Wednesday, August 28, 2013

अलेक्झांडरची कबर सापडली


अलेक्झांडरची कबर सापडली

अलेक्झांडर

ग्रीसचा जगज्जेता सम्राट अलेक्झांडर द ग्रेट याची कबर सापडल्याच्या वृत्ताने जगभरातील इतिहासतज्ञ सक्रिय झाले आहेत. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असेही ग्रीस सरकारने स्पष्ट केले आहे.

अॅम्पीफोलिस या प्राचीन ठिकाणाजवळ हा ५०० मीटर लांब आणि तीन मीटर उंचीचा चौथरा आढळून आला असून, त्यात राजघराण्यातील एखाद्या मोठ्या व्यक्तीला दफन करण्यात आले असावे, अशी दाट शक्यता पुरातत्ववेत्यांनी व्यक्त केली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या अल्कातेमीनी पेरीस्तीनी यांनीही या कबरीमध्ये 'एक अथवा अनेक महत्वाच्या व्यक्तींना दफन करण्यात आले असू शकते', असे म्हटले आहे.

अलेक्झांडर द ग्रेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिकंदराचे साम्राज्य आयोनियन समुद्रापासून हिमालय पर्वतापर्यंत पसरविले होते. इसवी सनपूर्व ३०२ मध्ये बॅबिलियॉनमध्ये त्याचा मृत्यू झाला तरीही त्याचा मृतदेह असलेली शवपेटी ग्रीसमधील अनेक राजांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवीली. या जगज्जेत्याच्या मृत्यूनंतरचा हा प्रवास संपविला तो, टोलेमी फिलाडेल्फस-२ या राजाने. त्याने तत्कालीन इजिप्तमधील अलेक्झांड्रीया येथे अलेक्झांडरची स्थायी कबर बांधली आणि मध्ययुगापर्यत ती तिथेच होती. त्यानंतर मात्र अलेक्झांडर द ग्रेटच्या कबरीचा थांगपत्ता कोणालाही कळलेला नाही.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive