणार असेल तर 150 रुपये (कार्यालयापासून 10 किमी क्षेत्राच्या आत असल्यास), दहा किमीपेक्षा विवाह नोंदणीचे अंतर जास्त असेल, तर पुढील अंतरासाठी 1000 रुपये भरावे लागतात.
प्रमाणपत्र कधी मिळते?
विवाह झाल्यानंतर लगेचच प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राची 150 रुपये फी आकारली जाते.
""वधू-वर विवाहासाठी येतात, तेव्हा गोंधळलेले असतात. आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या प्रक्रियेला सुरवात करता येते, कोणत्याही मध्यस्थाकडे न जाता स्वतःच ही प्रक्रिया समजून घ्यावी,'' असेही विवाह अधिकारी पारेकर यांनी सांगितले.

विवाह प्रमाणपत्र हे महत्त्वाचे डॉक्‍युमेंट लग्नाचे प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे "डॉक्‍युमेंट' आहे. या कागपत्रामुळेच विवाह कायदेशीर होतो. लग्नानंतर मुलीचे नाव बदलते, त्यासाठी हे प्रमाणपत्र पुरावा म्हणून वापरण्यात येते. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात जोडवी एवढे केल्यावर पती-पत्नीचे नाते अस्तित्वात येते; पण ते नाते कायदेशीर होत नाही, याबाबत आजही अज्ञान आहे. विवाह झाल्यावर पती-पत्नी नात्यात काही तेढ निर्माण झाली, तर न्याय मिळविणे या नोंदणीमुळे सोपे जाते, असे ऍड. अमृता देसर्डा यांनी सांगितले. विवाह नोंदणीचा सर्वांत जास्त फायदा हा पत्नीला होतो. कारण हे प्रमाणपत्र नसल्यामुळे पोटगी मिळविणे, घटस्फोट घेणे अशा कायदेशीर प्रक्रियेत अडथळे येतात. पतीच्या निधनानंतर संपत्तीवाटप होण्याच्या दृष्टीनेही या प्रमाणपत्राचे महत्त्व आहे. पत्नीला कायद्याने दिलेले हक्क सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठीही हे प्रमाणपत्र आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विवाह नोंदणी आता अनिवार्य सर्वधर्मीय विवाहांची कायदेशीर नोंदणी बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी 1969 च्या जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. देशातील सर्व विवाहांची नोंदणी झाल्यास विवाहाचा पुरावा देण्यास, तसेच पती-पत्नीच्या वादात अपत्यांचा ताबा कोणाकडे असावा, यांसारख्या महिलांसमोर येणाऱ्या कायदेशीर अडचणी टळू शकतील. 2006-07 मध्ये विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची आणि ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याची शिफारस लोकसभेच्या महिला सक्षमीकरणाबाबतच्या एका समितीने केली होती. मंजूर झालेले विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मांडले जाणार असून त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीच्या अवलोकनासाठी पाठवले जाईल.  When the office of the official record of the marriage is required. And how to register as a ? If you want to get married , what method of entry method , detailed information about the charges .Relatives , friends of the attestion dhumadhadakyata was married , her husband - wife, as the world was , but the idea of law caukatituna If you are not registered marriage , unless the marriage is not considered legal . Many marriages have been caliritinusara each , or a direct entry vivahanci relatively low rate is only about the awareness is increasing . The Marriage Registration Act , 1998 According to the register is held. Marriage Registrar in rural areas and urban areas, the gramsevaks register . The Union Cabinet recently approved the registration of marriage is compulsory to offer . You must be registered , but is not compulsory . The marriage is not registered and can be found in the number of couples . Know the importance of marriage registration points , Insufficient information about registration , because of the misconception that the karanyamage are not registered .Two types of marriage registrationThis is where you will be married in the same village or place of any such obligation, to register the same . Any part of the wedding , the relevant documents can be deposited in the office of the Register if the wedding . Then, the birth - death is recorded , it is a government office marriage registration . Add the two types of marriage or common entry . Amrita desarda said.Vidhinusara : The first religious marriage is , then the marriage after the official marriage registration office .The second is : The Often kortamereja . The way , when you get married to nondanipaddhatine . If the marriage does not need a separate method in the marriage registration .How to register a marriage ?Urban areas, the regional office of the religious basis of the marriage , the office of the Gram Panchayat in rural areas can be registered . Marriage Registration Act 1998 in accordance with ( Act No. 1999 of .20 ), this registration is held. Marriage registration office at the register to receive " Form D of the Application allowed . , Or application cost 104 rupees is . Then 100 Rs court fee stamp lava . The bride and groom and wedding registry adhikaryasamora physical presence is mandatory . , As well as with the three witnesses must be . daughter-in-law - and on the three witnesses to the marriage registration adhikaryasamora application signature required . the priest - bhataji the marriage was their information should be required. well as their signature is required . Moslem people of marriage Kazi of the information and the signature should be . , as well as with nikahanamyaci atesteda copy jodavi . give triple talaq in the Urdu language , a translation of the English or Marathi and the signature of the Kazi and the need to add a copy of the application asalyacehi desarda said.

What are the necessary documents ?- Proof of residence of the bride and groom (eg, ration card , telephone bill , electricity bill , passport and mulapratisaha satyaprati ).- Proof of age of the bride and groom (eg schools, Leaving Certificate , Birth Certificate of mulapratisaha satyaprati ).- Lagnavidhi prasangica photos, magazine, marriage , marriage magazine ephidevhita If you do not have to be . Marriage and Registration of Marriage lavalelya purohitaci signature is required on the application .- Three Witnesses Residential Proof ( eg Ration Card , Passport, Voter ID card of mulapratisaha satyaprati ).- If the Court's hukumanamyaci satyaprata Divorced bride and groom .- To - law, widower - the widow if the deceased person's death certificate to the original satyapratisaha .The charge ?- Within three months after the marriage registration marriage registration certificate if you have to pay the fee of Rs 50 .- Three months after a year registration fee of Rs 50 and Rs 100 , if the penalty is charged at Rs 150 .- At the end of one year after the marriage registration fee of Rs 50 and Rs 200 , if the penalty is charged at Rs 250 .The registration certificate is ?- The payment of the appropriate fee and all documents in the office of the Registrar after the wedding , the documents are scanned .- Registration No work should not mis - taken care of for .- Application of the entry in the marriage register is .- The process is two days after the marriage registration certificate .How to register a marriage system ?Shrine at being love match the kortamereja , and many people understand that , but they are not , and any religious vidhisivaya marriage adhikaryasamora husband - wife and 3 witnesses to the signature due to marriage, the " Registration procedure marriage ' Yes . , Or marriage registration in 1954 the Special Marriage ektanusara It is . ektanusara marriage or after marriage registration does not require a separate . vivahasathihi registration method must be three witnesses to the Marriage Officer R. Pune . M. . parekara said. 


What is the Registration process of marriage?- Registration of the method have been married to the convenience of each district Collector 's office .- The method of registration of the bride and groom wants to get married , the marriage official application form should be in a particular manner . Notice also called .- Notice is given at the end of the marriage , Marriage Registration will notice it in the book .- After notice to the marriage notice book entry on the official notice board in the office is required to apply .- Applied for a marriage to the bride - to anyone between the one , at least thirty days notice to the denyaagodara to where it needs to be lived .- The bride - on the place of application is , to where it will not be a permanent resident of the place of residence of the notisita mentioned that they are , they can put a notice in the official wedding location karyalayatadekhila .- Notice of objection vivahabaddala lavalya at someone or if it is required to register an objection in writing within 30 days . If the marriage does not verify the object . Marriage registration can not be completed unless an objection elimination .- 30 days notice on the notice board is kept , the object could not be konateca , the marriage process is . Three witnesses to the marriage, the bride and groom in front of the adhikaryasamora marriage oath is given. Marriage registration marriage registration book of the Marriage Officer .- Notice of Objection within 60 days of the marriage, if you do not need to . If the notice is deemed illegal more days .- In the office of the Registrar -in-law marriage - the marriage are any places on the break , the location of the wedding will be outside the Marriage Officer to register at the time of the stay is required .- What are the notice of over three . A copy of the law - to be given to the . A copy of the marriage at the time of registration should be required to carry this .Which documents ? 

Documents are the basis for religious marriage , marry the same method of registration documents are to be produced . 
Fees?- Notice to fees for marriage - 

1. Daughter-in-law - on both a local resident if the registration fee of Rs 50 .2. - On a couple or two people in the office area of the State if the 100 .3. - On both sides of domicile in the office area at least 30 days in the office and one of the two is actually 150 .4. To register the marriage, the marriage officer will be Rs.150 ( from the office of the area within 10 km if any) , the difference is more miles than the marriage registration , the distance to the next pay is Rs 1000 .The certificate is ?Marriage certificate immediately after calving. This certificate fee is Rs 150 ."" Daughter-in-law - to be on the marriage , but are gondhalalele . If you comply with the required documents to begin the process for marriage registration method can be any madhyasthakade should understand this process itself is not ,'' he said parekara Marriage Officer .

The marriage certificate is an important document that 


Marriage certificate and one of the important " document " . These kagapatramuleca marriage legal is . Marriage at the girl 's name changed to this certificate, proof as is used . Hand mangalasutra , forehead on the spangle , found jodavi But when the husband - wife relationship exists is , but as a legal it is , by the time of ignorance is . marriage after the husband - wife relationship and estrangement was , and justice to achieve nondanimule easy to get , and add . Amrita desarda said. marriage Registration most advantages wife is . because this certificate because the alimony to get , the legal process of divorce can be obstacles . husband 's demise at the end of the sampattivatapa drstinehi this certificate is important . rights issued under the Scheme wife of milavinyasathihi asalyacehi this certificate was required .

The marriage registration mandatory 


Registration required to offer legal sarvadharmiya vivahanci The Union Cabinet has recently approved . In 1969, the Births - Deaths Registration Act, would be an improvement . If proof of marriage to register all the vivahanci , as well as the husband - wife , who promised to be apatyanca control , such as legal problems encountered mahilansamora can talu . In 2006-07, the marriage registration mandatory to make this process more clutter-free and recommended that the Committee is that reality is a woman saksamikaranababata . Been approved for the current session of Parliament will be put to the end of the parliamentary standing committee will be sent to avalokana .


No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email