दिवाळीत परफ्यूम घ्यायलाच हवा. पण कोणता.? कसा निवडायचा.? डिओ हा परफ्यूमला पर्याय असतो.?
हल्ली जो तो इको फ्रेण्डली असण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचमुळे डिओड्रंटपेक्षा दिवाळीत अत्तरला किंवा परफ्युम्सना अधिक महत्त्व मिळालेलं आहे. सध्या विविध प्रकारच्या जगविख्यात अत्तराच्या ब्रॅण्डस्चा बाजार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घमघमतोय. पुरुषांसाठी या दिवाळीचा फ्लेवर असेल स्वीट सायट्रेस आणि ब्लॅक पेपर. इंटेन्स आणि सेन्श्युअँलिटी अशा दोन्ही भावना उत्तेजित करणारी परफ्युमस् यंदाच्या दिवाळीत पुरुषांच्या आकर्षणाचं कारण असतील असा बाजारपेठेचा होरा आहे.
साधेसुधे फुलांचे सुगंध. सिम्प्लिसिटी. ज्या वासातून व्यक्त होते असे परफ्यूम्स हा तरुणींचा ट्रेण्ड असेल. त्याचबरोबर भारतात सेलेब्रिटी परफ्युमस्ही तरुण-तरुणींच्या मनाचा वेध घेतील. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अर्जुन रामपाल, शिल्पा शेट्टी, लता मंगेशकर या सगळ्यांच्या नावाचे खास परफ्युम बाजारात उपलब्ध आहेत. तेही दिवाळी स्वत:च्या वापरासाठी आणि गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ठरू शकतात.
परफ्यूम कुठला विकत घ्यायचा हा नेहमी एक मोठा प्रश्न असतो. म्हणूनच या काही विशेष टिप्स
कुठलाही परफ्यूम विकत घेण्याआधी तो हातावर थोडासा उडवून त्याचा काही सेकंदांनंतर वास घेऊन बघा. तो वास तुम्हाला आनंददायी वाटला तरच परफ्यूम विकत घ्या. काही वास आपल्याला आवडत नाहीत. काही तीव्र असतात. तर काही मंद सुगंध नकोसे वाटतात. आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा वास आवडतो हे नक्की समजल्यानंतरच परफ्यूम विकत घ्या.
एकवेळी दोन किंवा जास्तीत जास्त तीन परफ्यूम विकत घ्या. त्यापेक्षा अधिक नको. कारण सतत निरनिराळ्या प्रकारच्या परफ्यूमचे वास घेऊन दोन परफ्यूममधला फरक तुमचं नाक काही काळासाठी ओळखेनासं होऊ शकतं. त्यामुळे शॉपिंग करताना एखाद-दुसर्या परफ्यूमवर थांबा. म्हणजे तुम्ही योग्य परफ्यूमची निवड करू शकाल.
खरंतर परफ्यूम अंगावर उडवल्यानंतर १0 मिनिटं थांबावं. त्यानंतरच त्या परफ्यूमचा खरा सुगंध आपल्याला समजू शकतो.
परफ्यूम अंगावर उडवताना भसभसा उडवू नये. एखादा स्प्रे अंगावर, कानामागे आणि मनगटावर एवढाच परफ्यूम उडवायचा असतो. काही जणांना परफ्यूम खूप सारा अंगावर, काखेत उडवण्याची सवय असते. त्यामुळे परफ्यूम मंद सुगंध न राहता नाकात शिरणारा नकोसा वास होतो. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या माणसांना इतका तीव्र वास नकोसा होऊ शकतो. त्यामुळे परफ्यूम हा नेहमी हलकेच उडवायचा असतो.
परफ्यूम कधीही उन्हात किंवा फ्रिजमध्ये ठेवू नका. परफ्यूम नेहमी सावलीत, म्हणजेच थेट ऊन जिथं त्यावर बसणार नाही अशा जागी ठेवा.
शरीराची दुर्गंधी घालवण्याचं काम परफ्यूमचं नाही. त्यासाठी साबण आणि टॅल्कम पावडर असते. परफ्यूममुळे तुमच्या शरीराला एक नैसर्गिक सुगंध मिळतो हे लक्षात घ्या.
अनेकांना डिओ काखेत मारून मग वरून परफ्यूम उडवण्याचीही सवय असते. पण असे करू नये. त्यामुळे दोन भिन्न सुगंध एकत्र होतात आणि तुम्हाला जाणवत नसलं तरी आजूबाजूच्या लोकांना त्याचा विचित्र वास येण्याची दाट शक्यता असते.
परफ्यूमचा वास तीन-चार तासच टिकतो. त्यामुळे तुम्हाला दिवसभर काही महत्त्वाचे काम असेल, दिवाळीनिमित्त नातेवाइकांच्या भेटीगाठीचा सिलसिला दिवसभर चालणारा असेल तर मात्र परफ्यूमची बाटली जवळ बाळगा. कारण ३-४ तासांनी तुमच्या शरीराला येणार गंध कमी कमी होत जाईल.
काही काही परफ्यूममुळे अंगावर रॅश येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे परफ्यूम विकत घेण्याआधी तो त्वचेवर उडवून बघायलाच पाहिजे. जर त्याचा त्वचेवर काही परिणाम झाला नाही तर याचा अर्थ तो परफ्यूम तुम्हाला सूट करतो आणि मग तो तुम्ही विकत घ्यायला हरकत नसते.
दिवसा, संध्याकाळी, रात्री वापरण्याचे परफ्यूम एकमेकांपासून भिन्न असतात. काही काही ब्रॅण्डमध्ये तर मूडनुसार वापरण्याचे परफ्यूमस्ही मिळतात. परफ्यूम विकत घ्यायला जाल तेव्हा फक्त गंधाचा विचार न करता या इतर गोष्टींचाही
विचार जरूर करा.

No comments:
Post a Comment