Tuesday, September 3, 2013

वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया


वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया

वास्तुमध्ये अंतर्गत सजावट करताना ब-याच वेळा तोडफोड होते. त्यामुळे वास्तुमध्ये दोष निर्माण होतात. त्यासाठी वास्तुशांती केली पाहिजे. वास्तुशांती म्हणजे त्या वास्तुमधील अणू-रेणू वर झालेली एक प्रभावी परिणामकारक अशी एक वैदिक प्रक्रिया होय.

कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीवि भि:।।

( वाल्मिकी रामायण अरण्यकांड, सर्ग ५६, श्लोक २३)

वरील श्लोक वाल्मिकी रामायणामधील असून ज्यावेळी श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी वनवासात गेले त्यावेळी चित्रकूट पर्वतावर त्यांचा पहिला स्वतंत्र मुक्काम आला व तेथे त्यांनी कुटी बांधली. श्रीराम, लक्ष्मण, सीता म्हणाले, 'हे सौमित्रा! 'चिरंजीवी' इच्छा असलेल्यांनी वास्तुशांती आवश्य करावी असे शास्त्र वचन आहे. म्हणून आपण या कुटीची वास्तुशांती करू या.' त्यावेळेस नगरातून व वनातून विद्वान पुरोहित व ऋषी यांना बोलावून वास्तुशांती करण्यात आली. यावरूनच वास्तुशांती हा विधी वेदकाळापासून आहे हे सिद्ध होते.

वास्तुशास्त्रामधील वास्तुपुरुष कोण याबद्दल काही कथानके आहेत. वेदानुसार 'वस्तोष्पती' ही वैदिक देवता आहे. हा रुदप्रजापती व उषा यांचा चौथा पुत्र यांचे नाव वास्तोष्पती किंवा गृहपतीआग्ने असे आहे. या यज्ञाचा रक्षक व यज्ञवेदीचा अधिनायक मानला जाई. पुढे हा सर्व भवनांचा स्वामी तर पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी समजली जाईल.

दुसरी कथा त्रेतायुगात - एक महाकाय मानव निर्माण झाला. त्याने तीनही लोक व्यापले. ्याला घाबरून सर्व देव ब्रह्मादेवाला शरण गेले. ब्रह्मादेवाने सांगितले, याला खाली तांेड करून पाडून टेवला तर त्याला काही खाबरण्याचे कारण नाही. देरांनी त्याला खाली पाडले व देव त्याच्या अंगावर बसले. त्या मानवाने ब्रह्मादेवाची प्रार्थना केली, 'मी काही अपराध केला नसताना हे सर्व देव मला त्रास देत आहेत, मला अभय द्या.' ब्रह्मादेवाने त्याला भयमुक्त केले आणि वर दिला की, जेथे नवीन घर, गाव, नगर, उद्योग वसवले जातील तेथे सर्व लोक तुझी पूजा करून हाविर्भाग देतील.

तिसरी कथा - मत्स्य पुराणात आली. भगवान शंकर व अंधकासूर यांत तुंबळ युद्ध सुरू असताना शंकराच्या कपाळावरून दोन घर्मबिंदू जमिनीवर पडले. त्यातून एक महाभयंकर आकृतीचा पुरुष निर्माण झाला. अंधकासूर व त्याच्या सैन्याचे रक्तपान करूनही त्याची भूक काही शमेना. तो महादेवावर भक्षण करण्याच्या हेतूने चाल करून आला. त्याचा हेतू जर सफल झाला तर भयंकर आपत्ती येईल म्हणून सर्व देवांनी त्याला जिमनीवर अधोमुख झोपवून बांधले. नंतर त्याने शंकराची स्तुती केली. महादेवाने त्याला वर दिला, 'सर्व देव तुझ्या शरीरात वास करतील व जेते नवीन घर, गाव, नगर, उद्योग वसविले जातील आणि वैश्वदेव यज्ञयाग प्रसंगी सर्व मनुष्यमात्रा तुझी पूजा करून हविर्भाव देतील. सर्व देवांनी त्याच्या शरीरात निवास केला म्हणून हा पुढे वास्तुदेवता / वास्तुपुरुष या नावाने प्रसिद्ध झाला. तेव्हापासून याची तलाव, विहीर, मंदिर, यज्ञ, नवीन घर, गाव, वाडे, नवीन व्यवसाय यांच्या आरंभ प्रसंगी तसेच घराचे, मंदिराचे जीणोर्द्वारे प्रसंगी प्रयत्नपूर्वक पूजा करून हविर्भाव दिला जातो.'

वास्तुयज्ञ एकंदरित पाचवेळा करावा असे मत्स्य पुरुणात सांगितलेले आहे.

१) आखणी करून भूमीपूजन करताना २) पहिला खांब बसविताना (कॉलम), ३) पहिले दार बसविताना (स्लॅब टाकताना), ४) छत बसविताना ५) गृहप्रवेश करताना इ. परंतु आता वास्तुशांती गृहप्रवेशाच्या वेळी किंवा गृहप्रवेश करून नंतर मुहूर्तावर करण्याची प्रथा रुढ झाली आहे.

वास्तुमध्ये अंतर्गत सजावट करताना बऱ्याच वेळा तोडफोड होते. त्यामुळे वास्तुमध्ये दोष निर्माण होतात. त्यासाठी वास्तुशांती केली पाहिजे. वास्तुशांती म्हणजे त्या वास्तुमधील अणू-रेणू वर झालेली एक प्रभावी परिणामकारक अशी एक वैदिक प्रक्रिया होय. त्या अणू-रेणूंवर वास्तुशांती करताना पठन होणाऱ्या मंत्राचा, शुभ विचारांचा एक परिणाम जगभरातील प्रत्येक कण दुसऱ्यावर परिणाम करीत असतो. म्हणून तुमच्या परिसरातील एखाद्या वस्तुकडे पाहून तुम्ही चांगले किंवा वाईट विचार करता तेव्हा त्याचे पडसाद इतर कणांवरही पडतात. 'टाओ ऑफ फिजिक्स' आणि 'डान्सिंग वू ली मास्टर्स'मध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म असे वागतात याचे चित्र आहे. डाविर्नसुद्ध 'जडातूनच चेतना'ची उत्क्रांती मानतो. म्हणून जेथे तुम्ही वावरता, तिथल्या वास्तूवर, मातीवर, वस्तूवर रिचारांच्या धक्क्याचे परिणाम होतात. पूवीर् आपल्या घरी आपली आजी किंवा आजोबा सांगत असत की, घरामध्ये क्लेश करु नये, अभद बोलू नये. वास्तुपुरुष अस्तु म्हणत असतो. हे विचार आपण्यास पटण्यासाठी एकविसावे शतक उजाडले आहे. यात अजून महत्त्वाचे रहस्य म्हणजे प्रत्यक्ष शब्द जरी उच्चारले गेले नाहीत तरीसुद्ध मूक विचारांचे धक्के निर्माण होतातच. बिटा पातळीवरील असे धक्के शास्त्रज्ञांनी मोजलेले आहेत. हे धक्के किंवा त्याचे परिणाम, तुम्ही जे बोलता किंवा तुम्ही करता त्या कामाचे परिणाम त्या वातावरणात राहतात, त्याचे परिणामही भिंतीवर, वस्तूवर, आसमंतात होतात, येथे तर वास्तुशांतीच्या प्रयोगात वातावरणशुद्धी तर होतेच त्याचबरोबर त्या वातावरणात किंवा पूजेच्या वेळेस असणाऱ्या व्यक्तींची देहशुद्धी व मनशुद्धी होत असते व यासारखा प्रबावी उपाय दुसरा असूच शकत नाही. ख्रिश्चनांमध्येदेखील पवित्र जल (होली वॉटर) शिंपडून वास्तुशुद्धी केली जाते. प्रत्येक धर्मात वास्तुशुद्धीचे प्रकार आहेत. पण सर्वात शास्त्रशुद्ध प्रकार म्हणजे वास्तुशांती आपल्या हिंदू धर्मात सांगितलेली आहे. दर पाच वर्षांनी घराची वास्तुशांती करावी. मात्र वास्तुप्रतिमा एकदाच निपेक्ष करावी असे शास्त्रात सांगितले आहे. दर पाच वर्षांनी वास्तुच्या शुद्धीचे वर्तुळ पूर्ण होते. मत्सरापासून निर्माण झालेल्या लहरींचे उच्चाटन होते. हा एक अनुभव आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत सगुण व निर्गुण असा पूजा प्रकार आहे. सगुण उपासनेत प्रतिमा तर निर्गुण उपासनेत यंग अथवा प्रतिकांची पूजा होते. यंत्र / मंडल / चक्र / भद यात सर्व देवतांची पूजा होत असते व हे देवतेचे आसन अशा अर्थानेही प्रसिद्ध आहे. वास्तु मंडल हे ४९ पद, संपूर्ण मंडप १०० पद, तलाव, वन, उद्याग निर्माण १९६ पद, सिद्ध लिंग प्रतिष्ठा, नवीन राज्य निर्माण, कोटी होम शांती, महाप्रलयानंतरचे पुननिर्माण, मोटे महोत्सव यात १००० पद वास्तुचक्राची / वास्तुमंडलाची पूजा करण्याचा प्रघात आहे. यज्ञयागात नैऋत्य दिशेला वास्तुचक्राची स्थापना करतात.

वास्तुशांतीत प्रत्यक्ष काय केले जाते याचा संक्षिप्त आढावा घेऊ. घरी गुरुजी येतात, मांडणी करतात, तयारी पूर्ण करून शांतीसुक्त म्हणतात. यात सर्व देवांनी येऊन तृप्त व्हावे असे निमंत्रण व विनंती असते. मंगलाचरण, देव, ब्राह्माण यांना नमस्कार करून संकल्प केला जातो. संकल्पात सिद्धी आहे असे म्हणतात. हा संकल्प म्हणजे मी काय करणा, कुणासाठी करणार, कशासाठी करणार व त्याने मला काय प्राप्त व्हावे हे स्पष्ट केलेले असते. वास्तुशांतीच्या संकल्पात सर्व पूजेच्या संकल्पनाप्रमाणे आपण कुठे बसतो आहोत. आज तिथी, बार, नक्षत्र व आकाशास्य ग्रह स्थिती कशी आहे याचे वर्णन येते. नंतर गोत्र प्रवराचा उच्चार करून विशेष संकल्प सुरू होतो. त्याचा भावार्थ असा, 'ही जमीन घरायोग्य होण्यासाठी जे संस्कार केले ते करताना भूमीला जे दु:ख झाले असेल त्यातून सुवर्ण, रजत, ताम्र, त्रपु, सीसक, कास्य, लोह, पाषाण इत्यादी काढून घेताना, तसेच खणणे, तोडणे, कापणे, भाजणे, भिजविणे, तुडविणे, कांडणे, साखरणे, आय व व्यय म्हणजे कमी जास्त करताना जे दोष निर्माण झाले, या वास्तुच्या क्षेत्रफळाच्या गणिताप्रमाणे, आय (जमा) कमी व व्यय (खर्च) जास्त असेल तर तो दोष जावा, हे घर बांधताना भिंतीत जमिनीत कृमी किटक मारले गेले, ज्या जीव हिंसा झाल्या त्याचा दोष मला येऊ नये व आल्या असल्यास तो निघून जावा तसेच मी येथे चिरकाल निवास करू शकेल यासाठी माझ्या शत्रूंच्या शुजूबुद्धीचा नाश व्हावा, मला माझ्या घरातील परिजनांना दीर्घायुष्य धनधान्य, पुत्र, पौत्र, कीतीर् लाभ इ. प्राप्त व्हावे, ग्रहांचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी वास्तुशांती करतो. अशा प्रार्थना होते. प्रार्थनेमध्ये किती मोठी शक्ती असते यासाठी एक सत्य घटना नमूद करावीशी वाटते.'

तो काळ सुमारे १९०० चा. फ्रान्समधील डॉ. अॅलॅक्सी कॅरेल नावाचे निष्णांत व वैद्यकिय व्यवसाय करणारे सज्जन गृहस्थ. अतिशय बुद्धिमान पण अश्रद्ध, नास्तिक म्हणून प्रसिद्ध. ते एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकवित असताना त्यांचे जीवन पालटून टाकणारा एक प्रसंग घडला. एक श्रीमंत व्यक्ती, पण निरनिराळ्या व्याधींनी पीडित विशेषत: क्षयरोग झालेला रुग्ण त्यांच्या इस्पितळात दाखल झाला.
 
वास्तुची प्रार्थना झाल्यानंतर दुस-या संकल्पानुसार वास्तुमध्ये गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, भूमी पूजन इत्यादी विविध प्रकारांनी पूजन केले जाते. जेणेकरून वास्तुत राहायला येणा-या कुटुंबांला या जागेत स्थैर्य लाभून त्या कुटुंबाची अनेक अर्थांनी भरभराट होऊ शकेल.

(' वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया'चा उर्वरित भाग...)

स्तुची प्रार्थना झाल्यावर दुसरा संकल्प हा की, या कार्याचे अंगभूत असे गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्यवर्धक मंत्र श्रवण, नांदीश्राद्ध, ब्राह्माणवरण, दिग्रक्षण, पंचगव्यकरण, भूमी पूजन, स्थंडिल निर्माण, भूसंस्कार, अग्निस्थापन, वास्तुचक्र, वास्तू, ध्रुव, शेष यांच्या प्रतिमा पूजन गृहस्थापन, रुदपूजेनंतर होमहवन, उत्तरपूजन, बलिप्रदान, पूर्णाहूती, वास्तुनिक्षेप, गृहप्रवेश इत्यादी सर्व कायेर् मी करीन असा केला जातो. गणपती स्मरण, शंख, घंटा पूजन, कलश पूजन, सूर्य पूजन, दीप पूजन केल्यावर विघ्नर्हत्या गणपतीचे पूजन करून पुण्याहवाचन केले जाते.

पुण्याहवाचन

यात संकल्पित कार्यासाठी देव ब्राह्माणांचे आशीर्वाद घेणे हे प्रमुख अंग आहे. ते असे, हे देवांनो, हे ब्राह्माणांनो, मी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला नमस्कार करतो व आशीर्वादाची अपेक्षा करतो. मी आता जी वास्तुशांती व अन्य पूजा करणार आहे, त्याला अनुसरून मंगलसूचक आशीर्वचने द्यावीत. पुण्याहं भवंतु ब्रवंतु - म्हणजे आम्हाला या कर्मापासून पुण्यलाभ होवो. आम्ही पुण्यवान होवोत असा आम्हाला आशीर्वाद द्या. कल्याण भवंतु ब्रुवंतु - म्हणजे आमचे या कर्मापासून कल्याण होवो. आपले कल्याण होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. वृद्धी भवंतु ब्रुवतंतु - म्हणजे आमची या कर्मामुळे सतत वृद्धी व्हावी. कधीही कोणतेही गोष्टी कमी पडू नये आपली वृद्धी होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. स्वस्ति: भवतुं ब्रवंतु - आम्हाला या कर्मामुळे स्वस्ति म्हणजे शुभता स्वस्थता लाभो व अशुभ दूर जावो. आम्हाला स्वस्ति लाभ होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. श्री: भवंतु ब्रुवंतु - या कर्मामुळे श्री अर्थात लक्ष्मी म्हणजे धन्यधान्यादि लाभो मिळो. लक्ष्मीची कृपा प्राप्ती होवो. आपण श्रीमान व्हा असा आशीर्वाद आम्हाला द्या. या नंतर कलशातून घेतलेल्या पवित्र जलाने स्नान करतात. (त्यातील पाणी यजमानाने अंगावर ब्राह्माण शिंपडतात).

औक्षण

सुवासिनीने यजमानांना औक्षण करावे. यात मांगल्याचे प्रतिक अशा या दिव्याप्रमाणे सर्वांना प्रकाश द्या, सुवर्णाप्रमाणे शुद्ध व तेजस्वी व्हा, कापसासारखे मुलायम व वयोवृद्ध व्हावा, दूर्वांसारखा वंशविस्तार होवो. कपाळी मंगलतिलक व सौभाग्य लेणे कायम राहो असा हा मातृस्वरूप सुवासिनीचा आशीर्वाद दिला जातो.

मातृकापूजन

कुलदेवता यांसह सोळा मातृका सात घृत मातृका यांचे पूजन व प्रार्थना केली जातो. आदिशक्ती महामायेची अनेक रुपे आहेत. त्यात १५ प्रमुख रुपे व आम्हाला कुलदेवता मिळून १६ मातृका व एक गणेश, तसेच याच बरोबर मंगल कार्याचे निमित्ताने ७ धृतमातृका यांची स्थापना व पूजा करून वायनदान करतात. यामध्ये साडी, चांदीचे हळदकुंकवाचे करंडे, मंगळसूत्र, फणी, आरसा, काजळडबी व अन्य शंृगार साहित्य यांचा समावेश असतो.

आयुष्यमंत्रजप

यजमानास आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे यासाठी ब्राह्माणांनी दिलेला आशीर्वाद.

नांदीश्राद्ध

नांदी म्हणजे शुभनाद व सुभदानाने होणारे श्राद्ध म्हणजे नांदीश्राद्ध. मंगलमयी देवांच्या बरोबरीने पूर्वजांचे स्मरण व त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचे दान करण्याची आपली परंपरा आहे, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे. त्यात सत्य - वसु हे विश्वदेव, आई, आजी, पाणजी, वडील, आजोबा, पणजोबा ही पितृमातृत्रयी आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आजी, आजी, पणजी या बारा पितरांचे स्मरण करून दर्भावर पूजन व २८ ब्राह्माणांचे जेवण दक्षिणा यांचा संकल्प केला जातो. देवतांच्या पूजेबरोबर पितरांचे पूजन केल्यावर पितरांची अक्षय्य तृप्ती होते.

ब्रह्माणवरण

याचा अर्थ ज्याप्रमाणे कार्य करताना पदाधिकारी नेमतात तसे हे पदाधिकारी व त्यांची कायेर्. १) आचार्य - यज्ञाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे व्यक्ती म्हणजे आपले गुरुजी. २) ब्रह्माा - यज्ञप्रक्रिया पूर्ण करून घेणे, अग्निकार्य व अग्निरक्षण करणे. ३) गाणपत्य - यज्ञ निविघ्नपणे पार पाडावा यासाठी याची जबाबदारी गाणपत्याची. ४) सादस्य - यज्ञासाठी साधन सामुग्री पूर्णपणे तयार ठेेवणे व त्याचा योग्य विनियोग करणे.

५) ऋत्विज : मंत्र व तंत्र यांचा मेळ घालणे. आपल्यावर आलेली जबाबदारी 'वृतोस्मि म्हणून ब्राह्माण' स्वीकारतात. यजमान ब्राह्माणांनी प्रार्थना करतात की, या भागातून उत्पन्न झालेली शुभ फलनिष्पत्ती योग्य प्रकारे जाणून ते श्रेय आम्हाला द्यावं म्हणून योग्य व सुप्रसन्न अंत:करण ठेवून हे कार्य विधिपूर्वक पार पाडा.

दिग्रक्षण

दिग्रक्षण म्हणजे या वास्तुच्या आत बाहेर अनेक दुष्ट शक्ती अदृश्य स्वरूपात असतात. त्यापासून अशुभ फळे मिळतात. त्यांना तुम्ही येथून निघून जा किंवा ते नश्यंतु शिवाज्ञया. शंकराच्या आज्ञेने तम्चा होवा असे सांगून ठिकाणाकडून येणारी दुष्ट कंपने थांबविली जातात.

पंचगण्य

वेदकालापासून ते आजच्या अणुयुगापर्यंत याचे महत्त्व अनेक माध्यमात वर्णन केले आहे. गाईचे दूध, तूप, दही, गोमूत्र, गोमय व दर्भाचे पाणी यांचे एकत्रित मिश्रण करून ते अभिमंजित केले जाते. त्याचे प्रोक्षण व प्राशन हे अत्यंत हितावह आहे. ज्याप्रमाणे अग्नी, इंधन नष्ट करणे त्याप्रमाणे दहात व्याधीरुपाने साचून राहिलेले पाप पंचगव्याने नष्ट होते. गोमूत्राच्या नित्य सेवनाने काही त्वचारोग समूळ नाहीसे होतात. तसेच काही अस्थिविकारांवर आणि काही यकृतासंबंधी व्याधीवर गोमूत्र आणि गायीचे दूध उपयुक्त ठरते असे आयुवेर्दात सांगितले आहे.

जुन्या काळी क्षयरोगावर परिणामकारक औषध शोधले गेले नव्हते. विविध उपचार करूनदेखील एका रुग्णाची स्थिती दिवसंेदिवस बिघडत चालली होती. एके दिवशी या रुग्णाने डॉक्टरांना विनंती केली की, आपल्या देशात दक्षिणेला पीडिनीय पहाडांच्या पायथ्याशी लुई नावाचं छोटसं गाव आहे. तेथे कोणत्याही व्याधींचे कोणतेही रुग्ण कोणतेही औषध न घेता केवळ प्रार्थनेने बरे होतात असे म्हणतात. रुग्णाने अतिशय तळमळीने त्यांना विनंती केली, माझं काही कमी-जास्त झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावरचं. एवढंच नव्हे, तर डॉक्टरांनादेखील आपल्या सोबत येण्याचा आग्रह त्याने केला. या गोष्टीला डॉक्टर कॅरेल बिलकूल तयार नव्हते. परंतु अनिच्छेनेच संमती दिली व ते दोघे लुई या गावी पोहोचले. तेथील अवस्था बघून डॉक्टर अधिकच वैतागले. तेथे कोणतेही औषधं नव्हते व रुग्णाची ही अंतिम स्थिती असल्याने उपचार करताना रुग्णाची योग्य ती काळजी घ्यावी असे त्या संस्थेच्या व्यवस्थापकाला सांगितले. तेथील नियमाप्रमाणे सर्व लोक शिस्तीने गांभीर्याने व शांततेने एकत्र जमले. रुग्णासाठी अत्यंत भक्तिभावाने अनन्य प्रार्थना केली व त्याच्या स्वास्थाबद्दल देवाजवळ करुणा भाकली व जवळच असलेल्या झऱ्यात स्नान करण्यास सांगितले. या झऱ्याचे पाणी इतके थंडगार होते की, रुग्ण जर पाण्यात उतरला तर त्याचं शवच हाती लागेल म्हणून डॉ. कॅरेल यांनी पाण्यात उतरण्यास रुग्णास सक्त मनाई केली. परंतु रुग्ण जीवनाला कंटाळला होता व शेवटचा उपाय म्हणून तो पाण्यात उतरला व डुंबलादेखील आणि बाहेर आल्यावर त्याच्या अंगात विलक्षण स्फूतीर् दिसली. हे दृश्य पाहून डॉक्टर अचंबित झाले. नियमित प्रार्थना व नियमित स्नान याने तो रुग्ण बरा झाला होता. त्याची त्यांनी तपासणी केली. फुफ्फुसातील क्षयरोगाचं नामोनिशाण शिल्लक नव्हतं. पण डॉक्टरांचे बुद्धिजीवी व वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. त्यांचा असा तर्क होता की, हा परिणाम प्रार्थनेचा नसून झऱ्याच्या पाण्याचा असावा. पाण्यात विलक्षण व अद्भूत गुण असावेत. या शंका निरसनासाठी पाण्याच्या बऱ्याच तपासण्या केल्या पण त्यामध्ये कोणतेही विशेष गुणधर्म आढळले नाही. उलट त्यामध्ये रोगजंतूचे प्रमाण आढळले. अखेर डॉक्टरांना हार पत्करावी लागली. रुग्ण प्रार्थनेने बरा झाला हे त्यांनी मान्य केले व त्यांनी उद्गार काढले की, 'प्रार्थनेची शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.'

वास्तुशास्त्रामध्ये ' सूर्याचा उत्तरायण काळ ' हा अत्यंत शुभ मानला जातो. उत्तरायण काळामध्ये सूर्योदय पूर्व ईशान्य भागात होतो. सूर्याचा उत्तरायण काळाला देवांचा दिवस(किंवा राक्षसाची रात्र) असे म्हणतात. नवीन गृहप्रवेश, वास्तुखरेदी, वास्तुशांती इत्यादी सर्व शुभ कार्ये या उत्तरायण काळामध्येच केली जातात.

या उलट सूर्याचा दक्षिणायन काळा हा अत्यंत अशुभ मानण्यात येतो. त्यामुळे कुठलीही शुभ कार्ये या काळामध्ये करण्याचे टाळले जाते. दक्षिणायन काळामध्ये सुर्योद्य पूर्व आग्नेय भागात होतो. सूर्याच्या दक्षिणायन काळाला देवांची रात्र (किंवा राक्षसांचा दिवस) असे म्हणतात. आरोग्यहिताच्या दृष्टीकोनातून सुध्दा सूर्याचा दक्षिणायन काळ फारच त्रासदायक ठरतो. कारण दक्षिणायन काळामध्ये दिवस लहान व रात्र मोठी असते. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे सूर्य प्रकाश अपुरा मिळतो.

सकाळच्या सर्व उपयुक्त व सौम्य सूर्य प्रकाश किरणांच्या अभावामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती मंदावते. अशा ढगाळ व पावसाळी वातवरणामुळे दमा, अस्थमा, ब्रॉन्कायटीस, त्ति.बी. च्या रुग्नांना तर जास्तच त्रास होतो. दम - धापाचे प्रमाण वाढते. सांधेदुखी, संधीवातासारखे आजार तर जास्तच सतावतात. हे केवळ इतक्यावरच थांबत नाही तर चांगली, ठणठणीत प्रकृती असलेल्या माणसालासुध्दा सर्दी, पडसे, खोकला, प्लू, हगवण, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर या सारख्या रोगांची लागण होते आणि म्हणूनच आपण पाहतो की साधारणपणे जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये वैद्यकीय व्यवसाय जोरात चालतात.

डॉक्टरांच्या दवाखान्यमध्ये, हॉस्पिटलमध्ये, मेडिकल स्टोअर्समध्ये कित्येक वेळा बसायला तर सोडाच साधे उबे रहायला पण जागा मिळत नाही. आणि नेमके याच्या उलट उत्तरायण काळामध्ये घडते. कारण उत्तरायण काळामध्ये दिवस मोठा व रात्र लहान असते. आकाश निरभ्र असल्यामुळे पहाटेची आणि सकाळची सर्व सौम्य व उपयुक्त सूर्य प्रकाशाची किरणे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे मानवी शरीरातील जीव - रासायनिक क्रियेला अडथळा निर्माण होत नाही, त्यामुळे साहजिकच आहे प्रकृती पण अगदी ठणठणीत राहते. वास्तुशास्त्र आणि दिशा व उपदिशा नैसर्गिक दिशा एकूण दहा आहेत. त्यामध्ये चार प्रमुख आणि चार 'उपदिशा ' यांचा समावेश होतो. चार ' प्रमुख ' दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि चार 'उपदिशा' म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. या व्यतिरीक्त उर्ध्वा (म्हणजे आकाश) आणि अधर (म्हणजे पाताळ) अशा दोन आणखीन दोन दिशा आहेत. प्रत्येक प्रमुख दिशेला व त्या प्रमुख मिलनामुळे तयार होणा-या प्रत्येक उपदिशेला विशिष्ट असे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत. त्या गुणधर्मावरूनच त्या त्या दिशेचे व उपदिशेचे महत्व लक्षात येते आणि त्या नुसारच त्यापासून मिळणारी शुभाशुभ फळे निश्चित होतात.

संपर्क : A-403, स्मृती जनार्दन को ऑप हाऊसिंग सोसायटी, राजाजी पथ, तिसरी क्रॉस लेन, रामनगर, डोंबिवली (पूर्व),
मोबाइल -९८१९०३२६२१
 

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive