'सगुण निर्गुण मूतीर् उभी असे विटे
कोटी सूर्य दाटे, प्रभा तिथे
वेदी जैसा वणिर्ला।
तैसा विटेवरी देखिला'
याचाच अर्थ असा की परब्रह्मा विश्वाचे आदितत्त्व हे अग्निस्वरूप आहे. भक्तांच्या कल्याणासाठी ते कधी पुरुष तर कधी स्त्रीरूपाने अवतरते.
औष्णिक उजेर्तून अवतरलेली शक्ती- एकादशी अवतरते.
एकादशी आणि विठोबा भिन्न नाहीत. एकाच मूळ अग्नितत्त्वाचे ते दर्शन आहे. ज्ञानेदेव म्हणतात,
'अग्निसेवा न सांडिता। कर्माची रेखा नोलांडिता।
आहे योगमुख स्वभावता। आपणाची।'
असं हे विठोबा-एकादशीचं नातं..
आषाढी एकादशीला सर्व भक्त उपवास करतात. उप+वास म्हणजे देवाच्या जवळ बसणे. देवाजवळ बसणे म्हणजे शक्तीची साधना करणे. देव शब्दाचा अर्थ प्रकाशणे. प्रकाश हा अग्नीचा गुणधर्म आहे. उजेर्ने धारण केलेले तेजस्वी बालिकेचे रूप म्हणजे एकादशी तिचा उपवास म्हणजे अग्नीची पूजा. हवन करणे हा एकादशीचा खरा उपवास. ही पूजा करण्यासाठी अंत:शुद्धी आवश्यक. हवनासाठी बसायचे तर शरीर हलके हवे तसेच कार्यक्षम हवे. तसे राहण्यासाठी पोषणमूल्ये असणारा फलाहार करावा. मूळ शब्द फराळ नसून फलाहार आहे. आषाढात पाऊस खूप असतो. पोटाला आराम मिळण्यासाठी लंघन फायदेशीर असते.
सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे..
ज्यास मान्य एकादशी। तो जिताची मुक्तवासी।
किंवा
एकादशी, एकादशी। जया छंद अहर्निशी
व्रत करी जो नेमाने। तथ वैकुंठाचे पणे
नामस्मरण जाग्रण। वाचे गाय नारायण
तोचि भक्त सत्य याचा। एका जनार्दन म्हणे वाचा।
No comments:
Post a Comment