Thursday, November 15, 2012

भारतीय हिर्‍याचा ११५ कोटीत लिलाव Diamond 115 crores in Auction


लंडन। दि.१४(वृत्तसंस्था)
भारताच्या प्रसिद्ध गोलकुंडा खाणीतून निघालेल्या ७६ कॅरेटच्या शुद्ध हिर्‍याचा लिलाव जिनिव्हा येथे जवळपास ११५ कोटी रूपयांमध्ये(१ कोटी ६९ लाख युरो) झाला. हा एक रेकॉर्ड असल्याचे बोलले जाते.
चौरस आकाराचा हा हिरा त्या खाणीतून बाहेर पडला आहे जेथून प्रसिद्ध कोहिनूर आणि ब्लू होप निघाला होता. गेल्या रात्री लिलावात जी रक्कम मिळाली त्यामुळे मागील सारे रेकॉर्ड तोडले आहेत. गार्डियनने क्रिस्टीचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. क्रिस्टीच्या आंतरराष्ट्रीय आभूषण विभागाचे संचालक क्रांकोइस कुरियल यांनी सांगितले की,'गोलकुंडाच्या कोणत्याही हिर्‍याच्या तुलनेत हा रेकॉर्ड आहे. त्यांनी खरेदी करणार्‍याचे नाव सांगितले नाही. या दुर्मिळ बेरंग हिर्‍याचे वजन ७६ कॅरेट आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive