अभिनेता अमिताभ बच्चन आणि
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने कौटुंबिक संबंध आहेत.
बाळासाहेबांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचं कळताच अभिनेता अमिताभ बच्चन,
पुत्र अभिषेकसह बुधवारी उशिरा रात्री मातोश्री बंगल्यावर जाऊन धडकले.
बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढताना
आमिताभ आणि अभिषेकला खरचटलं होतं, अशी माहिती बच्चन यांनी ट्विटरवर लिहिली.
बच्चन ट्विटरवर लिहितात, ' बाळासाहेब हे आयुष्यभर लढवय्ये होते. आता मात्र ते आयुष्याची लढाई लढत आहेत. त्यांना आता सदिच्छांची गरज आहे. बंगळुरुमध्ये ' कुली ' च्या सेटवर अपघात झाल्यानंतर ते मला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्या हातात एक कार्टून होतं. त्यावर लिहिलं होतं, ' यमराज हार गया '. ... मी जर का कार्टून काढू शकलो असतो तर त्यावर लिहिलं असतं.. ' यमराज हार गया '!.'
बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना अमिताभ लिहितात, ' माझ्या लग्नानंतर त्यांनी मला आणि जयाला घरी बोलावून सुनेचा गृहप्रवेश केल्यासारखं ओवाळलं होतं. तेव्हापासून ते आम्हाला त्यांच्या कुटुंबाचेच एक सदस्य असल्यासारखं वागवतात. '
अमिताभ पुढे लिहितात, ' बोफोर्स घोटाळ्यात माझं नाव आल्यानंतर बाळासाहेबांनी मला घरी बोलवून घेऊन खरं काय ते सांग, तू यात गुंतला आहेस का? असं थेट विचारलं. मी म्हणालो ' नाही '. यावर बाळासाहेब बोलले, ' तर मग बिंधास रहा. तू अभिनेता आहेस. तुला जे उत्तम जमते तेच कर ''
दरम्यान, अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता, बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी बुधवारी रात्री मातोश्री बंगल्यावर गेले होते.

No comments:
Post a Comment