Tuesday, August 20, 2013

Demand increased for Nine Yard Saree


नऊवारीला मोठी मागणी

saree.jpg


नेसायला आणि आवरायला कठीण म्हणून फारशी नेसली न जाणारी नऊवारी साडी पुन्हा फॉर्मात आली आहे. मंगळागौर , भोंडला या पारंपारिक सणांबरोबरच लग्नात वधूही नऊवारीला पसंती देऊ लागल्या आहेत. सध्या मंगळागौरींची धामधूम असल्याने नऊवारीला मोठी मागणी आहे.

नऊवारी नेसायची म्हणजे एखाद्या आजीबाईंनाच गाठावे लागते. ती नेसायला तशी अवघडच. पण काही सणांना आणि धार्मिक विधींना आता हमखास नऊवारी नेसली जाते. तरुणींमध्ये नऊवारीची क्रेझ आहे. त्यामुळे रेडीमेड नऊवारीला चांगले दिवस आल्याचे २००४ पासून रेडीमेड नऊवारी साड्या शिवून विकणाऱ्या मनिषा जोशी यांनी सांगितले. ब्राह्मणी , मराठमोळी आणि लावणी या ३ प्रकारच्या नऊवारी साड्या सध्या उपलब्ध आहेत. ब्राह्मणी साडीला सलवार वर आचा , मराठमोळ्या नववारीला दोन्ही पायावर घोळ तर लावणीच्या साडीला दोन्ही बाजूला काष्टा असतो , अशी महिती त्यांनी दिली.

' मी ऑर्डरनुसार नऊवारी शिवते , ग्राहक आपल्या चॉईसनुसार नऊवारी साडी देतात आणि त्यांना हव्या त्या पॅटर्नमध्ये मी साडी शिवून देते ,' असे त्या म्हणाल्या. ब्राह्मणी आणि मराठी नऊवारी रेडीमेड साडीची किंमत ३०० , तर लावणी साडीची शिलाई ५०० रूपये आहे. नऊवारीला ; विशेषतः ब्राह्मणी आणि मराठी नऊवारीला खूपच डिमांड असल्याचे त्या म्हणाल्या.

परदेशातही मागणी

परदेशात ; विशेषतः अमेरिकेतील भारतीय मराठी सण सार्वजनिकरित्या साजरे करत असल्याने तिथेही नऊवारीला मोठी मागणी आहे. जोशी यांच्या नऊवारी साड्या परदेशातही जात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधून या साड्या डिझाईन करत असल्याचे मनिषा जोशी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive