Thursday, November 8, 2012

लता मंगेशकरांचे म्हणे भूपेन हजारिकांशी होते प्रेमप्रकरण

ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांचे देहावसान होऊन वर्ष पूर्ण होत असताना, हजारिकांचे लता मंगेशकरांबरोबर प्रेमप्रकरण होते असे वक्तव्य करून हजारिकांच्या पत्नीने खळबळ उडवून दिली आहे. आसामी टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हजारिकांच्या पत्नी प्रियंवदा यांनी हे वक्तव्य केले असून त्यामुळे खवळलेल्या लता मंगेशकरांनी प्रियंवदा यांना कोर्टात खेचण्याची ताकीद दिली आहे. कल्पना लाजमी या हजारिकांसोबत ४० वर्षे राहिलेल्या निर्मात्याही या वक्तव्यामुळे भडकल्या आहेत.

 
 हजारिकांना ५० वर्षांपूर्वी सोडून जाण्यामागे त्यांचे लता मंगेशकरांशी असलेले प्रेमप्रकरण हे एक कारण असल्याचे प्रियंवदा यांनी म्हटले आहे. कोलकाता येथे हजारिका यांच्या टॉलीगंज येथील घरामध्ये लता मंगेशकर व भूपेन हजारिका एकाच बेडरुममध्ये राहत असल्याचेही प्रियंवदा यांनी म्हटले आहे. भारतामध्ये जर संगीतकार म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर त्याची गाणी लता मंगेशकरांनी म्हणावी लागतात असे हजारिका आपल्याला म्हणाल्याचे प्रियंवदा सांगतात. त्या पुढे जाऊन असेही म्हणतात की, हजारिकांनी सांगितले की, अशावेळी रात्रदेखील एकत्र घालवावी लागते.
माणसं कुठल्या थराला जातात हे बघून आपल्याला धक्काच बसला असल्याची प्रतिक्रिया लता मंगेशकरांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण आयुष्यात मी या बाईला एकदाच भेटले असून ती नक्की काय बोलतेय हेच आपल्याला समजत नसल्याचेही त्या म्हणाल्या. आपण प्रियंवदा यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive