Wednesday, July 28, 2010

अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठी अहवालफुटी

अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठी अहवालफुटी

 

 

अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील सर्वात मोठी अहवालफुटी मानल्या गेलेल्या विकिलीकच्या मागे अमेरिकी गुप्तचर संघटनेतील २२ वर्षांचा एक तरुण असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या अहवालफुटीमुळे दहशतवादाच्या बाबतीत पाकची दुटप्पी भूमिका उघडी पडली असून आयएसआय-तालिबान संबंधांवर प्रकाशझोत पडला आहे. 

ब्रॅडले मॅनिंग असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने काही दिवसांपूवीर्, आपण लवकरच अफगाण युद्धाबाबत सर्व सत्य बाहेर काढणार असल्याची गभिर्त धमकी इंटरनेटवर दिली होती. त्याला मे महिन्यातच बगदाद येथे अटक करण्यात आली असून जुलैच्या सुरुवातीला त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले. आता मॅनिंगवर कोर्ट मार्शलची कारवाई होणार आहे. 

हा अहवाल उघड करण्यासाठी त्याने 'बर्डास८७' हे नाव ऑनलाइन वापराकरता घेतले होते. तसेच त्याने कॅलिफोनिर्यातील हॅकर आदियन लामो याची मदत घेतल्याचेही समोर आले आहे. आपण अमेरिकी लष्करात असून आपल्याला अनेक गोपनीय माहिती हाताळण्याचा अधिकार असल्याचे त्याने लामो याला सांगितले होते. 

पाकवर दबाव टाकणार 

अमेरिकाविरोधी कारवाई करणाऱ्या गटांना आयएसआय मदत पुरवते, हे अहवालफुटीतून उघड झाल्यानंतर सोमवारी अमेरिकेने पाकची बाजू सावरली होती. मात्र आता अमेरिकेतील अनेक मुत्सद्दी या अहवालातील माहितीचा वापर करून दहशतवादविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी पाकवर दबाव टाकण्याच्या विचारात आहेत. 

आयएसआय-तालिबान यांचे एकमेकांशी लागेबांधे असून अफगाणमधील अमेरिकेच्या पथकांविरोधात आयएसआयनेच या दहशतवादी संघटनांना मदत केली होती, असे अहवालफुटीतून समोर आले होते. त्यानंतर सोमवारी अमेरिकेने पाकशी असलेल्या सहकार्यावर आणि संबंधांवर परिणाम होणार नाही, हा अहवाल ओबामा प्रशासनाने पाकशी सहकार्य करार करण्याआधीचा आहे, असे सांगत पाकची पाठराखण केली होती. सुरक्षा समितीचे सल्लागार जेम्स जोन्स यांनी पाकचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगत दहशतवादविरोधातील लढाईत केलेल्या कार्याबद्दल पाकची पाठ थोपटली होती. 

मात्र मंगळवारी अमेरिकी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपला पवित्रा बदलत पाकबरोबर असलेल्या संबंधांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच दहशतवादविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी पाकवर दबाव टाकता येईल, असे अनेक अधिकाऱ्यांचे मत आहे. 

या अहवालाफुटीनंतर उभयतांतील सहकार्याला खिळ बसण्याची शक्यताही अनेकांनी वर्तवली. 

पाकचे अधिकारी अफगाणमधील फुटीर गटांना अमेरिकाविरोधी कारवाया करण्यात सहकार्य करतात, ही गोष्ट आपल्या दृष्टीने काळजी करण्यासारखी आहे, असे मिशिगनचे खासदार कार्ल लेविन यांनी सांगितले. 

या अहवालफुटीमुळे ओबामा प्रशासनावर दबाव आला आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका करत असलेल्या युद्धखर्चावर काँग्रेसने झोड उठवली आहे. त्यातच सैन्याला अफगाणमध्ये अतोनात हानी सहन करावी लागत असल्याने वॉशिंग्टनच्या अफगाण धोरणावर टीका होत आहे. 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive