ब्रिटनच्या २६ पंतप्रधानांचा कार्यकाळ त्यांनी पाहिला आहे ... त्यांना महाराणीने स्वत : सात टेलिग्राम पाठवले आहेत ... त्यांना टायटॅनिक बूडल्याचे दिवसही आठवतात ... ते दोन्ही महायुद्धांचे साक्षीदार आहेत ... त्याचप्रमाणे ते विमानच्या जन्म कथेचेही साक्षीदार आहेत ... एक अख्ख शतक याची देही याची डोळा पाहाणा - या ब्रिटनमधील सर्वात वयस्कर व्यक्ती रेग डीन यांनी वयाच्या ११०व्या वर्षी आपल्या दीर्घायुष्याचे गुपित जगाला सांगितले आहे .
२ नोव्हेंबर रोजी ११० वर्षाचे झालेल्या डीन यांनी आपल्या दीर्घायुष्यासाठी शाकाहारी असणे आणि दारु न पिण्याच्या सवयी कारणीभूत नसून भारतातील एका डॉक्टरने दिलेले एक औषध कारणीभूत असल्याचे सांगितले आहे . मी दूस - या महायुद्धाच्या वेळी भारतात सैनिक म्हणून भारतात तैनात असताना एका डॉक्टरने मला औषध पाजले होते आणि या औषधामुळे तुम्ही अमर व्हाल असे सांगितले . मात्र मी त्यावेळी लाजाळू स्वभावाचा असल्याने याबद्दल कुणालाही काहीही सांगितले नव्हते . पण त्या औषधामुळेच मी इतक्या वर्ष जगू शकलो आहे , असे डीन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे .
माजी शिक्षक आणि चर्च मिनिस्टर असणा - या रेगे यांचा १९०२ साली जन्म झाला . आजही त्यांना बालपणीच्या थोड्याफार गोष्टी लक्षात आहेत . टायटॅनीक जहाज बुडाले तेव्हा मी आपल्या काकांच्या शेतात होतो , असेही रेगे यांनी सांगितले . महायुद्धाच्या काळात ते बर्मा आणि भारतात आर्मी कॅप्टन पदावर होते . रेगे यांनी तीन लग्न केली असून त्यांना एक मुलगा आणि दोन नातू आहेत .
८०व्या वर्षी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यानंतर रेगे आता आपल्या मुलाबरोबर लंडनमध्येच राहत असून त्यांनी आपल्याला १२० वर्ष जगायचे असल्याचे मुलाखतीच्या शेवटी सांगितले आहे . सध्या जपानमधील ११५ वर्ष वयाच्या जिरोमॉन किरोमा या जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात .

Reg, 110: Now I’m aiming to reach 120
UK's oldest
Candles ... Reg Dean blows on his birthday
Ross Parry Agency
एक भारतीय
Udayan P.K. Tuljapurkar
IndianNovember 5, 2012 at 7:15 PM
where is the medicine and what is the name of the doctor???????
ReplyDelete