चोख्याची महारी
एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.
अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग
मी तूपण गेले वाया पाहता पंढरीच्या राया
हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले परी म्या धरिले पदरी तुमच्या
आता मोकलिता नव्हे नित बरी थोरा साजे थोरी थोरपणे
कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले
आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि
घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे
ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी
अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप
आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि
तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.
उपजता कर्ममळा वाचे विठ्ठल सावळा
विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर
विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी
बहु दिस झाले वाटतसे खंती केधवा भेटती बाई मज
असा रोकडा सवाल विचारत स्वत:च्या श्रद्धास्थानाशी भांडण मांडण्याचे बाळकडू त्याला सोयराबाईनं दिलं.
सातशे वर्ष उलटून गेल्यावरही तिची प्रतीक्षा संपलेली नाही.
No comments:
Post a Comment