Thursday, November 8, 2012

दिवाळीचं हॅपी गिफ्ट _Diwali Happy Gift

दिवाळीत गिफ्ट द्यावी तर लागतातच. पण बजेट सांभाळून उत्तम गिफ्ट्स द्यायची कशी.?

दिवाळीच्या शुभमुहुर्तावर आपल्या जवळच्या व्यक्तींना काहीतरी गिफ्टस् द्यावीत, असं आपल्याला वाटतं आणि त्या गिफ्टस्च्या शॉपिंगसाठी आपण घराबाहेर पडतो. बजेट तर आपलं सगळ्यात पहिल्यांदा ठरलेलं असतं; पण कुणाला काय द्यावं याबाबत मात्र मनात गोंधळ असतो आणि मग चुकीचं गिफ्ट चुकीच्या माणसाच्या हातात पडतं. तसं झाल्यामुळे कुणी आपल्याला नावं ठेवत नाही; पण ज्या त्या माणसाची आवड लक्षात घेऊन ते दिलं तर त्या माणसालाही गिफ्ट स्वीकारताना आनंद वाटतो.
लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी -

* बजेट आहे म्हणून काहीही विकत आणू नका. आपण ज्या व्यक्तीसाठी गिफ्ट घेतो आहोत त्याची आवडनिवड आपल्याला साधारण माहीत असते. ती लक्षात घेऊन गिफ्ट विकत आणा.

* मित्रमैत्रिणींना अँक्सेसरीज्, परफ्युम्स, ड्रेसेस तुम्ही देऊ शकता.

* पालक किंवा आपले कॉलेजचे सर/मॅडम, कुणी ज्येष्ठ स्नेही यांच्यासाठी दिवे, सुकामेवा, पणत्या, शोभेच्या वस्तू किंवा घड्याळं घ्या. ते अधिक योग्य ठरेल.

* तुमच्यापेक्षा वयानं मोठय़ा पण मेकअपची हौस असणार्‍या महिलेला मेकअपचं साहित्य भेट म्हणून देऊ शकता.

* दिवाळीच्या सिझनमध्ये भेटवस्तूंची विविध दुकानं, प्रदर्शनं भरतात. त्यामुळे एकाच ठिकाणी जाऊन वस्तू खरेदी करून टाकण्यापेक्षा चार ठिकाणी जाऊन आधी बघून या. त्यामुळे तुम्हाला बाजारात काय काय उपलब्ध आहे याचा अंदाज येईल, किमती काय आहेत हे माहीत होईल. त्यानुसार मग शॉपिंग करा. म्हणजे मग तुमची शॉपिंग योग्य आणि तुमच्याच बजेटमध्ये होईल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive