माणूस आजीवन विद्याथीर् असतो. शेवटपर्यंत तो शिकत राहतो. जीवनात जाणून घेण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत. भगवान बुद्धांकडे एकदा शिष्य आला की २-३ वर्षांत बुद्धदेव त्याला तयार करीत. त्यानंतर ते त्याला म्हणत- 'मी काही सर्वगुणसंपन्न नाही. मी ज्या मार्गाने गेलो तो मार्ग तुला दाखवला. अजूनही कितीतरी मार्ग आहेत. आता इतर संप्रदायातील साधूंकडे जा आणि त्यांच्याजवळ नवीन गोष्टी शिक.
भगवान रामकृष्ण परमहंसांनीदेखील वेगवेगळ्या मार्गाने साधना केली आणि सर्व मार्ग त्या एकाच भगवंतापाशी नेतात, याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. दत्तात्रेयांनी तर २४ गुरू केले होते. मधमाशी, पाल, मांजर, टिटवी यांनादेखील दत्तात्रेयाने गुरू केले. कान्टचे एक सुंदर वचन आहे. 'या जगात मला जी माणसे भेटली, त्यातील प्रत्येकजण कोणत्यातरी बाबतीत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आढळला.' भगवंताने प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेला असतो. एखाद्या प्रवचनकाराला पोहता येत नसेल तर एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याला संगणक वापरता येत नसेल.
भगवंत निर्गुण आहे म्हणजे नेमका कसा आहे? समर्थ म्हणतात- 'निर्गुण म्हणजे बहुगुणी'. याचा अर्थ भगवंत इतक्या गुणांनी नटलेला आहे की, त्याची यादी करणे कठीण आहे. समर्थांच्या मते प्रत्येक सद्गुण हे भगवंताचे लक्षण आहे. मात्र गुण संपादण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील जाणत्याची संगती धरावी लागते.
प्रत्येक क्षेत्रात काही माणसांनी तपश्चर्या करून एक विशिष्ट उंची गाठलेली असते. तो माणूस त्या क्षेत्रातील जाणता समजला जातो. ज्याला त्या क्षेत्रात यश मिळवायचे असते त्याने अशा जाणत्या माणसाच्या सहवासात राहून दीर्घकाळ अभ्यास करावा लागतो. ज्ञानामध्ये कोणताही Shortcut नसतो. काही काही लोक अवघे आयुष्य एखाद्या विद्येसाठी अथवा कलेसाठी समपिर्त करतात. ज्याला शिकण्याची इच्छा आहे, त्याने अशा माणसाच्या सहवासात राहून, त्याची सेवा करून किंबहुना त्याच्या पोटात शिरून ती विद्या आत्मसात करावी.
ज्याला dentist व्हायचे आहे त्याला एखाद्या dentist च्या हाताखाली काही वषेर् काम करावे लागेल. ज्याला गाणे शिकायचे आहे. त्याला एखाद्या गायकाजवळ तालीम करावी लागेल. नुसतं ग्रंथाच्या वाचनाने ते साध्य होणार नाही. सुनील गावसकर किंवा सचिन तेंडुलकर यांनी आचरेकरांकडे क्रिकेटचे धडे घेतले. जितेंद अभिषेकी, भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी लोक संगीत साधना शिकतात. म्हणून समर्थ म्हणतात-
जाणत्याची संगती धरावी। जाणत्याची सेवा करावी।
जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी। हळूहळू।
जाणत्याचे जाणावे प्रसंग। जाणत्याचे घ्यावे रंग।
जाणत्याचे स्फूतीर्चे तरंग। अभ्यासावे।
जाणत्याचा काळ सार्थक। जाणत्याचा अध्यात्म विवेक।
जाणत्याचे गुण अनेक। अवघेच घ्यावे।
समर्थांच्या मते ज्ञानप्राप्तीसाठी माणसाने आपले गाव अथवा आपला देश सोडून दूर गेले पाहिजे. जाणता मनुष्य दूर राहत असेल तर आपणही त्याची संगत लाभावी म्हणून दूर गेले पाहिजे. एकाच स्फुट कवितेत समर्थ म्हणतात की- 'जे आपले गाव सोडून दूर जात नाहीत, त्यांना शिक्षण घेता येत नाही. काही माणसे जिद्दी असतात. ते परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांचा उत्कर्ष होतो.'
मात्र समर्थांना मनुष्याच्या करंट्या स्वभावाची चीड आहे. काही माणसे संतांच्या सहवासात कोरडी राहतात. अनेक मोठ्या माणसांच्या भोवताली काही स्तुतिपाठक आढळतात. अनेक शिष्य आपल्या गुरूंच्या गुणांचा गौरव करतात; परंतु त्यांच्यातील एकही गुण आत्मसात करत नाहीत. अशा माणसांना ज्ञानेश्वर महाराजांनी बेडकाची उपमा दिली आहे. बेडूक चिखलात उगवलेल्या कमळाच्या जवळ राहतो; परंतु त्याला कमळातील सुगंध प्रिय नसतो. चिखलात राहून डराव डराव करण्यातच बेडकाला जीवनाची सार्थकता वाटते. याउलट भ्रमर मात्र कमळाचा शोध घेत घेत दुरून येतात आणि परागकण सेवन करतात. अनेकदा जाणता मनुष्य जवळचा नातेवाईक असेल तर त्याच्यापासून काही शिकण्यापेक्षा त्याचे नातेवाईक म्हणून मिरवण्यातच काही लोकांना धन्यता वाटते. शेवटी समर्थ म्हणतात की, अंतरात्मा सर्व गुणांनी युक्त असून तुमच्या अत्यंत जवळ आहे. तेव्हा अंतरात्म्याची उपासना करून तुम्ही सर्वगुणसंपन्न होऊ शकता. म्हणून ज्ञानी माणसाला आपण सर्वात जास्त मानतो; कारण त्याने सर्व कला आणि विद्या यांचा सोत असलेले ब्रह्माचैतन्य जाणून घेतलेले असते.
- सुनील चिंचोलकर
लेखांक : ६४

No comments:
Post a Comment