पत्नी प्रसन्न व्रत
संसारात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला चंद्रसेन मार्गदर्शन घेण्यासाठी सोमदत्त या अनुभवी गुरुकडे गेला, तेव्हा सोमदत्ताने त्यास ‘पत्नी प्रसन्न व्रता’ची माहिती सांगितली. तो म्हणाला-
हे
चंद्रसेना, मी आज तुला पत्नी प्रसन्न व्रताची सविस्तर माहिती सांगणार आहे.
ती तू भक्तिभावाने श्रवण कर. या व्रताचे पालन करणार्याचा संसार सुखाचा
होतो याबद्दल शंका बाळगू नकोस. या व्रतामध्ये पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी
करावयाचे विधी सांगितले आहेत. सर्व वयोगटातील विवाहित पुरुषांना हे व्रत
करता येईल. या व्रतासाठी साधकाने
आपली मनोदेवता आपली पत्नीच आहे, हे मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अशा
प्रकारची भूमिका एकदा निश्चित केली, की मग या देवतेला प्रसन्न करण्याचा
प्रयत्न करावा. प्रातःकाली पत्नीदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला लागावे.
निद्रादेवतेने बहाल केलेल्या सुखाची रक्तिम कांती असणार्या या देवतेचे रूप
प्रातःस्मरणीय असते. हे रुपडे मनात साठवून ठेवल्यास दिवसभर कार्यरत
राहण्यासाठी ऊर्जा
मिळते आणि शारीरिक विश्रांतीची गरज उरत नाही. श्रमाला प्रतिष्ठा देणारी ही
देवता आहे हे समजून घे.
या व्रतामध्ये, पतीने पत्नीआधी जागे होणे आवश्यक आहे. पत्नीदेवीच्या सेवेसाठी रात्री गोंधळ घातला असेल, तरी पहाटे तिच्या झोपेत व्यत्यय येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. सर्वप्रथम अंथरूण, पांघरूण, उश्या इत्यादी वस्तू व्यवस्थित घड्या घालून निर्दिष्ट करण्यात आलेल्या जागेवर ठेवून द्याव्यात. पत्नीदेवतेचा स्वतःचा अवतार कसाही असला, तरी भक्त मात्र अजागळ असणे तिला आवडत नसते. यास्तव सेवकाने दाढी, आंघोळ आदी प्रातःकालीन कार्ये ती जागी होण्यापूर्वी पूर्ण करावीत आणि संपूर्ण शुचिर्भूत होऊन, प्रसन्न मुखकमलाने तिला जागे होण्याची विनंती करावी. अशा वेळी फाजील लाडात येणे, म्हणजे स्वतःच्या अपमानाला निमंत्रण होय, हे पक्के ध्यानात ठेवावे. मुखप्रक्षालन वगैरे करून पत्नी तयार होताच चहा करते. कारण, अशा चवीचा आणि मनाला व शरीराला चैतन्य प्राप्त करून देणारा चहा फक्त तिला (आणि तिच्या आईलाच) येतो, यावर उपासकाचा विश्वास असावा. रोज पत्नीच्या हातचा चहा घेताना, ‘तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!… क्या बात है! ‘ हे वाक्य कंटाळा न करता रोज म्हणावे. या वाक्याचा सराव होण्यासाठी सर्रास खोटे बोलता येणे आवश्यक आहे. असा चहा घेतल्यानंतर मनास चैतन्य येवो अथवा न येवो, परंतु शरीराच्या पोट नावाच्या अवयवाची चेतना जागृत होते आणि पायांना हालचाल करून घरातील कोपरा गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. तिच्या हातचा चहा घेताच तत्काळ ओक्के.. होत असले, तरी परतताच ‘ तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!.. क्या बात है! ‘ असे मनापासून म्हणावे.

चंद्रसेना, वरीलप्रमाणे पत्नी प्रसन्न व्रताचे जो निष्ठेने पालन करील,
त्याच्या संसारामध्ये शांतता आणि सौख्य सदैव नांदत राहील याबद्दल तू निःशंक
रहा. असे संसार घटस्फोटांपासून शेकडो योजने दूर राहतील. अशा घरांमधील
संतती आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि आदर्श नागरिक होईल. या व्रताचे पालन न
केल्यास, तशा संसाराचे गलबत दिशाहीन होऊन
किनार्यावरील खडकावर आदळून त्याचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही हे
निश्चित!
No comments:
Post a Comment