राज्यभरात सर्वत्र ' दिवाळी पहाट ' च्या कार्यक्रमांनी या मांगल्याच्या सणाचे स्वागत होत असताना ठाण्यात राम मारुती रोड आणि डोंबिवलीत फडकेवरची पहाट मात्र तरुणाईच्या उत्साहाने सजली . मराठमोळ्या वेशभूषेतील तरुणांच्या रंगात रंगलेल्या या दोन्ही ठिकाणी दिवाळीनिमित्त होता आनंद , चैतन्य आणि जल्लोष ... सजूनधजून , दागिने घालून , नवनवीन ओळखी काढून मिरवत होणारे हे दिवाळीचा माहौल अनुभवण्यासाठी यंदा काही परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली होती .
पारंपरिक वेशभूषेत एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी नवे मित्र मै त्रिणी जोडण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी राम मारुती रोड आणि फडके रोडवर तरुण एकत्र येतात . ही प्रथा केव्हा सुरू झाली याची माहिती नसली , तरी तिथे येऊन दिवाळीचा आनंद लुटणाऱ्यांच्या संख्येत वर्षागणिक वाढच होत चालली आहे . सकाळी ७ वाजताच ठाण्यात राम मारुती रोड आणि मासुंदा तलावाकडे तरुणांची पावले वळू लागली . नेत्रदिपक फटाक्यांच्या आतषबाजीने या सेलिब्रेशनला चार चांद लावले . ' ताल मॅट्रीक्स ' या कॉलेजवयीन विद्यार्थ्यांच्या बँडच्या रॉकिंग परफॉर्मन्समुळे या उत्साहाला सुरांची आणि ठेक्याची जोड दिली .
डोंबिवलीतील फडके रोडवरसुद्धा तरुणांचा उत्साह अवर्णनीय होता . डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेशाचे दर्शन घेतल्यावर शुभेच्छा आणि भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला . तरुणांच्या उत्साहामुळे बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौकापर्यंतचा हा रस्ता गर्दीमु ळे ओसंडून वाहत होता . या रस्त्याच्या मध्यभागी भव्य रांगोळी काढल्याने हा परिसर अधिकच सुशोभित झाला होता . पारंपरिक वेषभूषा परिधान केलेल्या तरुणाईने आज हा रस्ता बहरला होता . या सांस्कृतिक नगरीत डोंबिवलीकर तरुणांना व्यासपीठ मिळावे , यासाठी श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक नृत्यांचा कार्यक्रम सादर झाला . फडके रोडवरील दिवाळी सेलिब्रेशन आता केवळ राज्यभराचे आकर्षण राहिले नसून ही महती थेट सातासमुद्रापार पोहचली आहे . त्यामुळे परदेशातील एका ग्रुपने ही दिवाळी अनुभवण्यासाठी खास फडके रोडची वाट धरली होती . कल्याणमध्येही काळा तलाव परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांनी एकत्र जमून दिवाळी शुभेच्छांची देवाणघेवाण केली .

No comments:
Post a Comment