येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१३-१४) राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थीच नाही ,
तर प्राथमिक शिक्षकही नव्या अभ्यासक्रमाला सामोरे जाणार आहेत.
शिक्षकांमध्ये नवा अभ्यासक्रम रुजविण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) नेहमीच्या ' लेक्चर ' प्रशिक्षणाला फाटा देऊन तंत्रज्ञान आणि संवादी पद्धतींचा अवलंब करणार आहे.
' एससीईआरटी ' सध्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाचा मसुदा अंतिम करत असतानाच शिक्षक प्रशिक्षणाचा आराखडाही तयार करत आहे. पहिली ते आठवी इयत्तांच्या नव्या अभ्यासक्रमात मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या , कृती करायला उद्युक्त करणाऱ्या , संवादी आणि आनंददायी शिक्षण पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र , अशाप्रकारे शिकवण्यासाठी शिक्षकांची तयारी होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने , त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आराखडा बनविण्यात येत असल्याची माहिती ' एससीईआरटी ' चे संचालक एन. के. जरग यांनी ' मटा ' ला दिली.
' सध्या पहिली आणि दुसरीच्या राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून , येत्या मार्चपासून प्रशिक्षण सुरू होईल. विभाग , जिल्हा , तालुका अशा विविध पातळ्यांवर विकेंद्रित स्वरूपात शिक्षकांना जून २०१३ पूर्वी टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे ,' असे जरग यांनी सांगितले.
' आतापर्यंत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे स्वरूप बहुतांश वेळा तज्ज्ञांचा व्याख्यानाचा ' तास ' आणि त्यावर प्रश्नोत्तरे असे होते. आता मात्र अभ्यासक्रमाचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षक प्रशिक्षणाचाही चेहरामोहरा बदलला जाणार आहे. प्रशिक्षण अधिकाधिक संवादी आणि शिक्षकांचा कृतीशील सहभाग वाढवणारे असेल. प्रशिक्षणात तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. काही फिल्म्स दाखवल्या जातील ; त्याचप्रमाणे चर्चाही घडवून आणली जाईल ,' असे त्यांनी नमूद केले.
वर्षभरात ' डीएड ' चा अभ्यासक्रमही बदलणार
सेवेत असलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देतानाच ' एससीईआरटी ' ' डीएड ' च्या अभ्यासक्रमातही बदल करणार आहे. यामुळे नव्याने शिक्षक म्हणून रुजू होणाऱ्यांना नव्या पद्धतींशी मिळते-जुळते घेणे अधिक सोपे जाईल. ' नवा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून , त्याला अंतिम आकार येण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागेल ,' असे जरग यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment