Friday, August 30, 2013

Why ashok won battle, which alexander can not win



खुद को जय करे






चीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला , ' मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा , मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे. ' राजा प्रगल्भ होता. तो हसला आणि म्हणाला , ' बाजूच्या जंगलात तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. तू त्याला भेट नंतर आपण ही घोषणा करू. कारण तो ही घोषणा एकून इथे येणार नाही. जो श्रेष्ठ असतो तो कधीच कुणाशी स्पर्धा करीत नाही. इर्षा ही नेहमी कनिष्ठांच्याच मनात असते. ' तरुण धनुर्धर उत्सुकतेनी त्या निर्मनुष्य जंगलात गेला. खूप आत एका झोपडीजवळ एक वृद्ध त्याला काम करताना दिसला. तरुणाने त्याला विचारले , ' आपण धनुर्धर आहात का ?' तो उत्तरला , ' मी कधीकधी धनुष्य चालवत असतो , पण मी धनुर्धर आहे का हे मात्र लोक ठरवतील. ' तरुणाच्या विनंतीवरून त्या वृद्धाने आपली धनुष्यकला दाखवली आणि तरुण चकितच झाला. कारण वृद्धाच्या तुलनेत तरुणाला काहीच येत नव्हते. तीन वर्ष तो तरुण वृद्ध धनुर्धराकडे अभ्यासासाठी थांबला. आता तोही त्या विद्येत चांगलाच पारंगत झाला. आपल्याला सगळे काही येते असे त्याला वाटू लागले.

एक दिवस गुरू लाकडांची मोळी घेवून येत असताना तरुणाने त्यांच्यावर बाण चालवला. अतिशय चपळाईने वृद्ध गुरूने मोळीतील एक लाकूड फेकून मारले आणि बाण उलटा जाऊन तरुणाच्या छातीत घुसला. वृद्धाने तरुणाच्या छातीतून बाण काढताना सांगितले. ' हा एक डाव मी तुला शिकवला नव्हता. कारण मला तुझ्या मनातली इर्षा ठाऊक होती. एक दिवस सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तू मलाही मारशील हे मला माहीत होते. पण तू घाबरू नकोस. मला मेलेलाच समज. कारण मी कधीही कुणाशीच स्पर्धा करीत नाही. मला माहीत आहे माझ्या गुरूच्या तुलनेत मला काहीच येत नाही. माझ्यापेक्षाही निष्णात असणारे माझे गुरू बाजूच्या हजार फूट उंच डोंगरावर एकटेच राहतात. तरुण खजिल झाला होता पण अधिक उत्सुकतेनी तो डोंगरावरच्या या महागुरुला भेटायला निघाला. उंच कड्यावर खोल दरीच्या अगदी काठावर हे महागुरू एका पायावर तोल सांभाळून उभे होते. तरुण त्यांना दुरूनच म्हणाला , मी धनुर्धर आहे. महागुरू म्हणाले , ' अरे मग धनुष्यबाण कशाला बाळगतोस ? ते तर शिकण्याचे साधन आहे. एकदा का तू निष्णात झाला की धनुर्धर तर तुझ्या आत हवा. आत्म्यात भिनलेला. अजूनही तू धनुष्यबाण बाळगतो म्हणजे तू बच्चा आहेस. ये तू माझ्याजवळ ये. मी तुला निष्णात करीन. खोल दरीच्या काठावर येण्यास तरुणाचे मन धजावले नाही. तरुण म्हणाला , ' मी अजून जवळ येवू शकत नाही. भीतीने माझ्या मनाचा थरकाप उडत आहे. ' महागुरू हसले आणि म्हणाले , ' ज्याचे मनच स्थिर नाही त्याचा निशाणा कसा अचूक लागणार. ' तेवढ्यात त्यांनी डोक्यावरून जाणाऱ्या पक्ष्यांच्या रांगेकडे हाताने निशाणा केला आणि सारे पक्षी जमिनीवर येवून कोसळले. अवाक झालेला तरुण परतला आणि राजाला म्हणाला , ' मला कुणाशीच स्पर्धा करायची नाही. मी सर्वश्रेष्ठ तर सोडा साधा धनुर्धर म्हणावयाच्याही लायकीचा नाही. ' मनातले द्वंद्व ज्याला जिंकता येते तो खरा जेता. 

 http://fc01.deviantart.net/fs13/f/2007/066/8/2/Rugged_Male_Hand_Extended_by_FantasyStock.jpghttp://shloky.com/thinking/wp-content/uploads/2011/12/Af26.AsokaPillar_000.jpg
म्हणूनच जगज्जेता असूनही सम्राट अलेक्झांडरचे हात जाताना रिकामेच राहिले. अशोकाला मात्र ही लढाई कळली आणि त्यात तो विजयी सुद्धा झाला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive