पंधरा वर्षाच्या एका
अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी या
मुलीची ‘डीएनए’ चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने देऊन दोन महिने उलटले
तरीदेखील चाचणी न झाल्याने ती कुमारी आता पाच महिन्याचा गर्भ सांभाळत या
चाचणीची प्रतीक्षा करत आहे. आता तिचा गर्भपात कसा करायचा? हा प्रश्नही
निर्माण झाला आहे.
नगर शहरातील ही अल्पवयीन मुलगी जुलै-ऑगस्टमध्ये बेपत्ता होती. पोलिसात तक्रार दिल्यानंतर ती हेमंत शेलार या तरुणासोबत पुण्यात सापडली. त्यावेळी ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी हेमंतसह त्याच्या चार साथीदारांविरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी हेमंत सध्या कोठडीत आहे. अत्याचाराचा गुन्हा सिध्द करण्यासाठी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल वळवी यांनी न्यायालयाकडे मुलीची ‘डीएनए’ चाचणी करण्याची परवानगी मागितली.
न्यायालयाने त्यास परवानगी दिली. नंतर मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डीएनए चाचणी न करताच तिला घरी पाठविण्याचा निर्णय तपासी अधिकारी वळवी यांनी घेतला.
- पोलीसांवर कारवाईचे आदेश
डीएनए चाचणी करावी यासाठी या तिचे माता-पिता उपनिरीक्षक वळवी यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत. पण वळवींनी चालढकल केली. दोन महिने या मुलीच्या माता-पित्यांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले. अखेर त्यांनी सरकारी वकील रजनी देशपांडे यांच्या मार्फत न्यायालयात वळवी यांच्याविरोधात अर्ज दाखल केला. त्याची दखल घेत मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.के.कदम यांनी वळवींवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे. परंतु या गोंधळात मुलीच्या पोटातील गर्भाला १४४ दिवस म्हणजे २0 आठवडे पूर्ण झाले आहेत.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँक्ट १९७१ नुसार १४0 दिवसानंतर गर्भपात करता येत नाही. त्यामुळे हा गर्भपात करण्यात कायदेशीर बाबीसोबतच आईच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या मुलीचा गर्भपात करता येईल असे सरकारी डॉक्टरांचे म्हणणे आहे. खासगी डॉक्टर मात्र गर्भपात करता येणार नाही असे सांगत आहेत. मुलीची डीएनए चाचणी अद्यापही झालेली नसून तिला घराबाहेर पडणेही अडचणीचे झाले आहे.
नगर शहरातील ही अल्पवयीन मुलगी
जुलै-ऑगस्टमध्ये बेपत्ता होती. ती हेमंत शेलार या तरुणासोबत पुण्यात सापडली.
गुन्हा सिध्द करण्यासाठी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल वळवी यांनी न्यायालयाकडे मुलीची ‘डीएनए’ चाचणी करण्याची परवानगी मागितली.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँक्ट १९७१ नुसार १४0 दिवसानंतर गर्भपात करता येत नाही

No comments:
Post a Comment