नोकिया मायक्रोसॉफ्टमध्ये विलिन होणार
एकेकाळी
मोबाइलच्या क्षेत्रात बादशहा असलेली नोकिया ही कंपनी आता मायक्रोसॉफ्ट
कॉर्पोरेशन ५४.४ अब्ज युरोंना विकत घेणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार
पाडून हा व्यवहार २०१४ च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. नोकिया
आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात होत असलेला हा व्यवहार मायक्रोसॉफ्टला
मोबाइलच्या क्षेत्रात विस्तारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
व्यवहार पूर्ण होताच नोकिया मोबाइल फोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य कार्यकारी अधिकारी मायक्रोसॉफ्टमध्ये नव्या जबाबदा-या स्वीकारणार आहेत. या संदर्भातले तपशील लवकरच जाहीर केले जातील. नोकिया व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष रिस्टो सिलस्मा पदमुक्त होतील.
मायक्रोसॉफ्टची विंडोज ही मोबाइलसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम चाचणी पूर्ण होण्याआधीच नोकियाने विकत घेतली होती. मात्र नोकियाचे स्मार्ट फोन बाजारात येण्याआधीच अँड्रॉइड या मोबासाठीच्या ऑपरेटिंग सिस्टिमने सारे जगच बदलले होते सॅमसंग आणि अॅपलने स्मार्ट फोनच्या बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज केला होता. त्यामुळे नोकिया पुढील आव्हाने आणखी कठीण होत गेली. ही परिस्थिती आपल्या आवाक्याबाहेर होत असल्याची जाणीव झाल्यामुळेच नोकियाने मायक्रोसॉफ्टची ऑफर स्वीकारल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment