California court declared that Yoga is a ital part of American culture.
wake up o Indians, become a yog sadhak. Let us not US govt take Patent
for Yog also.
कॅलिफोर्निया
न्यायालयाने योगशास्त्र हे अमेरिकी संस्कृतीच्या मुख्य प्रवाहाचा एक घटक
असल्याचा निर्णय देऊन शाळांतील योग प्रशिक्षणाला मान्यता दिल्यानंतर
जगभरातल्या योग क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले. परदेशातील योगाच्या
प्रसारकार्याला यामुळे अधिक गती मिळेल.
योगविद्या हे स्वयंसिद्ध, परिपूर्ण आणि परिणामकारक शास्त्र असल्याचा निर्वाळा साधुसंतांनी अनेक शतकांपासून दिला असला, तरी प्राधान्याने "योग म्हणजे हठयोग' आणि "हठयोग म्हणजे गूढता' अशी सर्वसाधारण लोकांची धारणा होती. प्राचीन काळापासूनच शारीरिक योगाला किंवा हठयोगाला थोडे गौणत्वाचेच स्थान दिले गेले. स्वामी विवेकानंदांमुळे राजयोगाचे आणि गीतेमुळे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचे मानाचे स्थान मात्र अबाधित राहिले. पण 1965 मध्ये प्रभुपाद स्वामींनी अमेरिकेत जाऊन सुरू केलेल्या कृष्ण कॉन्शसनेस संप्रदायाला व्यापक जनाधार लाभल्यामुळे भक्तियोगाची परदेशात मुहूर्तमेढ रोवली गेली. 1968 ते 1990 दरम्यान महर्षी महेश योगींच्या ट्रन्सेंडेंटल मेडिटेशन ध्यानपद्धतीला "बीटल्स'नी उचलून धरल्याने व त्यावर संशोधन झाल्यामुळे त्याचा बोलबाला झाला. 1960 ते 1990 या कालखंडात प्रथम आचार्य रजनीश, नंतर भगवान रजनीश आणि शेवटी ओशो हे नाव धारण करून त्यांनी जगाला आपल्या विचारांनी संमोहित केले. येहुदी मेन्युहीनला योगाचा चांगला अनुभव आल्याने आणि 1965 मध्ये प्रकाशित झालेले "लाइट ऑन योग' हे पुस्तक गाजल्यामुळे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचेही परदेशात नाव झाले. गूढतेची पार्श्वभूमी लाभलेले गणेशपुरीचे मुक्तानंद यांनी 1950 ते 1970 या काळात सिद्धयोगाचा प्रचार केला.
या सर्वांच्या यशाच्या प्रवासातला एक समान घटक होता परदेशातील भोगग्रस्त लोक, आरोग्यप्रेमी नागरिक, शास्त्रज्ञ, विचारवंत यांच्याकडून त्यांना मिळालेला पाठिंबा. परदेशात योगाला मान्यता आणि प्रतिष्ठा मिळू लागल्यानंतर ती भारतातही मिळू लागली. अर्थात, योगाची शास्त्रीयता आणि उपयुक्तता जगापुढे आल्यामुळे हे घडले हे तर खरेच आहे. आता योग हे एक शास्त्र म्हणून जगभर स्वीकारले गेले आहे. वैद्यकीय व्यावसायिकही योगोपचारासाठी रुग्णांना योगकेंद्रांत पाठवू लागले आहेत.
अमेरिकेतील "टाइम्स स्क्वेअर'पाशी जमून योगप्रेमी योगाभ्यास करतानाची छायाचित्रे वृत्तपत्रांमधून झळकू लागली आहेत. 2005 मधील पाहणीनुसार एकट्या अमेरिकेत एक कोटी 65 लाख लोक योग करीत होते. एकट्या अमेरिकेतली योगातली वार्षिक उलाढाल 34,200 कोटी रुपये आहे.
योगाच्या परदेशप्रवासात योग हा हिंदू धर्माचा घटक असल्याचा कायमच बागुलबुवा केला गेला. तरीही अंगभूत सामर्थ्याच्या बळावर योगाचा प्रसार होत राहिला. चर्चमध्येही योग शिकवला जाऊ लागला. लोकांचे चर्चमधील कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण घटू लागले. त्यामुळे योगावर बंदी घालावी, असा विचारप्रवाह मूळ धरू लागला. पण, लोकांनी अनुभवलेली योगाची परिणामकारकता एवढी मोठी होती, की या विचारप्रवाहाला फारसा जनाधार मिळाला नाही. त्या काळात इंग्लंडमधील काही साधकांनी त्याविरुद्ध यशस्वी लढा दिला. पण मधूनमधून पाश्चात्त्य देशांत हा आक्षेप डोके वर काढत राहिला. विशेष म्हणजे त्याचा प्रतिवादही तिथल्या योगप्रेमींनीच केला.
नुकताच कॅलिफोर्निया न्यायालयाने या संदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाद्वारे योग हा अमेरिकी सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्याचे मान्य करून न्यायालयाने त्यात हिंदू धर्माच्या प्रसाराचा कुठलाही भाग नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचे पडसाद अमेरिकेतील अन्य राज्यांत तर उमटतीलच, पण इतर पाश्चात्त्य देशांतील शालेय योगप्रशिक्षणालाही चालना मिळेल. आजपर्यंत विविध देशांत योगविद्येच्या प्रसाराला वेळोवेळी धार्मिक कारणांमुळे जी खीळ बसायची, तो अडथळा दूर झाल्यामुळे येत्या काही वर्षांत या प्रसारकार्याला अधिक गती येईल, असे दिसते. मुख्य म्हणजे हिंदू धर्माशी निगडीत योगविद्या ही तिचे धर्माशी असणारे नाते बाजूला ठेवले तरी तेवढीच उपयुक्त ठरते, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
esakal Marathi news (29.8.13) :-

No comments:
Post a Comment