Monday, November 5, 2012

दादर चौपाटी-माहीम वॉक वे

दादरच्या चैत्यभूमीपासून माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलपर्यंतच्या चौपाटीवर किनाऱ्यालगत वॉक वे वांधण्यात येणार आहे. किनारपट्टीवर ४०० मीटरचा वॉक वे बांधण्याची योजना असून चौपाटीवरील वाळूची धूप थांबवण्यासाठी जीओ ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

दादर चौपाटी गेल्या काही वर्षांपासून खचण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यात समुद्राच्या लाटा थेट किनारपट्टीवरून रस्त्यावर येतात. त्यामुळे आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. चौपाटीचे संरक्षण करण्याबरोबर सुभोभिकरणाचा कार्यक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना आकार घेत आहे. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी मेरिटाइम बोर्डाकडे पाठपुरावा करून या कामला मंजुरी घेतली. त्यामध्ये दादरच्या चैत्यभूमीपासून माहीम हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वॉक वे होईल. त्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वॉकवेवरून फेरफटका मारता येईल.

चौपाटीवरील वाळूची धूप थांबवण्यासाठी जीओ ट्यूब तंत्रज्ञनाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या रबरी ट्यूबमध्ये समुद्राची वाळू प्रचंड दाबाने भरण्यात येते. या ट्यूबमुळे भरतीच्या लाटांबरोबर वाळू समुद्रात वाहून जात नाही. वाळूचे संवर्धन होते. या कामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. पहिला टप्प्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल , असे मेरिटाइम बोर्डातर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive