‘हिंदू विश्वकोशा’चे आज प्रकाशन
विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या , विविधतेतील एकतेचे प्रतीक असणाऱ्या हिंदू विचारसरणीचा समग्र वेध घेणाऱ्या अकरा खंडांच्या विश्वकोशाच्या इंग्रजी आवृत्तीचे आज , सोमवारी अमेरिकेत प्रकाशन होत आहे . दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात आयोजित परिषदेत विश्वकोशाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे प्रकाशन होणार असून , सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे , स्वामी चिदानंद सरस्वती यांचे भाषणही होणार आहे . सुमारे एक हजार अभ्यासकरांच्या २५ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून विश्वकोश साकारला आहे . त्यासाठी ' मंडल प्रकाशन ' ने ते प्रसिद्ध केलेल्या ' इंडिया रिसर्च फाउंडेशन ' च्या मार्गदर्शिकेचा वापर करण्यात आला आहे . एप्रिल २०१०मध्ये हृषीकेश येथे दलाई लामा यांच्या हस्ते भारतीय आवृत्तीचे प्रकाशन झाले होते .
विश्वकोशामध्ये सात हजार अनुच्छेद आहेत . भारताचा इतिहास , भाषा , संस्कृती , तत्त्वज्ञान , स्थापत्यशास्त्र , कला , संगीत , नृत्य , औषधे , विज्ञान , सामाजिक संस्था , धर्म , अध्यात्म , हिंदू धर्मातील महिलांची भूमिका अशा विविधांगी विषयांचा समावेश त्यात करण्यात आला आहे . हिंदू परंपरा आणि संस्कृती दर्शवणारे एक हजारांहून अधिक रंगीत फोटो , चित्रेदेखील आहेत .
विश्वकोशाचे सहयोगी संपादक फ्रेंच हाल म्हणाले , ' अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे . धर्म आणि संस्कृतीच्या अभ्सासकांसाठी विश्वकोश मैलाचा दगड आहे . भारतीय आणि पाश्चिमात्यांमधील अत्यंत कुशाग्रता या प्रकल्पांतून दिसली आहे .' अमेरिका , युरोप , भारतातील एक हजार जण विश्वकोश तयार करण्यात सहभागी झाले आहेत .
सोमवारी होणाऱ्या परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे , परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष आणि ' इंडिया हेरिटेज रिसर्च फाउंडेशन ' चे संस्थापक स्वामी चिदानंद सरस्वतीजी यांची भाषणे होतील . ' कॅरोल इंडिया ' नावाच्या उपक्रमाची घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे . जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारताचे महत्त्व या उपक्रमाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे .

No comments:
Post a Comment