Thursday, November 22, 2012

हिटलरचा इतिहास

हिटलरचा इतिहास


हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.

मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-:

1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोव...्हाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले.

2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला.

3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली.

4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला.

5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन
इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले.

6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला.

7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते.

जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते.

हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-:
1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र  बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले.

2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला.

3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते.

4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रात प्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात.

5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले.

हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती.अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली.


हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे.
1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती.

2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते.

देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive