Saturday, August 24, 2013

Mumbai Rape case - Third accused arrested


मुंबई बलात्कारः तिसऱ्याला अटक, दोघे फरार



महालक्ष्मी येथे छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. सिराज रहमान असं अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आली. मात्र, या घटनेतील आणखी दोन आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

पीडित तरुणीच्या जबाबाचा आधार घेत पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पाच नराधमांची रेखाचित्रं बनवली आहेत. त्यामुळेच घटनेनंतर २४ तासांच्या आत चांद बाबू सत्तार शेख ऊर्फ मोहम्मद अब्दुल (१९) या पाचमधील एका नराधमाला अटक करण्यात यश आले. चांद याने गुन्हा कबुल करताना अन्य आरोपींचीही नावे सांगितली आहेत. त्यातील विजय जाधव या दुसऱ्या आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांनी सिराज रहमान या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी दक्षिण मुंबईतून अटक केली आहे. मात्र, या प्रकरणी आरोपी असलेले दोन अद्यापही फरार आहेत.

बलात्कार आरोपी असलेले पाचही नराधम १९ ते २५ वर्ष वयाचे आहेत. ज्या शक्ती मिलच्या भग्न इमारतीत हा भयंकर प्रकार घडला. तेथून जवळपासच्या परिसरातच राहणारे हे सर्व आरोपी आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अन्य आरोपींनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची २० पथके बनवण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive