' बड्या घरचा श्वान , त्याचा तिन्ही लोकी मान ' ही म्हण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खोटी ठरविली . सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या श्वानांच्या मालकांना आज नोटीस बजावल्या . यापैकी एक काँग्रेसचे मोठे नेते आहेत तर दुसरे एसपी दर्जाचे अधिकारी . या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे .
उपराजधानीत काही जण आवड म्हणून तर , अनेकजण प्रेमाखातर कुत्री पाळतात . आधी केवळ श्रीमंतांकडेच आढळणारी महागडी कुत्रे आता सर्वसामान्य घरातही आढळत आहेत . लाख मोलांच्या या श्वानांसाठी घरात अत्यंत महागडे जेवण तयार केले जाते . त्यांच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र नोकरही ठेवले जातात . मात्र त्यांच्या विष्टेसाठी शहरातील रस्ते हक्काचे असल्या सारखे वागले जाते असे आढळून आले . त्यामुळे पालिकेने या प्रकाराच्या विरोधात मोहिम उघडली .
सोमवारी सकाळी नरेंद्रनगर , वर्धा रोड , सक्करदरा आणि सिव्हील लाइन्स या भागात मोहीम राबविली . त्यानंतर टिळकनगर , देवतळे ले - आऊट , वर्मा ले - आऊट यासह इतरही भागात कारवाई करण्यात आली . बुधवारपर्यंत एकूण १५ जणांना नोटीस बजावण्यात आली होती . यात सिव्हील लाईन्स भागातील एका वन अधिकाऱ्याचाही समावेश होता . पाळीव श्वानांची मनपात रितसर नोंदणी करावी , त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी या प्राथमिक व वैयक्तिक पातळीवरच्या सोयी आहेत . मात्र , बाहेर फिरायला घेऊन जातांना श्वानांना रस्त्यावर शौच करू देऊ नये , असे स्पष्ट केले आहे . असे केल्यास नोटीस बजावून दंड ठोठावण्यात येईल असा इशारा दिला आहे .
पाळीव श्वानांना फिरायला घेऊन जाण्यास कुणावरही बंदी नाही . मात्र , असे करताना सोबत प्लास्टिक पिशवी घ्यावी . नंतर या शौचची योग्य ठिकाणी विल्वेवाट लावावी , अशी सूचना केली आहे . अशाप्रकारच्या सूचना दिल्यानंतरही अनेकजण सर्रास त्यांचे पाळीव श्वानांना भररस्त्यांवरच शौचास उभे करीत असल्याचे उघडकीस येत आहे .
गुरूवारी भल्या पहाटे ५ . ५० वाजता मनपाचे वैद्यकिय अ धिकारी डॉ . अशोक उरकुडे यांच्या नेतृत्वात सिव्हील लाइन्ससह अभ्यंकर नगर भागात कारवाई करण्यात आली . यात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहीलेल्या एका नेत्याकडील पाळीव श्वानही सापडला . तर , अभ्यंकरनगरात गडचिरोली येथे कार्यरत असणाऱ्या एका बडया पोलीस अधिकाऱ्याच्या पाळीव श्वानांचाही समावेश आहे .
काय म्हणतो कायदा
पाळीव श्वान पाळताना मालकांना काही नियमांचे पालन करावे लागते . यासाठी मनपाचे नियम आहेत . मनपा कायदा १९४८ मधील कलम १९५ , १९६ ( अ )( ब ) आहे . यात परीसरात अस्वच्छता पसरविण्याबाबत कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे . मनपा कायदा १९४८ मधील कलम३४८ , ४१९ नुसार शहरातील प्रत्येक श्वान मालकाने त्यांच्या पाळीव श्वानांचा परवाना काढणे बंधनकारक केले आहे .
श्वान झाले ' फॅशन '!
मॉर्निंग वा इव्हिनींग वॉकींगला जाताना सोबत श्वान असणे आता हळूहळू फॅशनच होत आहे . काही श्वानमालकांच्या हातात असणारे श्वान त्यांच्यासाठी किती बहुमोलाचे आहेत , याचे दर्शन घडविते . काहींची बॉडी लॅंग्वेज नाही म्हणता फॅशन असल्याचे दर्शविते . यामुळे अनकांच्या तोंडून नकळतपणे ' फॅशन ' असा शब्द बाहेर पडतानाही ऐकल्या जाऊ शकते . तसे बघता आता फॅशन शो मध्येही पाळीव श्वानांना माणसांप्रमाणेच विविध प्रकारचे कपडे घालून रॅम्पवर चालविले जाते , हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल .
नोकर नव्हे मालकांवर व्हावी कारवाई !
बडया घरचा श्वान साधारणत : घरातील महिला व नोकराच्या हातात असतो . अशावेळी प्रथम मनपाच्या पथकाडून परवाना असल्याची विचारपूस करण्यात येते . ते न आढळल्यास प्लास्टिक पिशवी सोबत आहे का , याची खात्री करण्यात येते . या दोन्ही बाबी न आढळल्यास मग नोटीस बजावण्यात येते . असे करताना मात्र श्वानमालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे .

No comments:
Post a Comment