Thursday, November 8, 2012

'अज्ञात' बराक ओबामा

बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्याबद्दलची उत्सुकता, आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ते सार्वजनिक जीवनातून वेगळे होणे जवळपास अशक्यच असते. तरीही बराक ओबामा यांच्या काही विशेष व काही गंमतीदार गोष्टी कदाचित आपल्याला माहीत नसतील.

ओबामा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या, तसेच त्यांच्या जीवनातील अशाच काही बाबी -

2006 मध्ये ओबामा यांना सर्वोत्कृष्ट उच्चारलेल्या शब्दांबद्दल (बेस्ट स्पोकन वर्ड्स) प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. ओबामा यांनी आपल्या 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर' या पुस्तकाचे ध्वनिमुद्रण स्वतःच्या आवाजात केले होते.

बराक व मिशेल या ओबामा दाम्पत्याने 2005 मध्ये शिकागोमध्ये एक घर विकत घेतले होते. भिंतीतल्या चार शेकोट्या असणाऱ्या या घराची किंमत तेव्हा साडेसोळा लाख डॉलर्स (अंदाजे आठ कोटी रुपये).

ओबामा यांना आइसक्रीम आवडत नाही. त्यांनी किशोरवयात 'बास्किन-रॉबिन्स'मध्ये काम केले होते. तेव्हापासून आइसक्रीम हे त्यांच्या नावडत्या यादीत गेले.

त्यांना चित्रे रेखाटायला आवडते. त्यामध्ये ते किती निपुण आहेत, हे त्यांनी सांगितले नाही. पण 'एँग्री बर्ड्स' (स्माइली) वगैरे आवडत असतील असे वाटते?

ते द्विधर्मीय असल्याचे मानले जाते. त्यांचे वडील केनियन वंशाचे होते, तर आई अमेरिकन 'गोरी' होती. आई-वडिलांमध्ये असलेला वांशिक फरक लहानपणी आपल्याला कधीच जाणवला नाही, असं 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर' या पुस्तकात त्यांनी लिहिलंय.

ओबामा यांनी ड्रग्जसारख्या विषाची परीक्षा बघितलीय. फार वर्षांपूर्वी सुरुवातीला त्यांनी मारिजुआना आणि कोकेनची चव पाहिली होती. त्यांच्या स्वतःच्याच भाषेत सांगायचं तर, त्यांना याबाबत बढाई वाटत नाही. उलट ती एक तरुणपणातील चूक असल्याचे ते कबुल करतात.

ते धुम्रपान करत होते. मात्र, अलीकडेच मिशेल यांच्या आग्रहावरून त्यांनी ते त्वरित सोडून दिलंय. तसंही 'व्हाइट हाऊस'मध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे.

ओबामांचा जन्म हवाई प्रांतातील होनुलुलू येथे झाला. नंतर आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर ते आईसोबत इंडोनेशियाला राहायला गेले होते. तिथे कुत्रा, साप, नाकतोडा हे 'मेन्यू' त्यांच्या आहारात आले!

पत्नी मिशेलच्या मते ओबामा हे भावनाप्रधान (रोमँटिक) आहेत. ते पटविण्यासाठी जास्त मखलाशी करणाऱ्यांतले नाहीत. पण लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मिशेलसाठी पुष्पगुच्छ आणतात.

ते घरी असतील तेव्हा रोज रात्री आपली मोठी मुलगी मलिया हिला 'हॅरी पॉटर'च्या गोष्टी वाचून दाखवतात.

(सौजन्यः ओबामा झोन)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive