Sunday, November 18, 2012

बाळासाहेबांची कवचकुंडले

kavachkundal.jpg 
शिवसैनिक हीच माझी कवचकुंडले असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सतत सांगत . त्याची प्रचिती त्यांच्या बॉडीगार्डनी वेळोवेळी दिली . ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यापूर्वी त्यांची सुरक्षा व्यवस्था कट्टर शिवसैनिकच सांभाळत होते ... दिना सावंत , वासू चव्हाण , बाबा शिंदे , श्याम नायडू , भालचंद्र ठाकूर , विजू ठाकूर हे शिवसेनाप्रमुखांचे बॉडीगार्ड . अत्यंत विश्वासू सहकारी . हे सावली सारखे त्यांच्या सोबत असायचे . शिवसेनाप्रमुखांसाठी जीव देण्याचीही तयारी होती . त्याचा प्रत्यय ठाकरे कोकण दौऱ्यावरून येताना एकदा आला . कोकण दौऱ्यावर असलेल्या शिवसेनाप्रमुखांना प्रबोधनकार ठाकरे यांचा फोन आला . सीमा प्रश्नावर वसंतराव नाईकांनी बैठक बोलावली आहे . तातडीने मुंबईला येण्यास सांगितले . परत येताना त्यांची मोटर मुंब्रा गावातून येत होती . रस्ता खणलेला होता . मोटारीसमोर बैलगाडीवाला हळूहळू जात होता . बाबा शिंदे मोटार चालवत होते . वारंवार हॉर्न मारूनही बैलगाडीवाला समोरून हटत नव्हता . अखेर दिना सावंत , वासू चव्हाण , ठाकूर बंधू मोटारीतून उतरले . बैलगाडीवाल्याबरोबर झालेल्या बाचाबाचीचे मारामारीत पर्यवसान झाले . बैलगाडीवाल्याने आरडाओरड करताच गावकरी जमा झाले . शिवसेनाप्रमुखांच्या मोटारीला गराडा घातला . दगडफेक करीत जमाव पुढे आला . शिवसेनाप्रमुखांच्याबरोबर शरद आचार्यही होते . मोटारीत लाठ्या हॉकी स्टीक , लोखंडी चेन होत्या . जमावाची आक्रमकता पाहिल्यावर आचार्य यांनी रिव्हॉल्व्हर काढले . दादा ठाकूरांनी आचार्यंकडील रिव्हॉल्व्हर खेचून घेतले आणि जमावर रोखले ... जमाव मागे सरकला . मग शिवसेनाप्रमुख मुंबईकडे रवाना झाले ...

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive