पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आमीर अजमल कसाब आणि त्याच्या नऊ साथीदारांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला केला होता . या घटनेला येत्या २६ नोव्हेंबर २०१२ रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत . पण त्याआधीच २१ नोव्हेंबरच्या बुधवारी सकाळी ७ . ३० वाजता कसाबला फाशी देण्यात आली .
विशेष म्हणजे ज्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला , तो दिवस बुधवार होता आणि कसाबला फाशी देऊन दहाव्या दहशतवाद्याला संपवण्यात आले तो दिवसही बुधवारच .
२६ / ११ आणि मराठी नेते यांचा एक विचित्र संबंध आहे . दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील , मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री आर . आर . पाटील यांना बेजबाबदारपणे परिस्थिती हाताळल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता . आज ज्यावेळी फाशी देण्यात आली त्यावेळी आर . आर . पाटील पुन्हा राज्याचे गृहमंत्री आहेत आणि केंद्रात (महाराष्ट्राचेच) सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री आहेत .
सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेल्या नऊ दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्यात आले होते . अज्ञातस्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते . या संदर्भात अधिकृत माहिती आर . आर . पाटील यांनी दिली होती . त्यानंतर आज कसाबच्या फाशीची कारवाई देखील आवश्यक तेवढी गोपनीयता राखून पूर्ण करण्यात आली आणि आर . आर . पाटील यांनीच फाशी देण्यात आल्याची माहिती जाहीर केली .

No comments:
Post a Comment