Thursday, January 3, 2013

इंग्रजीमुळे गुन्हे वाढले-डॉ.सिंग

satyapal-singh.jpg
दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेचा दाखला देत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीवर छडी उगारली आहे. इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संस्कारहिन शिक्षण दिले जाते. या असंस्कृत शिक्षणानेच घात केलाय. गुन्हेगारी वाढण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. आत्महत्या, हत्या, बलात्कारासारख्या घटनांना असंस्कृतपणाच कारणीभूत आहे, असा संताप सिंग यांनी व्यक्त केलाय.

शाळा, महाविद्यालये यांचा आत्महत्या व हत्यांशी थेट संबंध असल्याचे नमूद करून सिंग यांनी आपला दावा अधिक स्पष्ट करण्यासाठी क्राईम मीटरच समोर ठेवला. ते म्हणाले, 'मुंबईत १५० हत्या झाल्यास त्याच्या आठ पट घटना या आत्महत्यांच्या असतात. गंभीर बाब म्हणजे हे आत्महत्या करणारे सर्वच्या सर्व सुशिक्षित असल्याचेच आढळून आले आहे. एखाद्या अशिक्षित व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना कधीही घडलेली नाही. सिंग यांनी पुण्याचेही उदाहरण दिले. ते म्हणाले, मी पुण्यात असताना तेथे तर आयटी क्षेत्रात काम करणारे तसेच इंजिनिअर्सनीही नैराश्येतून मृत्यूला कवटाळल्याच्या अनेक घटना घडल्या. 

आत्महत्या करणा-या व्यक्ती या इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांत शिकलेल्या असतात, असा दावा सिंग यांनी केला. ही पार्श्वभूमी असतानाही बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच पाठवण्याचा असतो, अशी नाराजी सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास इथली शिक्षण पद्धतीच कारणीभूत असल्याचा आरोप सिंग यांनी केला. दिल्लीत जी भयंकर घटना घडलीय तसेच मुंबईतही ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्याला मी संस्कृती मानत नाही. हा केवळ असंस्कृतपणा आहे. हे जे काही घडतय ते असंस्कृतपणाचे दुष्परिणाम आहेत. आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सध्या जे काही शिकवले जाते त्यात कुठेही संस्कार पहायला मिळत नाहीत. मुळात त्यात जीवनाचे महत्वच मुलांना समजावून सांगितले जात नाही. त्यामुळे सगळा घात झालाय, असे सिंग म्हणाले. हे सगळं थाबवायचं असेल तर शिक्षण पद्धतीत बदल अनिवार्य आहे. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे स्पष्ट मतही सिंग यांनी मांडले. भारत मर्चंट चेंबरच्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. सिंग यांनी याआधी २००९ मध्येही आपल्या ब्लॉगमधून शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले होते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive