Saturday, July 3, 2010

फेंगशुई म्हणजे काय?

फेंगशुई म्हणजे काय?
 


 

 

 

हे शास्त्र लहरींवर , दिशांवर आणि ' त्रिनिटी ऑफ लक ' - अर्थात आपले जन्मजात लक , 

आपल्या कर्मातून प्राप्त होत असलेले लक तसेच निसर्गाचे लक - यावर आधारित आहे. सध्या फेंगशुईचा बाजार मांडला गेला आहे. ग्राहकाने डुप्लीकेट कन्सल्टन्ट आणि त्यांनी विकलेल्या मालापासून सावध राहावे

फेंगशुईचा सरळ सोपा अर्थ आहे हवा पाणी. आजकाल बाजारात फेंगशुईच्या वस्तूंचा बाजार मांडलेला दिसतो. लाफिंग बुद्ध , ड्रॅगन , कासव , तीन पायांचा बेडूक , क्रिस्टल अशा अनेक... शेजा-याच्या घरात फेंगशुई वस्तू दिसली की आपण तशी वस्तू आणून घरात ठेवतो. पण ती वस्तू ठेऊन तुम्हाला काय फायदा होणार ? तिची जागा काय आहे ? ती वस्तू ओरीजनल आहे की डुप्लीकेट याची साधी शंकाही आपल्या मनात येत नाही. आज बाजारात फेंगशुईच्या ९० टक्के वस्तू डुप्लीकेट आहेत. काही माणसे नुसती पुस्तके वाचून स्वत:ला कन्सल्टन्स म्हणून संबोधतात. कुठल्याही खऱ्या कन्सल्टन्टचे मलेशिया किंवा सिंगापूर येथे रजिस्ट्रेशन असते. तसेच त्यांच्याकडे तसे सटिर्फिकेटही असते. फेंगशुई हे लहरींवर तसेच दिशांवर आधारित शास्त्र आहे. आपण बघतो की आमावस्या अथवा पौर्णिमेला सायकिक लोकांना अॅटॅक येतात ते हवेतील लहरींमुळे येतात. समुदाला भरती असेल आपल्या हाताला जखम झाली असेल तर रक्त लवकर थांबत नाही. कारण शरीरातील ब्लड सर्क्युलेशन जोरात होत असते. तुम्ही जेव्हा एखाद्या संत माणसाचे व्याख्यान ऐकता तेव्हा अर्ध्या तासापुरता का होईना तुमचा विचार करण्याचा कल त्या व्यक्तीसारखा असतो. आपण म्हणतो लहान मुलांवर संस्कार होतात. संस्कार म्हणजे काय ? तर लहान मुलांवर सभोवतालची माणसे तसेच तेथील वस्तू यांच्या लहरी त्यांच्यावर परिणाम करत राहतात. आपण आपल्या मुलांना वाईट मुलांची संगत नाही ना हे पाहतो. म्हणजेच वाईट विचारांच्या व्यक्तींच्या लहरी सतत दुस-या व्यक्तींवर पडून दुस-या व्यक्तीही हळुहळू त्या व्यक्तीसारखा विचार करायला लागतात. म्हमजेच सभोवतालच्या वातावरणातील लहरींचा तुमच्यावर परिणाम होत असतो

फेंगशुई हे ' त्रिनिटी ऑफ लक ' वर आधारलेले शास्त्र आहे

हेवन लक - हे आपले जन्मजात लक म्हणजेच नशीब हे ४० टक्के असते

मॅन लम (कर्म) - काही माणसे अतिशय विरुद्ध परिस्थितीतून अतिशय मेहनत करून यश संपादन करतात हे ' कर्म ' आपल्या आयुष्यात २५ टक्के साथ देते

अर्थ लक - म्हणजेच जमिनीचे , निसर्गाचे लक हे आपल्या आयुष्यात ३५ टक्के साह्य करते फेंगशुई हे अर्थ लकवर आधारित आहे. जमिनीचे लक आपण सहज बदलू शकतो
/photo.cms?msid=2857874निसर्गाच्या नियमाप्रमाणे निसर्गाचे प्रॉडक्टिव सायकल खालीलप्रमाणे चालते. पाणी झाडांना (लाकूड) मोठे करते. लाकूड जळल्यावर अग्नी उत्पन्न होतो. अग्नी जळल्यानंतर लाकडाची राख म्हणजेच माती (जमीन) उत्पन्न होते. जमिनीतून धातू काढला जातो. धातू वितळल्यावर पाण्यासारखा वाहतो

या पाच एलिमेंटच्या वस्तू लक्षात ठेवा. खालील एलिमेंट वापरताना त्याचे कलरही लक्षात ठेवा

धातू - मेटल , स्कल्पचर , डेकोरेटिव्ह मेटल डिस्प्ले , मेटल टेइलियम क्लॉक , मेटल विड चाइम , बेल 

पाणी - फिश टँक , पाण्याचे धबधबे 

लाकूड - झाडे , फुले , लाकडी वस्तू 

अग्नी - लॅम्प , मेणबत्या , इलेक्ट्रिकल वस्तू , गॅस , बर्नर 

जमीन - मातीच्या वस्तू , मातीची भांडी , सिरॅमिक भांडी , क्रिस्टल , दगड , गोटे 

आपल्या स्वप्नातले घर प्रत्येकाच्या मनात असतेच किंबहुना प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे घर बनविण्यासाठी ते सजवण्यासाठी आपल्या आवडीचे फर्निचर बनविण्यासाठी तत्पर दिसतो. त्या घराच्या रंगसंगती , फर्निचरचे आकार तुमच्या बैठकीच्या जागा , स्वयंपाक घरातील प्लॅटफॉर्मच्या दिशा , तुमच्या बेडच्या दिशा , पाण्याचे नळ हे त्या प्रत्येक माणसाच्या तो कुठल्या ग्रुपचा माणूस आहे '' पूर्व गुप अथवा पश्चिम '' गुप यावर आधारीत असतात. जेव्हा घराचे कन्सल्टींग केले जाते तेव्हा घरातील व्यक्तीच्या जन्मतारखेवरून कंुडल्या बनवल्या जातात या कुंडल्यांचा संबंध वास्तूशी असतो

या कुंडल्यांवरून प्रत्येक व्यक्तीला चार चांगल्या दिशा येतात चार वाईट दिशा येतात. आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा म्हणजे त्या वास्तचे मुख हे घरातील '' हेड ऑफ मॅन '' ला फेवरेबल पाहिजे. मग कुंडलीप्रमाणे त्याला चार दिशांपैकी कुठलीही चालते आणि चार वाईट दिशेत दरवाजा असेल तर फेंगशुईद्वारे तोडफोड करता तो दरवाजा तुम्हाला फेवरेबल करून घेता येतो. शिवाय फेंगशुईच्या -या प्राणप्रतिष्ठा केलेल्या वस्तू ठेवून तुम्ही बाकीची निगेटिव्हिटी काढू शकता. हे पुढील तक्त्यानूसार तुम्हाला सहज कळू शकेल

फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या रचना 

उत्तर - भवितव्य आयुष्यक्रम आणि सुसंधी (पाणी) मेटल कासव पाणी , मत्स्य टाकी , झरा (फाऊंटन) ठेवणे 

दक्षिण - प्रसिद्धी आणि ओळख (अग्नी) प्रमाणपत्रे , बक्षीसे , भेटवस्तू किंवा कोणतीही लाल वस्तू ठेवणे

पूर्व - कौटुंबिक आरोग्य (लाकूड) चांगल्या आरोग्यासाठी सपक्ष ड्रॅगन मुखी कासव , हरणाचे किंवा , बगळ्याचे चित्र आणि चांगल्या उत्साहासाठी सपक्ष सर्प (ड्रॅगन) ठेवणे

पश्चिम - कल्पकता आणि मुले (धातू) सात रॉड असलेल्या विंडचाईम धातू ठेवणे मुलांचे चित्र ठेवणे , पाच रॉड विंडचाईम

ईशान्य - (जमीन) ज्ञान , पृथ्वी , ज्ञानाचा मनोरा , पृथ्वीचा गोल आणि स्फटीकाचे बॉल्स ठेवणे

वायव्य - (धातू) मदत करणारे मित्र/ परदेशगमन ऐंजल (देवदूत) सुवर्ण घंटीचा जोड किंवा रॉडचा विंडचाईम

आग्नेय - (लाकूड) धन , चांगले सुदैव- जेड वनस्पती , चाईनिज नाणे , ड्रॅगन मुखी , कासव यास ठेवणे

नैऋर्त्य - (जमीन) विवाह , संबंध , लव बर्डस , मॅडेरीयन बदक , कबुतरांचा जोड , गुलाबी स्फटिकाचा जोड ठेवणे

क्रिस्टल 

ऑस्ट्रियन क्रिस्टल - जर , तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेस टांगल्यास ते कौटुंबिक सदस्यांच्या आयोग्य , धन आणि दीर्घायुष्यासाठी चांगले असते , ईशान्य दिशेस शैक्षणिक नशिबासाठी , जर शयनगृहात नैऋत्य असे टांगल्यास पतीपत्नीचे संबंध चांगले राहतात

एन्जॉईस सॉल्ट - नकारात्मक उत्साह शोषण्यासाठी 

उत्साहित मीठ

क्लस्टर ऑफ क्रिस्टल (स्फटिकांचा समूह) - स्फटीक हे नकारात्मकता शोषून घेते. हे (नैऋर्त्य) दिशेस उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेस किंवा घराच्या मध्यभागी ठेवू शकतात. हे खडे मिठात बुडवून आणि उन्हात ठेवून मग त्याचा वैयक्तिक उपयोग करू शकता

पा कुआ मिरर - अतिशय वाईट लहरी टाकण्यासाठी घराच्या बाहेर पा कुआ मिरर टांगा

यशासाठी फिनिक्स - फिनिक्स हा फेंगशुई आणि चायनिज पुराणांमध्ये एक दिव्य प्राणी आहे. हे इच्छापूर्तीचे नशीब दर्शविते. फिनिक्स हा दक्षिण बाजूस अत्यंत परिणामकारक कार्यशील आहे. तसेच अडलेली कामं सुरळीत होण्यासाठी , तुमच्या नशिबाचा उत्साह वाढविण्यासाठी फिनिक्सचे सूचक चित्र किंवा फिनिक्सचे चित्र ऑफिसच्या दक्षिण कोप-यात चिटकवा. फिनिक्स उपयुक्त आहे

क्योटो विंडचाईम - आपल्या आकर्षक काळ्या विंडचाईमला पोकळ नळ्या असतात आणि त्या नारळास एक विशेष स्पर्श करतात आणि लक्षात ठेवा फेंगशुईच्या मूलतत्त्वाप्रमाणे काळे हे पैशाचे प्रतिनिधित्व करतात आणि हवेचा प्रवाह हे ज्याला विशेष चित्तवेधक विंडचाईम बनवतात जेणेकरून पुढे समृद्धिच्या प्रवाहास आमंत्रित करतात

बेल आणि डॉर्ज - बेल आणि डॉर्जी यांचा उपयोग तिबेटीयन बुद्धिस्ट काही विशेष धार्मिक विधीसाठी करतात. धार्मिक घंटा ही बुद्धाच्या आणि इतर देवतांच्या सानिध्यासाठी उपयोग करतात आणि काही विशिष्ट धुनीवर गाण्याचा ताल ठेवण्यासाठी करतात. त्याच्या रीमला लाकडी काठीने घासून त्याचा आवाज करू शकतात

डॉर्जे - (विजा आणि गडगडणे) हे संस्कृती आणि नाहीसे होणारे सत्य याचा कल्पनांची दृष्य स्वरूप देतात दोन्ही घंटी आणि डॉर्जेचा उपयोग एकत्रित धार्मिक विधीसाठी करतात. तसेच घरातील क्लेश बाहेर काढण्यासाठी उपयोग होतो

 


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive