Monday, January 7, 2013

करीनाचा झिरो फिगर मंत्रा


झिरो साइजसाठी दहीभात


तुम्हाला झिरो साइज व्हायचंय ? मग फिकर नॉट. करीना कपूरने वापरलेला साधा-सोपा फंडा तुम्हीही वापरु शकता. तो आहे रोजच्यारोज दहीभात खाण्याचा.

इंडस्ट्रीत साइज झिरोचा ट्रेंड आणला तो करीना कपूरने. नंतर तिच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडच्या अनेक हिरोइन्सनी साइज झिरो व्हायचं खूळ धरलं. काहींना ते जमलं तर काहींना नाही. बाकीच्या हिरोइन्सनी कितीही प्रयत्न केले तरी करीनाची साइज झिरो त्यांना गाठता आली नाही. करीना ती करीनाच राहिली. बेबोच्या मॅजिक फिगरचं रहस्य अगदी साधं-सोपं आहे. दररोज दहीभात खाऊन तिने आपली फिगर राखलीय.

करीना आपला लुक आणि फिगरची खूप काळजी घेते. तिच्या हार्डकोअर फॅन्स तिचं अनुकरण करू लागल्या. ३२-२४-३२ हे माप जमवता जमवता अनेकींच्या तोंडाला फेस आला. कपूर घराण्यातली करीना म्हणजे हार्डकोअर पंजाबी. पण तरीही नॉनव्हेज जेवण तिने बंद केलं. फक्त शाकाहारी जेवणावर तिने भर दिलाय. करीना कपूरच्या फिटनेसच्या रहस्यातल्या प्रमुख गोष्टी आता उघड झाल्यात. बॉलिवूडमधल्या या हॉट बॉम्बशेलच्या खास ट्रेनरने कमीत कमी डाएटिंग असलेला हा फिटनेस मंत्रा तिला दिला आहे. त्यातून दिवसातून ६ ते ७ वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात खाणं ती पसंत करते. तिच्या डाएटमध्ये मुख्यतः फॅट फ्री पदार्थ असतात. जे तिला इतकं स्लीमट्रीम ठेवण्यास मदत करतात. फिगर राखण्यासाठी रोजच्या जेवणात तिचा भर असतो दहीभातावर. तसंच तिच्या रोजच्या स्नॅक्समध्ये सोया मिल्क आणि ड्रायफ्रुट्सचाही समावेश असतो. आईसक्रीम चॉकलेटवर तिने काट मारली आहे. योग्य त्या डाएटबरोबरच २ तास योगा आणि व्यायामावरसुद्धा भर द्यायला हवा असं ती म्हणते.

करीनाने सांगितलेले दहीभाताचे फायदे

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
प्रतिकारशक्ती वाढते.
पोटाच्या विकारांपासून सुटका मिळण्यात उपयुक्त.
कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्याने हाडा आणि दातांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त.
हाय ब्लड प्रेशरची रिस्क कमी होते.
ओस्टिओपोरोसिसवर गुणकारी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive