Saturday, January 12, 2013

तरीही पाकच्या हॉकीपटूंना व्हिसा

काश्मिरमध्ये घुसून दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करणा - या पाकिस्तानी सैन्याच्या ' नापाक ' कृतीविरोधात देशाभिमानी जनतेत संतापाची लाट उसळली असताना पाकिस्तानच्या हॉकीपटूंना ' हॉकी इंडीया लीग ' साठी पायघड्या घालण्यात आल्या आहेत . शनिवारी हे हॉकीपटू भारतात दाखल होत आहेत .

दोन भारतीय जवानांच्या निर्घुण हत्येनंतर भारत - पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत चालला आहे . ' चोर तो चोर आणि वर शिरजोर ', अशा प्रवृत्तीच्या पाकिस्तानने यावेळीही काखा वर केल्या आहेत . आज तर पाकिस्तान सरकारने सीमेवर आपला एक सैनिक ठार झाल्याचा कांगावा करत भारतीय उच्चायुक्तांनाच याप्रकरणी समन्स बजावले आहे . त्याचवेळी सीमेवरही पाकिस्तानी सैन्य गोळीबार करून वारंवार कुरापती काढत आहे . असे असताना भारताकडून मात्र अजुनही पाकविरोधात कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही . उलट पाकिस्तानच्या हॉकीपटूंसाठी भारताचे दरवाजे सताड उघडे करण्यात आले आहेत

१४ जानेवारीपासून ' हॉकी इंडिया लीग ' सुरू होत आहे . या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्टार खेळाडू सहभागी होत आहेत . त्यात पाकिस्तानातील खेळाडूंचा समावेश असणार आहे . भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या खेळाडूंना व्हिसा दिला जावू नये , अशी मागणी केली जात होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करत या खेळाडूंना व्हिसा देण्यात आले आहेत . या खेळाडूंना नियोजित वेळेपेक्षा उशिराने व्हिसा मिळालाय . पण त्यामागे कागदोपत्री प्रक्रियेपलिकडे कोणतेच कारण नाही , असे या खेळाडूंना सांगण्यात आले आहे . उद्या शनिवारी हे सर्व खेळाडू भारतात दाखल होणार आहेत .

दरम्यान , अलिकडेच पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारत दौ - यावर येवून गेला . दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत हा या क्रिकेट डिप्लोमसीमागचा उद्देश होता . मात्र हा दौरा संपत नाही तोच पाकिस्तानने भारतीय जवानांचा शिरच्छेद करून आपला रंग दाखवला . त्यानंतरही भारताच्या धोरणात काहीच बदल झालेला नाही .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive