सणसमारंभ म्हटले की गिफ्टस
आणि खाऊची देवाणघेवाण आलीच. कोणाला काय गिफ्ट द्यायचं याच्यावर तुमचे
विचारही सुरु झाले असतील. यावर्षी टेक्नोसॅव्ही लोकांची मात्र चंगळ आहे , कारण गिफ्ट देता येऊ शकतील असे काही स्वस्त आणि मस्त टॅबलेट्स बाजारात आलेत.
एचडीची धूम टॅबवरही
अँड्रॉइड ४.० , एक जीबी रॅम अशा सामान्य फिचर्सबरोबरच एचडीची सुविधा असलेला पहिला-वहिला टॅबलेट विश्टेल या कंपनीने बाजारात आणला आहे. आइस्क्रीम सॅण्डविच ऑपरेटिंग सिस्टिम , एक जीबी रॅम , १.२ गीगाहर्टझचा प्रोसेसर , १०.१ इंचाची एलईडी एचडी स्क्रीन , थ्रीजी आणि वॅन सपोर्ट , थ्रीडी ग्राफिक्स सपोर्ट अशी काही विशेष आकर्षण या टॅबलेटची आहेत. यातील थ्रीडी ग्राफिक्स सिस्टिममुळे युजरला नेविगेशनचा एक अनोखा अनुभव घेता येऊ शकणार आहे. या टॅबलेटची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये एज्युकेशन कन्टेन्टही मिळणार आहे. यात सुमारे एक हजार तासांचा एज्युकेशनल व्हीडिओ कंटेंट उपलब्ध आहे. यात आयआयटी-जेईई , मेडीकलची प्रवेश परीक्षा , कॅट आणि जीमॅट प्रवेश परीक्षा यांचा समावेश आहे. तसेच सीबीएसई , आयसीएसईचा शालेय अभ्यासक्रमही यात उपलब्ध आहे. अर्थात ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतात. या टॅबची इंटर्नल मेमरी आठ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकेल. पण यामध्ये कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा आहे. फ्रंट कॅमेरा व्हीजीए आहे. ही बाब सोडली तर हा टॅब चांगला पर्याय ठरू शकतो.
इतर स्पेसिफिकेशन
बॅटरी - पाच ते सहा तास वर्किंग अवर्स
पोर्टस - युएसबी मायक्रो , मायक्रो एसडी , मिनी एचडीएमआय , ३.५ एमएम इअरफोन , माइक पोर्ट
ग्रॅव्हिटी सेन्सॉर - फोर डी ग्रॅव्हीटी सेन्सिंग
किंमत - ९ , ९९९/-
स्लीम ट्रीम
इंटेक्स या कंपनीने सात इंचांचा स्वस्त टॅबलेट नुकताच भारतीय बाजारात आणला आहे. यामध्ये अँड्रॉइड ४.० ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. याची खासियत म्हणजे हा पूर्णपणे मेटल डिझाइन असून याची जाडी केवळ नऊ मिलीमीटर इतकीच आहे. याला कंपनीने आय-बडी असे नावं दिले आहे. तसं पाहायला गेलं तर अगदी बेसिक सुविधा असलेला हा टॅब टेकसॅव्ही मंडळींना आवडणार नाही पण आपल्या घरातील बुर्जगांना किंवा मुलांना गिफ्ट करण्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये आठ इंच स्क्रीन असलेले मॉडेल्सही उपलब्ध आहेत. यामध्ये मेमरी ३२ जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल आहे.
किंमत - ६ , ४९०/-
ग्राफिक प्रोसेसरची धम्माल
आयबॉल या कंपनीने नुकतीच आपली परफॉरमन्स सिरिज लाँच केली आहे. यामध्ये खास ग्राफिक प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे याचा स्पीड एकदमच फास्ट होतो. यामुळे सर्व टेकसॅव्ही मंडळींची सध्या ही चांगली चॉइस बनली आहे. कम्प्युटरसारख्या सर्व सुविधा असलेला या टॅबला पीसी आय ९७०२ असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये ड्युएल कोस १.५ गीगाहर्टजचा प्रोसेसर आहे. याचबरोबर क्वाड कोरचा जी ४०० माली ग्राफिक प्रोसेसर आहे. यामुळे गेमिंग खेळणं सोपं होऊन जातं. यात एक जीबी रॅम आहे. याची फुल कपॅसिटीव्ह मल्टी टचस्क्रीन आहे. यामुळे आपण व्ह्युविंग अँगल कोणत्याही प्रकारचा ठेवू शकतो. यामध्ये फ्रण्ट आणि बॅक असे दोन्ही कॅमेरे असून ते दोन्ही दोन मेगा पिक्सेलचे आहेत. बॅटरीची क्षमताही जास्त असून ती सात वर्किंग अवर्स काम करू शकते. यात अँड्रॉइड ४.० ऑपरेटिंग सिस्टिम असून इंटरनल मेमरी आठ जीबीची आहे. ही मेमरी आपण ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यामध्ये फेसबुक , झोमाटा , क्रिकेट नेक्स्ट यासारखी अॅप्स इनबिल्टचं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय युएसबी मायक्रो , मायक्रो एसडी , मिनी एचडीएमआय , ३.५ एमएम इअरफोन , माइक पोर्ट आहेत.
किंमत - १४ , ९९९/-

No comments:
Post a Comment