तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशनकार्ड आहे का ?.. त्याचा वापर तुम्ही फक्त मोबाइल सिमकार्ड घेण्यासाठी किंवा ' अॅड्रेस प्रूफ '
म्हणून करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्याकडचं
रेशनकार्ड घेऊन तडक शिधावाटप केंद्र गाठा आणि रेशन खरेदी करा. कारण, या
कार्डांचा ' योग्य ' वापर न झाल्यास ते रद्द केलं जाणार आहे.
शिधावाटप व्यवस्थेवर देखरेख ठेवणा-या विभागानं नुकतीच एक नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, रेशनकार्ड न वापरणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. केशरी किंवा पिवळ्या रंगाचं रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांनी दर महिन्याला रेशन खरेदी न केल्यास तीन महिन्यांनी त्यांचं कार्ड रद्द होईल. या नियमावलीच्या अमलबजावणीच्या दृष्टीनं, गेल्या तीन महिन्यांत रेशन खरेदी न केलेल्या ग्राहकांची माहिती शिधावाटप नियंत्रक डॉ. अश्विनी जोशी यांनी मागवली आहे. बनावट रेशनकार्डांचा वापर रोखण्याच्या दृष्टीनं ही मोहीम होती घेण्यात आली आहे. रेशनकार्डांचा दरमहा वापर करणा-यांना या मोहिमेचा कुठलाही त्रास होणार नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री नसीम खान यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पांढ-या रंगाचं रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना दरवर्षी एक फॉर्म भरून द्यावा लागेल. रेशनकार्डवर नमूद केलेल्या पत्त्यावरच आपण राहत असल्याचं या फॉर्ममध्ये नमूद केलेलं असेल.

No comments:
Post a Comment