भारत-पाक नियंत्रण रेषेवर
मेंढर क्षेत्रात घुसखोरी करुन पाकच्या बलूच रेजिमेंटच्या सैनिकांनी दोन
भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला. या घटनेमुळे संतापलेल्या १३ राजपुताना
रायफल्सच्या जवानांनी वरिष्ठांचा आदेश मिळाला तर अख्खी बलूच रेजिमेंट
संपवून टाकू ; असे सांगितले.
लान्स नाईक हेमराज आणि लान्स नाईक सुधाकर सिंह यांचा शिरच्छेद केल्यानंतर पाकच्या सैनिकांनी लष्करी संकेत धुडकावून दोन्ही मृतदेहांची विटंबना केली होती. या प्रकाराने दुःखी झालेले १३ राजपुताना रायफल्सचे सैनिक मागील दोन दिवसांपासून उपोषण करत आहेत. वरिष्ठांनी आदेश दिला तर सहका-यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. बदला घेऊ, पाकची बलूच रेजिमेंट संपवू टाकू, असे या संतप्त सैनिकांनी सांगितले.
सध्या १३ राजपुताना रायफल्सचे वरिष्ठ अधिकारी (कमांडिंग ऑफिसर) संतप्त सैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
.........................
लान्स नाईक सुधाकरसिंह : मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील चऱ्हाटनजीकचे दा र्हिया हे सुधाकरसिंह यांचे गाव . सुधाकरसिंह ३० वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात पत्नी दुर्गासिंह आणि चार महिन्यांचा मुलगा आहे . त्यांनी २००२ मध्ये भारतीय लष्करात प्रवेश केला आणि राजपुताना रायफल्स रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते .
लान्स नाईक हेमराज : उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील शेरनगर हे हेमराज यांचे गाव . त्यांच्या पश्चात वृद्ध आई , पत्नी आणि तीन मुले आहेत . ते राजपुताना रायफल्स रेजिमेंटच्या १३व्या बटालियनमध्ये होते .

No comments:
Post a Comment