Monday, November 5, 2012

I want mobile in Rs. 10000/-

मला १० हजार रूपयांच्या आत मोबाइल घ्यायचा आहे , ज्यामध्ये फिजिकल की-बोर्ड हवा आहे. कारण मला भरपूर मेसेजेस करायचे असतात. तसंच वॉट्स अॅप आणि जीपीएस सपोर्ट सिस्टिम हवी आहे. ब्लॅकबेरीचा पर्याय माझ्या डोक्यात आहे मात्र बीआयएस सेवा महाग पडते.

- अनीश कुबल

तुम्हाला ब्लॅकबेरीचा पर्याय होता. मात्र नको असल्यामुळे तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी वाय प्रो ड्युओज हा अँड्रॉइडचा पर्याय स्वीकारू शकातात. यामध्ये तुम्हाला विविध मोबाइल अॅप्सचा वापर करता येऊ शकतो. याचबरोबर यामध्ये ड्युएल सिम असल्यामुळे तोही पर्याय खुला होता. यामध्ये टचपॅड असलं तरी याची बटनं इतर टचपॅडपेक्षा खूप मोठी आहेत. यामुळे तुम्हाला मेसेजेस ऑपरेट करताना याचा फायदा होऊ शकतो. पण यामध्ये एक कमी अशी आहे की , याची इंटर्नल मेमरी खूपच कमी आहे. यामुळे केवळ इंटर्नल मेमरीवर डाऊनलोड होणारे शेकडो अॅप्स तुम्हाला वापरता येऊ शकणार नाहीत. तसंच याची बॅटरी लाइफही खूपच कमी आहे. याशिवाय तुम्हाला नोकिया आशाचा पर्यायही खुला आहे. यामध्ये टचस्क्रीन आणि कीपॅड असे दोन्ही पर्याय आहेत. यात तुम्हाला जीपीएस , नोकीया मॅप्स आणि गाण्यांचे फ्री डाऊनलोडिंगसाठी मोठी लायब्ररी उपलब्ध होते. याचं बॅटरी लाइफ सॅमसंगपेक्षा चांगली आहे. यात एकच अडचण अशी आहे की , खूप मर्यादित अॅप्स तुम्हाला वापरता येतात. अर्थात वॉट्सअॅप यासारखे काही फेमस अॅप्स यामध्ये वापरता येऊ शकतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive