Sunday, July 18, 2010

आयुर्वेदाचा अमेरिकन भाऊ

आयुर्वेदाचा अमेरिकन भाऊ

 

'कायरोप्रॅक्टिक' म्हणजे केवळ हातांचा वापर करून करावयाचे उपचार. ही प्राचीन अमेरिकन पद्धत आहे. तिचे आयुवेर्दाशी जवळचे नाते आहे. ही पद्धत आता नव्याने

 

प्रचलित होत असून अक्कलकोट संस्थानच्या पुढाकाराने सध्या ग्रामीण रुग्णांसाठी या पद्धतीचे मोफत शिबिर चालू आहे. त्यासाठी अमेरिकेतून डॉक्टरही आले आहेत. या निमित्ताने या उपचारपद्धतीची ही ओळख.
.................

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जोडीनेच जगातील प्राचीन शास्त्रेही आता विकसित होत आहेत. आयुवेर्द, होमियोपथी, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर अशा अनेक शास्त्रांवर जगभरात संशोधन होत असून या शास्त्रांचा उपयोग आणि प्रसार वाढत आहे. अर्थात तरी अजूनही तो शहरापुरताच मर्यादित राहिलेला दिसतो. ग्रामीण भागातील रुग्णांनाही या उपचारपद्धतींचा लाभ घेता यावा यासाठी अक्कलकोट येथील धर्मात्मा तात्याजी महाराज मेमोरिअल मेडिकल रिलीफ ट्रस्ट गेली अनेक वषेर् प्रयत्न करत आहे.

शिवपुरी आश्रमातून १९७६ पासून रुग्णसेवा दिली जाते. शिवपुरी येथील आयुवेर्दिक चिकित्सा केंदात दीड लाखाहून अधिक लोकांनी सेवेचा लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट येथील शिवपुरी आश्रमाकडून २५ जून ते जुलै कायरोप्रॅक्टिक आयुवेर्द सर्वरोग निदान शिबिर होत आहे. कायरोप्रॅक्टिक ही अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांची रोगनिवारण पद्धत आहे. आधुनिक विज्ञानामुळे ती काहीशी मागे पडली तरी गेल्या शे-दीडशे वर्षांमध्ये मात्र अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये या पद्धतीवर संशोधन सुरू आहे. कायरो म्हणजे कर- हात. कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ हाताने ही उपचारपद्धती केली जाते. अपघात तसेच चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, चालणे यामुळे पाठीच्या मणक्यांचे संतुलन बिघडून अवयवांकडे जाणाऱ्या मज्जातंतूंवर दाब पडून वेदना आणि व्याधी निर्माण होते. कायरोप्रॅक्टिकच्या तंत्राने आहार तसेच व्यायामाच्या मदतीने ही व्याधी दूर होऊ शकते, असे शिवपुरी शिबिराचे संयोजक डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी सांगितले. आयुवेर्द आणि या शास्त्रामध्ये अनेक गोष्टी समान आहेत. औषधांचा फार मारा करता आहार विहारावर आयुवेर्द भर देते. तसेच आजार होण्यापूवीर्च तो बरा करण्यावर दोन्ही शास्त्रांचा भर आहे. भारतातील काही शहरांमध्ये या उपचार पद्धतीचा लाभ मिळत असला तरी ग्रामीण भागातील लोकांपासून तो दूर राहतो. त्यामुळे यावेळी अमेरिकेतील दहा डॉक्टरांची टीम आम्ही शिवपुरीत बोलावली असल्याचे डॉ. राजीमवाले म्हणाले. अमेरिकेत शिकून आलेले काही डॉक्टर ही उपचार पद्धती करतात. पण त्यांचे दर महाग असतात. ग्रामीण रुग्णांना वर्षभर या पद्धतीचा लाभ देण्यासाठी अमेरिकी डॉक्टरना येथे बोलावण्याचाही विचार आहे, असेही डॉ. राजीमवाले यांनी सांगितले. या शिबिरासाठी ८८०६६-९९३८८ या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी नाव नोंदता येईल.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive