Monday, November 5, 2012

How can I assemble PC in Rs. 10000/-?

मला कम्प्युटर असेम्बल्ड करायचा आहे. बजेट १० हजार रूपये आहे. मला स्वस्त आणि मस्त कॉन्फिग्रेशन सांगा. मला कम्प्युटरवर गेम्स खेळायचे नाही आहेत. यामुळे ग्राफीक कार्ड नसलं तरी चालेल.

- अजय चौघुले

अगदी कमी दर्जाचं साहित्य आणलं तरी १० हजार रूपयांपर्यंत कम्प्युटर तयार होणं कठीण आहे. पण तरीही अगदी स्वस्तात करायचंच असेल तरी काही पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला बेसिक कॉन्फिग्रेशन निवडावे लागेल. यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा स्टोअरेज , स्पीकर्स , अधिक रॅम , वेबकॅम या सर्व गोष्टींचा मोह टाळावा लागेल. तरच तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कम्प्युटर असेम्बल्ड होऊ शकतो. तुमच्या मदरबोर्ड , प्रोसेसर कॉम्बिनेशनसाठी तुम्ही ASRock H61M-PS 2 मदरबोर्ड आणि इंटेल पेंटियम जी३६० प्रोसेसर ड्युएल कोरचा पर्याय स्वीकारावा लागेल. याची किंमत तुम्हाला सुमारे ५ हजार ९०० पर्यंत जाईल. ट्रान्सेंड किंवा किंगस्टनची दोन जीबीची रॅम ही तुम्हाला ६०० रूपयापर्यंत उपलब्ध होईल. सीगेट किंवा वेस्टर्न डिजिटल या कंपनीची १६० जीबी हार्ड डिस्क ती तुम्हाला दोन हजार ४०० रूपयांपर्यंत मिळते. हे सर्व पार्टस तुम्हाला झेब्रोनिक्स किंवा आयबॉलच्या कॅबिनेटमध्ये अटॅच करता येतील याची किंमत तुम्हाला अंदाजे १५०० रूपयांपर्यंत जाईल. सॅमसंग किंवा लॉजीटेक या कंपनीचा की-बोर्ड आणि माऊस तुम्हाला ३०० रूपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. असे सर्व मिळून तुम्हाला बेसिक कम्प्युटर तयार करण्यासाठी १० हजार ५०० रूपये इतका खर्च येणार आहे. तुम्हाला ब्रॅण्डेड मॉनिटर घ्यायचा असेल तर त्याची किंमत चार हजार रूपयांपासून पुढे सुरू होते. ऑपरेटिंग सिस्टिम ऑफिशिअल घेतली तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. यामुळे तुम्ही लिनक्स बेस्ड उबंटु या फ्री सॉफ्टवेअरचा पर्याय स्वीकारू शकतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive