Saturday, July 10, 2010

शहाजहानने ताजमहाल बांधला नाही, तर राजा जयसिंगाकडून बळकावला.

शहाजहानने ताजमहाल बांधला नाही, तर राजा जयसिंगाकडून बळकावला प्रा. पु.ना. ओक त्यांच्या `ताजमहाल : ट्रू स्टोरी' या पुस्तकात लिहितात, " ताजमहाल हे बेगम मुमताज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेले थडगे नव्हे, तर ते शिवाचे एक प्राचीन मंदिर होते. (`तेजोमहालय' या नावाने त्या वेळी त्याला ओळखायचे.) शहाजहान यांनी हे शिवमंदिर त्या वेळचे जयपूरचे महाराजा जयसिंग यांच्याकडून बळकावले. शहाजहान यांनी स्वत:च्याच दरबारातील बखर असलेल्या `बादशहानामा'मध्ये, मुमताजचे थडगे बनवण्यासाठी आग्रा येथील सुंदर ताजमहाल राजा जयसिंग यांच्याकडून बळकावल्याचे मान्य केले आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक कै. प्रा. पु.ना. ओक यांच्या `ताजमहाल : ट्रू स्टोरी' या पुस्तकातील अनेक पुरावे ताजमहाल शिवमंदिरच असल्याची साक्ष देतात.

 

मुमताज शहाजहान यांची प्रेमकहाणी ही दरबारातील खुशामतींनी घडवलेली एक दंतकथा आहे; कारण या प्रेमकहाणीचा कोणताही पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही, असा दावा प्रा. ओक यांनी केला होता. शहाजहान यांच्या खूप पूर्वीपासून ताजमहाल अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे प्रा. ओक यांनी सादर केले होते. ते पूर्वीचे शिवमंदिर होते आग्रा शहरातील रजपूत तेथे पूजा करायचे. उदा. न्यूयॉर्कमधील प्रा. मर्वीन मिलर यांनी कार्बन डेटींगचा आधार घेऊन ताजमहालच्या नदीच्या बाजूच्या दरवाज्याची चाचणी केली होती. त्यामध्ये त्यांनी तो दरवाजा शहाजहानच्या कालखंडाच्या ३०० वर्षे पूर्वीचा असल्याचे सिद्ध केले होते. मुमताजच्या निधनानंतर एक वर्षांच्या आत आग्रा येथे भेट दिलेल्या पीटर मुंडी, या ब्रिटीश व्यक्तीनेही ताजमहाल शहाजहानच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी अस्तित्वात होता, असे लिहून ठेवले आहे.

 

ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रा. ओक यांनी तेथील नमुने, वास्तूशिल्पकला यांचा आधार घेतला होता. ताजमहालाच्या अनेक खोल्या शहाजहानच्या काळापासून बंदच होत्या आताही त्या खोल्यांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तेथे शिर छाटलेली शिवाची मूर्ती हिंदूंच्या मंदिरांत वापरल्या जाणार्या इतर वस्तू आहेत. हे सत्य जगासमोर आल्यास राजकीय आकांडतांडव माजेल, या भीतीपोटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रा. ओक यांच्या पुस्तकावर बंदी घातली होती. विद्यमान सरकारने ताजमहालातील या खोल्या संयुक् राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या समक्ष खुल्या कराव्यात त्यांनाच त्यांची चौकशी करू द्यावी, ही अपेक्षा .

 

 





हे जे कायम जपायचे असते...... एकमेकांच्या यशासाठी आपले सर्वस्व अर्पण करायचे असते...... जीवनाच्या या वाटेवर तुजी नी माजी मैत्री जिवंत राहू दे....... तुझ्या काही सुंदर आठ्वानिंवर थोडासा माझाही हक्क राहू दे..!!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive