हिंदू धर्मियांविरोधात समाजत विद्वेष पसरवणारे मजलिस - ए - इत्तेहादुल मुसलमिन ( एमआयएम ) या पक्षाचे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांचे वकिलपत्र घेण्यासाठी चक्क राम नावाचे दोन वकिल पुढे आले. आंध्रप्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी याची दखल घेत गुरुवारी ओवेसींना चांगलेच सुनावले.
ओवेसींच्या समाजात फूट पाडणा-या वक्तव्याबद्दल खटल्याचे न्या. एल. नरसिंह रेड्डी यांनी राज्य सरकार आणि पोलीस यांना फटाकरले. तसेच अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणाबद्दल राग व्यक्त केला.
मी ओवेसी यांचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते भाषण अतिशय संताप आणणारे आणि समाजात विद्वेष पसरवणारे आहे, असे न्या. रेड्डी यांनी सांगितले.
अकबरुद्दीन यांच्या बचावासाठी दोन वरिष्ठ वकिलांनी वकीलपत्र हाती घेतले असून त्यांची नावं सीताराम मूर्ति आणि रामचंद्र राव आहे. याचा उल्लेखही न्या. रेड्डी यांनी केला. ओवेसी तुम्ही तुमच्या भाषणात रामला देखिल सोडले नाही. पण आज तुम्हाला वाचवण्यासाठी दोन दोन राम पुढे आहेत, असेही न्या. रेड्डी यांनी ओवेसींना सुनावले.
ओवेसी यांनी देशातील लोकांमध्ये फूट पाडतील अशी भाषणे केली आहेत आणि हे तर देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखे आहे. या देशाने तुम्हा पितापुत्राला लोकप्रतिनिधी बनवले. पण अकबरुद्दीन ओवेसी यांनी त्याचा असा असा वापर करणे अतिशय चुकीचे आहे, अशा शब्दात ठणकावले. अकबरुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या काळात दोन हिंदू व्यक्तींना हैदराबादचे महापौर बनवले होते. त्याची आठवण करून देत, आपल्या वडलांनी जी कीर्ती कमावली आहे त्याकडे पाहा, असा सल्लाही न्यायाधीशांनी अकबरुद्दीन यांना दिला आहे.
दरम्यान , अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या अदिलाबाद येथील जिल्हा तुरुंगात आहेत.
No comments:
Post a Comment