Monday, September 2, 2013

संतांचे वैराग्य प्रेममय असते

समर्थ रामदास अन्य संतांप्रमाणे वैराग्यशाली होते. समर्थकालीन थोर कवी वामन पंडित यांनी समर्थांच्या वैराग्याची शुकदेवांशी तुलना केली आहे. संत जरी वैराग्यशील असले तरी ते प्रेममय असतात. त्यांच्या वैराग्यात तुसडेपणा असत नाही. समर्थ जरी लग्न मंडपातून पळून गेले तरी २४ वर्षांनी ते परत आपल्या घरी आले. आपल्या मातेला भेटले, आपल्या अंध मातेला त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली. आईला असे वाटले की, या मुलाने २४ वषेर् साधना करून एखादे भूत वश केलेले दिसते. आपल्या मुलाला भगवंताची प्राप्ती झाली असेल, असे दिसत नाही. तो जादूटोण्यातच अडकलेला दिसतो आहे. मुलाबद्दल निर्माण झालेल्या या शंकेवरून राणूबाईंच्या बौद्धिक उंचीची कल्पना येते. दुसरी कोणतीही स्त्री दृष्टी प्राप्त झाली म्हणून भारावून गेली असती. आपल्या मातेच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी समर्थांनी एक गोड अभंग रचला. या अभंगात त्यांनी संपूर्ण रामायण बसवले आणि रामचंद हेच भूत मी वश केले असे मातेला सांगितले. अभंगाच्या शेवटी समर्थ म्हणतात-

सर्व भुतांचे हृदय। नाव त्याचे रामराय।

रामदास नित्य गाय। तेचि भूत गे माये।।

एकंदरीतच २४ वर्षांनंतर मायलेकरांची झालेली भेट अत्यंत हृद्य होती. त्यातूनच समर्थांना हा अभंग स्फुरला. यावरून त्यांचे मातृप्रेम दिसून येते. पंढरपूरहून समर्थांनी आपल्या मातेला फार गोड पत्र लिहिले. त्यात त्यांनी एखाद्या सद्गुरूप्रमाणे आपल्या मातेची स्तुती केली आहे. यावरून त्यांचे अंत:करण किती कोमल होते, ते लक्षात येते. खरे साधुत्व कधीही तुसडे असत नाही. आपल्या देशातले सगळे संत प्रेमस्वरूप होते.

समर्थ २४ वर्षानंतर घरी परतले तेव्हा चार महिने घरी राहिले. त्यांनी आपल्या मातेला कपिलगीता हा ग्रंथ समजावून सांगितला. थोरले बंधू गंगाधर स्वामी यांच्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते. पंढरपुराहून त्यांनी गंगाधर स्वामींनादेखील अतिशय भावपूर्ण पत्र लिहिले. पत्रातील पुढील ओव्या वाचल्या म्हणजे समर्थांच्या हळुवार अंत:करणाची कल्पना येईल-

तू धीरपणे मेरू। तू उदारपणे जळतरु।

तू गंभीरपणे सागरू। पीयुषाचा।।

तू पवित्रपणे वैश्वामरू। तू समर्थपणे ईश्वरु।

तू प्रतापाचा दिनकरू। धगधगायमान।।

या चार महिन्यांत समर्थांची आपल्या पुतण्यांशी चांगलीच गट्टी जमली. रामजी आणि शामजी हे दोघे पुतणे ८ आणि १० वर्षांचे आहेत. चाफळला पोहोचल्यावर समर्थांनी या पुतण्यांना पाठवलेले पत्र अत्यंत मौलिक आहे. विद्यार्थ्याने आदर्श दिनचर्या आखावी आणि सद्गुणांनी मंडित व्हावे, अशी अपेक्षा समर्थ आपल्या पुतण्यांकडून व्यक्त करतात. पत्रात ते म्हणतात-

बहु खेळ खोटा सदालस्य खोटा। समस्तासि भांडेल तोची करंटा।।

दिसामाजी काही तरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।

वरी चांगला अंतरी गोड नाही। तया मानवाचे जिणे वेर्थ पाही।

वरी चांगला अंतरी गोड आहे। तयालागी कोणीतरी शोधिताहे।।

याचा अर्थ माणसाने केवळ बहिरंग नव्हे, तर अंतरंगदेखील सुधारावे. समर्थ कुटुंबवत्सल होते. नेटक्या प्रपंचाचा त्यांनी आवर्जून पुरस्कार केला. त्यांना संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समपिर्त करावयाचे होते, म्हणून संसाराची उपाधी त्यांनी आपल्यामागे लावून घेतली नाही; पण सामान्य माणसाने संसारात राहूनच कर्तव्यकमेर् प्रामाणिकपणे पार पाडून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, अशी त्यांची धारणा होती.

हा माणूस अवघ्या मानव जातीवर प्रेम करणारा होता. तपश्चयेर्च्या निमित्ताने ते १२ वषेर् नाशिकात राहिले होते. एकदा चाफळला डोंगरात फिरत असताना त्यांना नाशिकच्या पंचवटीतील रामाची आठवण आली. ज्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम करून त्यांचे नाशिकमधले वास्तव्य सुखावह केले, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे एक गोड पत्र समर्थ नाशिकच्या मठपतींना पाठवतात. या पत्रात समर्थांनी लहान मुले, लहान मुली, तरुण मुले, तरुण मुली, वृद्ध स्त्रिया आणि वृद्ध पुरुष या सर्वांना नमस्कार लिहिला आहे. याचा अर्थ ४०व्या वषीर् लहान मुलांना पत्रात नमस्कार लिहिण्याएवढी लीनता समर्थांजवळ होती. याचा अर्थ आपले जुने प्रेमाचे संबंध न तोडता माणसाला परमार्थ करता येतो. भगवंत जर प्रेममय असेल आणि भक्ती जर प्रेमस्वरूप असेल तर वैराग्याच्या नावाखाली हेकटपणा करणे किंवा हेकेखोर वृत्तीला खतपाणी घालणे समर्थांना मान्य नाही.

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : २ समर्थ रामदास अन्य संतांप्रमाणे वैराग्यशाली होते. समर्थकालीन थोर कवी वामन पंडित यांनी समर्थांच्या वैराग्याची शुकदेवांशी तुलना केली आहे. संत जरी वैराग्यशील असले तरी ते प्रेममय असतात. त्यांच्या वैराग्यात तुसडेपणा असत नाही. समर्थ जरी लग्न मंडपातून पळून गेले तरी २४ वर्षांनी ते परत आपल्या घरी आले. आपल्या मातेला भेटले, आपल्या अंध मातेला त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली. आईला असे वाटले की, या मुलाने २४ वषेर् साधना करून एखादे भूत वश केलेले दिसते. आपल्या मुलाला भगवंताची प्राप्ती झाली असेल, असे दिसत नाही. तो जादूटोण्यातच अडकलेला दिसतो आहे. मुलाबद्दल निर्माण झालेल्या या शंकेवरून राणूबाईंच्या बौद्धिक उंचीची कल्पना येते. दुसरी कोणतीही स्त्री दृष्टी प्राप्त झाली म्हणून भारावून गेली असती. आपल्या मातेच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी समर्थांनी एक गोड अभंग रचला. या अभंगात त्यांनी संपूर्ण रामायण बसवले आणि रामचंद हेच भूत मी वश केले असे मातेला सांगितले. अभंगाच्या शेवटी समर्थ म्हणतात-

सर्व भुतांचे हृदय। नाव त्याचे रामराय।

रामदास नित्य गाय। तेचि भूत गे माये।।

एकंदरीतच २४ वर्षांनंतर मायलेकरांची झालेली भेट अत्यंत हृद्य होती. त्यातूनच समर्थांना हा अभंग स्फुरला. यावरून त्यांचे मातृप्रेम दिसून येते. पंढरपूरहून समर्थांनी आपल्या मातेला फार गोड पत्र लिहिले. त्यात त्यांनी एखाद्या सद्गुरूप्रमाणे आपल्या मातेची स्तुती केली आहे. यावरून त्यांचे अंत:करण किती कोमल होते, ते लक्षात येते. खरे साधुत्व कधीही तुसडे असत नाही. आपल्या देशातले सगळे संत प्रेमस्वरूप होते.

समर्थ २४ वर्षानंतर घरी परतले तेव्हा चार महिने घरी राहिले. त्यांनी आपल्या मातेला कपिलगीता हा ग्रंथ समजावून सांगितला. थोरले बंधू गंगाधर स्वामी यांच्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते. पंढरपुराहून त्यांनी गंगाधर स्वामींनादेखील अतिशय भावपूर्ण पत्र लिहिले. पत्रातील पुढील ओव्या वाचल्या म्हणजे समर्थांच्या हळुवार अंत:करणाची कल्पना येईल-

तू धीरपणे मेरू। तू उदारपणे जळतरु।

तू गंभीरपणे सागरू। पीयुषाचा।।

तू पवित्रपणे वैश्वामरू। तू समर्थपणे ईश्वरु।

तू प्रतापाचा दिनकरू। धगधगायमान।।

या चार महिन्यांत समर्थांची आपल्या पुतण्यांशी चांगलीच गट्टी जमली. रामजी आणि शामजी हे दोघे पुतणे ८ आणि १० वर्षांचे आहेत. चाफळला पोहोचल्यावर समर्थांनी या पुतण्यांना पाठवलेले पत्र अत्यंत मौलिक आहे. विद्यार्थ्याने आदर्श दिनचर्या आखावी आणि सद्गुणांनी मंडित व्हावे, अशी अपेक्षा समर्थ आपल्या पुतण्यांकडून व्यक्त करतात. पत्रात ते म्हणतात-

बहु खेळ खोटा सदालस्य खोटा। समस्तासि भांडेल तोची करंटा।।

दिसामाजी काही तरी ते लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।

वरी चांगला अंतरी गोड नाही। तया मानवाचे जिणे वेर्थ पाही।

वरी चांगला अंतरी गोड आहे। तयालागी कोणीतरी शोधिताहे।।

याचा अर्थ माणसाने केवळ बहिरंग नव्हे, तर अंतरंगदेखील सुधारावे. समर्थ कुटुंबवत्सल होते. नेटक्या प्रपंचाचा त्यांनी आवर्जून पुरस्कार केला. त्यांना संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समपिर्त करावयाचे होते, म्हणून संसाराची उपाधी त्यांनी आपल्यामागे लावून घेतली नाही; पण सामान्य माणसाने संसारात राहूनच कर्तव्यकमेर् प्रामाणिकपणे पार पाडून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, अशी त्यांची धारणा होती.

हा माणूस अवघ्या मानव जातीवर प्रेम करणारा होता. तपश्चयेर्च्या निमित्ताने ते १२ वषेर् नाशिकात राहिले होते. एकदा चाफळला डोंगरात फिरत असताना त्यांना नाशिकच्या पंचवटीतील रामाची आठवण आली. ज्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम करून त्यांचे नाशिकमधले वास्तव्य सुखावह केले, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे एक गोड पत्र समर्थ नाशिकच्या मठपतींना पाठवतात. या पत्रात समर्थांनी लहान मुले, लहान मुली, तरुण मुले, तरुण मुली, वृद्ध स्त्रिया आणि वृद्ध पुरुष या सर्वांना नमस्कार लिहिला आहे. याचा अर्थ ४०व्या वषीर् लहान मुलांना पत्रात नमस्कार लिहिण्याएवढी लीनता समर्थांजवळ होती. याचा अर्थ आपले जुने प्रेमाचे संबंध न तोडता माणसाला परमार्थ करता येतो. भगवंत जर प्रेममय असेल आणि भक्ती जर प्रेमस्वरूप असेल तर वैराग्याच्या नावाखाली हेकटपणा करणे किंवा हेकेखोर वृत्तीला खतपाणी घालणे समर्थांना मान्य नाही.

- सुनील चिंचोलकर

- लेखांक : २

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive