Saturday, November 10, 2012

How many my kitchen gas are balance, check online?

आमचे अजून किती सबसिडीवाले सिलेंडर बाकी आहेतअसा प्रश्न आता प्रत्येक घरात चर्चिला जाऊ लागलाय. गॅसवाल्यालापावती पाहून वगैरे आकडेमोडही सुरू झालीय. पण ही माहिती मिळवणे आता अधिक सोप झालंय. तुमच्या गॅसची इत्यंभूत माहिती आता इंटरनेटवर पाहता येईल.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वेबसाइटवर तुम्हाला तुमच्या कनेक्शनवर अनुदानित दरातील किती गॅस सिलेंण्डर शिल्लक आहेत हे पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला घरातील बजेट संभाळून आपल्या सोयीनुसार गॅसची बचत करण्यास नक्कीच मदत होईल.
अशा प्रकारे तपासून पाहा आपल्याला सबसिडी कोट्यातील गॅसची उपलब्धता... 
petroleum.nic.in या पेट्रोलियम मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला गॅस सिलेंण्डरच्या चित्रासह निळ्या बॉक्समध्ये एलपीजी पोर्टल ( LPG Portal नावाचा लोगो चमताना दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ओपन होणा-या पेजवर तुम्हाला सबसीडीचे दरवितराकाविरोधातील तक्रारी आणि इतर काही पर्याय दिलेले असतील. त्या खालीच इंडेन गॅसभारत गॅस आणि एचपी गॅसचे लोगो दिसतील. त्यापैकी तुमच्या गॅसचे कनेक्शन ज्या कंपनीचे आहे त्या लोगोवर क्लिक करा.
या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ट्रान्सफरसी पोर्टलचे पान ओपन होते. त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्यतालुका आणि वितरकाचे नाव अशी काही प्राथमिक माहिती द्यावी लागते. त्यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक केल्यास तुम्ही पुढील पानवर जाल.
या पानावर ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा कनेक्शन नंबरची माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोट्यातील चालू आर्थिक वर्षातील सबसीडी दरामधील किती गॅस सिलेंण्डर शिल्लक आहेत याची माहिती मिळते. तसेच तुम्ही नोंदवलेल्या गॅस क्रमांकावर क्लिक केल्यास तुम्हाला मागील गॅस नोंदणीची तारीख आणि गॅस कोणत्या तारखेला घरी आला याबद्दलचीही माहिती मिळेल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive