Sunday, July 18, 2010

नमस्कारांचा चमत्कार!

नमस्कारांचा चमत्कार!

 

सूर्यनमस्कार हा म्हटले तर कोणतेही साधन लागणारा अगदी साधा व्यायाम. बारा आसनांनी बनलेला. परंपरेने चालत आलेल्या या व्यायामाचे सगळे फायदे आता वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झाले आहेत. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्यही टिकवण्याची ताकद सूर्यनमस्कारांत आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा संगम करून अनेक तज्ज्ञांनी साकारलेल्या खास गंथाच्या प्रकल्पाच्या निमित्ताने...

....

आजची जीवनशैली वेगाने बदलतेय. हा बदल आयटी आणि बीपीओमधल्या तरुणांनी जास्त अनुभवला. कामाच्या अतिरिक्त वेळा आणि बैठी कार्यशैली, हा महत्त्वाचा बदल सांगता येईल. यामुळे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक हालचाली मात्र कमी झाल्या. स्पर्धा आणि वाढत्या कामामुळे मानसिक ताणही वाढला. ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी व्यायाम, योगासने यांच्यावर भर देण्यापेक्षा नाइट आऊटिंग, पाटीर्, आऊटडोअर फ्रिकआऊटला प्राधान्य दिले जाऊ लागले; पण व्यायाम, योगासने, मेडिटेशन, सूर्यनमस्कारामुळेही ताण हलका होतो आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येते, हे फार कमी जणांना गवसलेले सूत्र.

यामध्ये सूर्यनमस्काराचे महत्त्व अधिक आहे. सूर्यनमस्कारातील बारा स्थिती म्हणजेच आसने शारीरिक आणि मानसिक आरोग्य देतात. परदेशात सूर्यनमस्कारांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे. सिडनीमध्ये तर रस्त्यांवर सूर्यनमस्कारातील आसनांचे कट आऊट्स लावलेले दिसतात! इतके महत्त्व असलेल्या सूर्यनमस्कारांवर डॉ. मिलिंद मोडक आणि सुधाकर जोगळेकर यांनी 'विज्ञान आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून सूर्यनमस्कार' हे पुस्तक सिद्ध केले आहे.

सूर्यनमस्कारावरांवरच्या विस्तृत पुस्तकांपैकी हे एक. सूर्यनमस्कार कसे घालायचे यापासून, त्यातील प्रत्येक आसनांचे आणि मंत्रांचे होणारे फायदे यावर यात प्रकाश टाकला आहे. वैदिक, मानसशास्त्र, क्रीडाशास्त्र, चायनीज योगशास्त्र, अध्यात्म यामधून सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगणारे हे एकमेव पुस्तक असावे. सूर्यनमस्कारामध्ये नुसती आसने करून उपयोगाचे नाही, तर प्रत्येक आसनासाठी विशिष्ट मंत्रोच्चार आहेत. त्यांचे अर्थ आणि महत्त्व साध्या सोप्या शब्दात पुस्तकामध्ये विशद केले आहे. रामभाऊ डिंबळे, डॉ. वनिता पटवर्धन, प्रा. उषा खिरे, डॉ. अरूण दातार, डॉ. पवन कोहली, मोरेश्वर कोहली आदी तज्ज्ञांनी विविध पैलू सांगितले आहेत.

'
पेशंटच्या दुखण्याचे मूळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींमध्ये दिसून येते. आर्थोपेडिक सर्जन या नात्याने मला 'प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइज' म्हणून सूर्यनमस्काराचे महत्त्व जास्त वाटते. हा परिपूर्ण व्यायामप्रकार असून, कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने त्याचे फायदे जास्त आहेत. फिजिकल (शारीरिक), फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल (मानसिक) आणि स्पिरिच्युअल (धार्मिक) अंगाने सूर्यनमस्काराचे महत्त्व अनन्य आहे. शारीरिक कमजोरी आणि मानसिक ताण हलका करण्यासाठी सूर्यनमस्कारासारखी दुसरी 'थेरपी' नाही. सायकोलॉजिकल (मानसिक), न्यूरोलॉजिकल (मेंदूशी संबंधित) आणि इम्युनोलॉजिकल (प्रतिकारशक्तीसंदर्भातील) ही सूर्यनमस्कारातील तीन महत्त्वाचे अंगे. हे फायदे यातील बारा आसनांमुळे होतात. ऋग्वेदामध्येही सूर्यनमस्काराचे महत्त्व लिहिलेले आढळते.' असे डॉ. मिलिंद मोडक सांगतात.

या पुस्तकातील काही मनोरंजक गोष्टी येथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. सूर्यनमस्कार आणि शारीरिक-मानसिक आरोग्याचा काय संबंध हे या पुस्तकात सांगितले आहे. आलेली मरगळ दूर करण्यासाठी सौर उर्जेसारखा नैसर्गिक स्त्रोत नाही. साधे उदाहरण द्यायचे तर, ढगाळ वातावरणानंतर बऱ्याच दिवसांनी सूर्य दिसल्यावर त्याचे कोवळे ऊन आल्हाददायक वाटते. मन एकदम प्रसन्न होऊन जाते. म्हणजेच, मानसिक आणि शारीरिक क्रिया सुरळित चालायच्या असतील, तर अवयवांना व्यायामाबरोबर सौर उर्जेचीही गरज असते. इतकी साधी गोष्ट आपल्या सहज लक्षात येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, किती आणि कोणत्या वेळेला सूर्यनमस्कार घालावेत. कधीही सूर्यनमस्कार घालण्यापेक्षा सूयोर्दयाच्या वेळी पूवेर्कडे तोंड करून मोकळ्या वातावरणात आसने करावीत. सूर्यास्ताच्या वेळेलाही सूर्यनमस्कार घालणेही फायद्याचे ठरते. सूयोर्दयाला घातलेल्या सूर्यनमस्कारांनी बायोलॉजिकल क्लॉक सुरळीत होण्यास मदत होते. आजच्या आयटी, बीपीओमधील तरुणांनी हे आवर्जून करण्यासारखे आहे. सूर्यनमस्कार नियमित घातल्याने फुफ्फुसाची क्षमता १००० मिलीपर्यंत किंवा त्यापेक्षाही आधिक प्रमाणात वाढते. वाढत्या प्रदूषणामध्ये फुफ्फुसाचे कार्य सक्षम ठेवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

सूर्यनमस्कारावर एखादी छोटी मार्गदर्शनपर पुस्तिका काढण्याऐवजी पुस्तक का लिहावेसे वाटले, यावर डॉ. मोडक म्हणतात, सूर्यनमस्काराच्या फायद्याचा आवाका पाहिला तर तो संशोधनाचा विषय आहे. त्यातील मंत्रांच्या फायद्यावर अनेक ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन सुरू आहे. सध्याच्या पिढीच्या शारीरिक आणि मानसिक तक्रारी पाहिल्या, तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व जास्त वाटते. सूर्यनमस्कार कसे घालायचे, कोणत्या वेळेला घालायचे, त्याचे मंत्रोच्चार, त्यांचा अर्थ, फायदे हे वरवर देऊन उपयोगाचे नव्हते, तर त्याचे स्पष्टीकरण देऊन वाचकांच्या मनात कोणतीही शंका राहता कामा नये, हा हेतू होता. म्हणून साधी पुस्तिका काढता विस्तृत पुस्तकच लिहायचे ठरवले. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचीही साथ मिळत गेली.

सूर्यनमस्काराचे मूळ भारतात आहे. भारतीयांनाच असलेल्या त्याच्या माहितीविषयी डॉ. मोडक समाधान व्यक्त करतात. ते म्हणतात, ''लोकांना सूर्यनमस्काराचे महत्त्व आता पटू लागले आहे. सूर्यनमस्काराचे स्वतंत्र क्लब्ज सध्या सुरू आहेत. अनेक शाळांमध्येही वर्ग घेतले जातात. इंटरनॅशनल कॅन्व्हासवरही सूर्यनमस्कारांची गरज लोकांना पटली आहे. पेपर रिडींगसाठी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर येथे दौरे केले, तेव्हा तिथली उत्सुकता लगेच लक्षात आली. आता या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद व्हावा, अशी मागणी होत आहे. यावरूनही सूर्यनमस्कारांचे महत्त्व लक्षात यायला हरकत नाही.''

आयुर्वेदाचे मूळ भारतात असून, त्याचे महत्त्व परदेशात आधी समजले. मग, भारतात प्रचलित झाले. सूर्यनमस्काराबाबतीतही असेच म्हणावे लागेल. कोणत्याही गोष्टीला आंतरराष्ट्रीय ओळख किंवा दर्जा मिळू लागला की, त्याचे महत्त्व आपल्याला पटू लागते. हा ठेवा जतन करून ठेवणे महत्त्वाचे. आपल्या प्राचीन ठेव्याचा वैज्ञानिक अभ्यास होणेही आवश्यक आहे. या पुस्तकाच्या प्रकल्पाच्या निमित्ताने हा अभ्यास झाला तो सर्वांसमोर आला, हीच आनंदाची गोष्ट आहे..

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive