शाळेत असताना आपला काका कोण आहे ? त्याचे मोठेपण काय आहे ? त्याच्या अवतीभवती एवढी विशाल गर्दी का आहे ? या प्रश्नांची उत्तरे नीट माहीत नव्हती . मात्र काकाच्या अवतीभवती असलेली माणसं आणि सभांची अतीविशाल गर्दी पाहून आपला काका कुणीतरी खास आहे हे जाणवत होते . दौरे , सभा , कार्यक्रम या निमित्ताने बहुतांश वेळ त्यांच्यासोबत असायचो . इतका सहवास लाभलेल्या काकांचा माझ्यावर प्रभाव न पडला तर नवल . त्यामुळे लोक जेव्हा मी त्यांची नक्कल करतो म्हणतात तेव्हा ती नक्कल नव्हे तो प्रभावशाली काकांचा माझ्यावर झालेला दृश्य स्वरूपातील प्रभाव आहे .
शालेय जीवनापासून मार्मिकमधील व्यंगचित्रे पाहत होतो . तशीच हुबेहुब व्यंगचित्रे काढण्याचा प्रयत्न मी करीत होतो . पाचवीत असताना भाजल्यामुळे शाळेला सुट्टी घेऊन घरात बसलो होतो . त्यावेळी वॉल्ट डिस्नेची कार्टून्स हुबेहुब काढण्याचा प्रयत्न केला होता . सातवीत असताना माझे हे प्रयत्न पाहून बाळासाहेबांनी मला डेव्हिड लोच्या चित्रांचे पुस्तक दिले आणि सराव करायला सांगितले . माझ्या शेजारी बसून मी कशी चित्रे काढतो ते पाहायचे , सूचना करायचे आणि चुकलं तर कान धरायचे . चित्रे शिकवताना मला नेहमी बाळासाहेबांत हाडाचा शिक्षक दिसायचा . माझं व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यावर हमखास फोन करून त्यांनी मला चुकांची जाणीव करून दिलेली आहे . व्यक्तीच्या शारीरिक व्यंगावर व्यंगचित्र काढू नको हा संस्कार त्यांनीच माझ्यावर केला . माझे एखादे व्यंगचित्र आवडले तर तोंडावर स्तुती करायचे नाहीत . इतरांकडे त्यांनी काढलेले कौतुकोद ्गार माझ्या कानी यायचे आणि मन आनंदानं भरून यायचं .
बाळासाहेबांबरोबर राजकारणात वावरताना त्यांची दूरदृष्टी , निर्णयक्षमता , परिस्थितीचे आकलन याचा पदोपदी प्रत्यय आला . भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर तर एवढी विलक्षण होती की इतका चाणाक्ष राजकारणी मी पाहिलेला नाही .
सुस्पष्ट रेषांतून साकारली जाणारी नेमकी चेहरेपट्टी , चेहऱ्यावरील बारीकसारीक हावभाव यामुळे बाळासाहेब हे मला मोठे व्यंगचित्रकार वाटतात . एक व्यंगचित्रकार या नात्याने तुलनाच करायची तर बाळासाहेब मला आर . के . लक्ष्मण यांच्यापेक्षा उजवे वाटतात . राजकारणात जर त्यांनी कारकीर्द केली नसती तर देशातील प्रख्यात व्यंगचित्रकारांमध्ये त्यांचा निश्चित सहभाग झाला असता . डेव्हिड लो , वॉल्ट डिस्ने , दीनानाथ दलाल ही बाळासाहेबांची दैवते होती तर राजकारण आणि व्यंगचित्रकला या दोन्ही क्षेत्रांमध्ये बाळासाहेब हे माझे दैवत होते , आहे आणि यापुढेही असेल ...

No comments:
Post a Comment